scorecardresearch

IND vs SL 2nd ODI: सामन्यापूर्वी राहुल द्रविडला उद्भवला बीपीचा त्रास; जाणून घ्या आता कशी आहे तब्येत

IND vs SL 2nd ODI Updates: भारत आणि श्रीलंका संघांत वनडे मालिकेतील दुसरा सामना ईडन गार्डन्सवर खेळला जात आहे. या सामन्यापूर्वी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडला बीपीचा त्रास झाला होता.

IND vs SL 2nd ODI: सामन्यापूर्वी राहुल द्रविडला उद्भवला बीपीचा त्रास; जाणून घ्या आता कशी आहे तब्येत
राहुल द्रविड आणि रोहित शर्मा (फोटो- संग्रहित छायाचित्र इंडियन एक्सप्रेस)

भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना (IND vs SL) कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर खेळवला जात आहे. दरम्यान, एक बातमी समोर होती की, राहुल द्रविडला बीपीमुळे काही काळ हॉटेलमध्ये राहावे लागले. खरंतर, राहुल द्रविड टीमसोबत ईडन गार्डन्सवर पोहोचला नव्हता, त्यानंतर त्याच्याबद्दल बातम्या येऊ लागल्या. बंगाल क्रिकेट असोसिएशनच्या अधिकाऱ्यांनी आता राहुल द्रविडची प्रकृती स्थिर असल्याचे जाहीर केले आहे. राहुल द्रविड स्टेडियमध्ये परतला आहे.

भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसऱ्या वनडेसाठी आज दोन्ही संघ कोलकाता येथील आयटीसी सोनार हॉटेलमध्ये थांबले होते. सामन्याच्या सुमारे दोन तास आधी दोन्ही संघ बसने स्टेडियमकडे रवाना झाले. त्यावेळी राहुल द्रविड भारतीय संघाच्या बसमध्ये चढला नव्हता, त्यानंतर त्याची तब्येत बिघडल्याच्या बातम्या आल्या होत्या. वास्तविक, राहुल द्रविड बीपीच्या समस्येमुळे टीमसोबत स्टेडियममध्ये पोहोचला नाही.

द्रविड आता कसा आहे?

हेही वाचा – IND vs SL 2nd ODI: सिराज-कुलदीपची शानदार गोलंदाजी; श्रीलंकेचे भारतासमोर २१६ धावांचे लक्ष्य

मात्र, त्यानंतर त्याला औषध देण्यात आले आणि काही वेळाने तो स्टेडