India vs South Africa (IND vs SA) T20I Series 2024 Live Streaming: टी-२० विश्वचषक २०२४ नंतर भारत आणि दक्षिण आफ्रिका संघ पुन्हा आमनेसामने येणार आहेत. वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात टीम इंडियाने शेवटच्या काही षटकांमध्ये चमकदार कामगिरी करत विजेतेपद पटकावले. यावेळी दोन्ही संघ टी-२० मालिकेसाठी एकमेकांविरूद्ध उभे ठाकणार आहे. या मालिकेसाठी भारतीय संघही दक्षिण आफ्रिकेत पोहोचला आहे. या मालिकेसाठी दोन्ही संघांची घोषणा करण्यात आली आहे. पण हे सामने टीव्ही आणि मोबाईलवर लाइव्ह कुठे पाहता येणार, जाणून घेऊया.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
भारतीय संघ सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली दक्षिण आफ्रिकेत पोहोचला असून प्रतिस्पर्धी संघाला त्यांच्याच घरच्या मैदानावर आव्हान देण्यासाठी सज्ज आहे. या मालिकेतील पहिला सामना ८ नोव्हेंबरला होणार आहे. एकूण ४ सामने या मालिकेत होणार आहेत. दक्षिण आफ्रिकेतील खेळपट्ट्यांवर कामगिरी करणं हे फलंदाजांसाठी कायमचं अवघड असतं, त्यामुळे भारतीय संघातील फलंदाज कशी कामगिरी करतात, यावर सर्वांच्या नजरा असणार आहेत.
दक्षिण आफ्रिकेविरूद्ध टी-२० मालिका ही २४ आणि २५ नोव्हेंबरला होणाऱ्या आयपीएल लिलावापूर्वी आहे. या मालिकेत चांगली कामगिरी करून खेळाडू आयपीएल फ्रँचायझीचे लक्ष वेधून घेऊ शकतात. भारत-दक्षिण आफ्रिका टी-२० मालिकेचे सामने भारतात टीव्हीवर स्पोर्ट्स १८ चॅनलवर पाहता येणार आहेत. तर मोबाईल अॅपवर जिओ सिनेमावर लाईव्ह पाहता येईल.
भारत वि दक्षिण आफ्रिका हेड टू हेड
दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत एकूण २७ टी-२० सामने खेळवले गेले आहेत. ज्यामध्ये टीम इंडियाने १५ सामने जिंकले आहेत, तर दक्षिण आफ्रिकेने ११ सामने जिंकले आहेत. दोन्ही संघांमधील केवळ एका सामन्याचा निकाल जाहीर होऊ शकला नाही.
IND vs SA: भारत- दक्षिण आफ्रिका टी-२० मालिकेसाठी दोन्ही संघ
भारत :
सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), रिंकू सिंग, तिलक वर्मा, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, रमणदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, विजयकुमार वैशाक, आवेश खान, यश दयाल.
दक्षिण आफ्रिका
एडन मारक्रम (कर्णधार), ओटनील बार्टमन, गेराल्ड कोएत्झी, डोनोव्हन फरेरा, रीझा हेंड्रिक्स, मार्को जॅन्सन, हेनरिक क्लासेन, पॅट्रिक क्रुगर, केशव महाराज, डेव्हिड मिलर, मिहलाली मॅपोंगवाना, नकाबा पीटर, रायन रिकेल्टन, एंडिले सिमलेन, लूथो सिम्पाला, ट्रिस्टन स्टब्स
IND vs SA: भारत वि दक्षिण आफ्रिका टी-२० मालिकेचे वेळापत्रक
८ नोव्हेंबर – पहिला टी-२० सामना – डरबन – रात्री ८.३० वा
१० नोव्हेंबर – दुसरा टी-२० सामना – गकेबेहरा – रात्री ७.३० वा
३ नोव्हेंबर – तिसरा टी-२० सामना – सेंच्युरियन – रात्री ८.३० वा
१५ नोव्हेंबर – चौथा टी-२० सामना – जोहान्सबर्ग – रात्री ८.३० वा