India vs South Africa Women’s World Cup 2025 Live Scorecard Updates: भारतीय संघाने नवी मुंबईतील डी.वाय.पाटील स्टेडियमवर इतिहासाला गवसणी घातली आहे. आयसीसी महिला वनडे वर्ल्डकप २०२५ स्पर्धेतील अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेला पराभूत करून भारताने पहिल्यांदाच वर्ल्डकपची ट्रॉफी जिंकली आहे. या सामन्यात भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेसमोर विजयासाठी २९९ धावांचे आव्हान ठेवले होते. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या दक्षिण आफ्रिकेकडून कर्णधार लॉरा वूल्व्हडार्टने दमदार शतकी खेळी केली. तिने १०१ धावा केल्या. भारतीय संघाकडून गोलंदाजी करताना दीप्ती शर्माने सर्वाधिक ५ गडी बाद केले. भारताने हा सामना ५२ धावांनी आपल्या नावावर केला.

IND-W vs SA-W Live Score: भारताचा दमदार विजय
भारतीय संघाने हा सामना ५२ धावांनी आपल्या नावावर केला आहे.

IND-W vs SA-W Live Score: दक्षिण आफ्रिकेचे ९ फलंदाज तंबूत
दीप्ती शर्माने क्लो ट्रायॉनला बाद करत माघारी धाडलं.

IND-W vs SA-W Live Score: अखेर लॉरा वूल्व्हडार्टची विकेट मिळाली! अमनज्योतने तिसऱ्या प्रयत्नात घेतला भन्नाट कॅच
दीप्ती शर्माच्या गोलंदाजीवर लॉरा वूल्व्हडार्ट १०१ धावांवर झेलबाद होऊन माघारी परतली. बाऊंड्री लाईनवर अमनज्योतने भन्नाट झेल घेतला.


IND-W vs SA-W Live Score: अखेर विकेट मिळाली! दीप्तीच्या यॉर्करवर डर्कसनची बत्तीगुल
दीप्तीने डर्कसनला ३५ धावांवर बाद करत माघारी धाडलं

IND-W vs SA-W Live: दीप्तीने सोपा झेल सोडला
लॉरा आणि डर्कसनची जोडी चांगलीच जमली आहे. तिला २४ धावांवर बाद करण्याची संधी होती. पण दीप्तीकडून सोपा झेल सुटला. त्यावेळी ती २४ धावांवर होती.

IND-W vs SA-W Live: दोन्ही संघांना विजयाची संधी
दक्षिण आफ्रिकेला हा सामना जिंकण्यासाठी ९५ चेंडूत ११९ धावांची गरज आहे.

IND-W vs SA-W Live Score: दक्षिण आफ्रिकेचा निम्मा संघ तंबूत! पण कर्णधार लॉरा खंबीरपणे उभी
दक्षिण आफ्रिकेचा संघ निम्मा संघ तंबूत परतला आहे. दीप्तीने जाफताला बाद करत माघारी धाडलं आहे. पण लॉरा अजूनही ७८ धावांवर नाबाद आहे.

IND W vs SA W Live Score: शफाली वर्मा ‘ऑन फायर’! सलग दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवर मिळवली महत्त्वाची विकेट
शफाली वर्माने पहिल्याच षटकातील पहिल्या चेंडूवर सुने लूसला झेलबाद करत माघारी धाडलं होतं. आता दुसऱ्या षटकात तिने मॅरिझान कॅपला बाद केलं आहे.

India vs South Africa Live: शफाली वर्माने मिळवून दिली तिसरी विकेट! हरमनप्रीतसोबत मिळून केलं भन्नाट सेलिब्रेशन
पार्ट टाईम गोलंदाज शफाली वर्माने पहिल्याच चेंडूवर सुने लूसला झेलबाद करत माघारी धाडलं. दरम्यान विकेट घेतल्यानंतर तिने हरमनप्रीत कौरला उचलू घेतलं.

India vs South Africa Final Live Score: दक्षिण आफ्रिका मजबूत स्थितीत! टीम इंडियाला विकेट्सची गरज
दक्षिण आफ्रिकेला हा सामना जिंकण्यासाठी ३० षटकात १८६ धावांची गरज आहे.

IND-W vs SA-W Live: तॅझमिन ब्रिट्स धावबाद

लक्ष्यचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेला पहिला मोठा धक्का बसला आहे. सलामीवीर ब्रिट्स एक धाव घेण्याच्या प्रयत्नात अमनजोत कौरकडून धावबाद झाली.

IND-W vs SA-W Live: शफाली- दीप्तीचं दमदार अर्धशतक! दक्षिण आफ्रिकेला वर्ल्डकप जिंकण्यासाठी इतक्या धावांची गरज
भारतीय संघाने २९८ धावा केल्या आहेत. हा सामना जिंकण्यासाठी दक्षिण आफ्रिकेला २९९ धावा करायच्याआहेत.

IND-W vs SA-W Live: रिचा घोष परतली माघारी
दीप्ती शर्मा आणि रिचा घोषची जोडी चांगलीच जमली होती. पण ती ३४ धावा करून माघारी परतली आहे.

IND-W vs SA-W Live: दीप्ती शर्माचं दमदार अर्धशतक! टीम इंडियाची ३०० धावांच्या दिशेने वाटचाल
मधल्या षटकांमध्ये विकेट्स गेल्यामुळे भारतीय संघावर दबाव आला होता. पण दीप्तीने दबावात टिचून फलंदाजी करून

IND-W vs SA-W Live: भारताचा निम्मा संघ तंबूत! २५० धावांचा पल्ला गाठला
भारतीय संघाला पाचवा धक्का बसला आहे. अमनजोत कौर स्वस्तात माघारी परतली आहे. तर भारताने २५० धावा पूर्ण केल्या आहेत.

IND-W vs SA-W Live: भारतीय संघाला सर्वात मोठा धक्का! कर्णधार हरमनप्रीत कौर परतली माघारी
भारतीय संघाची स्टार फलंदाज हरमनप्रीत कौर अवघ्या २० धावा करत माघारी परतली आहे.

IND-W vs SA-W Live: दीप्ती शर्मा थोडक्यात बचावली
दीप्ती शर्मा २० धावांवर पायचित झाली होती. त्यानंतर डीआरएस घेतला असता, पिचींग आऊटसाईड लेग असल्यामुळे ती थोडक्यात बचावली.

IND-W vs SA-W Live: ३२ षटकांचा खेळ पूर्ण
या सामन्यातील पहिल्या डावातील ३२ षटकांचा खेळ पूर्ण झाला आहे. भारतीय संघाने ३ गडी बाद १८२ धावा केल्या आहेत. हरमनप्रीत कौर ४ तर दीप्ती शर्मा १० धावांवर नाबाद आहेत.

IND-W vs SA-W Live: सेमीफायनलची हिरो जेमिमा फायनलमध्ये स्वस्तात माघारी! टीम इंडियाला तिसरा धक्का
सेमीफायनलमध्ये शतकी खेळी करून विजय मिळवून देणारी जेमिमा रॉड्रिग्ज या सामन्यात २४ धावा करत माघारी परतली आहे.

IND-W vs SA-W Live: शफालीचं वर्ल्डकप फायनलमधील शतक थोडक्यात हुकलं! अशी झाली बाद
शफाली वर्माला वर्ल्डकप फायनलमध्ये शतक झळकावण्याची सुवर्णसंधी होती. पण ती ८७ धावांवर झेलबाद होऊन माघारी परतली आहे.

IND-W vs SA-W Live: शफाली वर्माचं दमदार अर्धशतक
सलामीला फलंदाजीला आलेल्या शफाली वर्माने ४९ चेंडूत आपलं अर्धशतक पूर्ण केलं आहे. १८ षटकांअखेर भारताने १ गडी बाद १०९ धावा केल्या आहेत.

IND-W vs SA-W Live: टीम इंडियाला पहिला मोठा धक्का! अर्धशतकाची संधी असताना स्मृती मानधना परतली माघारी
स्मृती मानधनाने दमदार सुरूवात करून दिली. पण ती ४५ धावांवर झेलबाद होऊन माघारी परतली आहे.

IND-W vs SA-W Live: भारताच्या १०० धावा पूर्ण! टीम इंडिया मजबूत स्थितीत
सलामीला आलेल्या शफाली वर्मा आणि स्मृती मानधानाने दमदार सुरूवात करून दिली आहे. भारताने १७ व्या षटकात १०० धावांचा पल्ला गाठला आहे.

IND-W vs SA-W Live: स्मृती- शफालीची दमदार सुरूवात! भारताच्या ५० धावा पूर्ण
भारतीय संघाला या सामन्यात प्रथम फलंदाजी करण्याचं आमंत्रण मिळालं आहे. दरम्यान प्रथम फलंदाजी करताना भारताने ७ व्या षटकात ५० धावांचा पल्ला गाठला आहे. स्मृती २१ तर शफाली २२ धावांवर नाबाद आहेत.

IND-W vs SA-W Live: सामन्याला सुरूवात
भारतीय संघाकडून स्मृती मानधना आणि शफाली वर्मा मैदानात

या सामन्यासाठी अशी आहे दोन्ही संघांची प्लेइंग ११:

भारतीय संघ : शफाली वर्मा, स्मृती मानधना, जेमिमा रॉड्रिग्ज, हरमनप्रीत कौर (कर्णधार), दीप्ती शर्मा, रिचा घोष (यष्टीरक्षक), अमनजोत कौर, राधा यादव, क्रांती गौड, श्री चरणी, रेणुका सिंग ठाकूर

दक्षिण आफ्रिका संघ :लॉरा वॉल्वार्ड्ट (कर्णधार), तॅझमिन ब्रिट्स, ॲनीके बॉश, सुने लूस, मॅरिझान कॅप, सिनालो जाफ्ता (यष्टीरक्षक), ॲनिएरी डर्कसन, क्लो ट्रायॉन, नदिन डी क्लर्क, आयाबोंगा खाका, नॉनकुलुलेको म्लाबा

फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेने जिंकला टॉस! टीम इंडिया बॅटिंग करणार
या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे.
पाऊस थांबला – ४:१५ वाजता
काही वेळापूर्वी पाऊस थांबला होता. त्यामुळे कव्हर्स काढण्यात आले होते. पण पावसाची शक्यता असल्याने खेळपट्टीवरील कव्हर्स अजूनही काढण्यात आलेले नाही.

सामना सुरू होणार
सामना लवकरच सुरू होणार आहे. नाणेफेक ४:३० वाजता होईल. तर सामना ५ वाजता सुरू होईल.

पाऊस थांबला
पाऊस थांबला असून लवकरच सामना सुरू होण्याची शक्यता. अंपायर्स मैदानात आले आहेत. मैदानाची स्थिती पाहून अंपायर्स सामना किती वाजता होईल, याबाबत निर्णय घेतील.

पावसामुळे पुन्हा एकदा खेळ थांबला
पावसामुळे सामना थांबला असून सामना सुरू होण्यास आणखी उशीर होऊ शकतो.

पाऊस थांबला! सामना किती वाजता सुरू होणार?
पाऊस थांबला असून नाणेफेक ३ वाजता होणार आहे. तर सामना ३:३० वाजता सुरू होणार आहे.

पाऊस थांबला
पाऊस थांबला असून लवकरच सामन्याला सुरूवात होऊ शकते. आता कव्हर्स काढले जात आहेत.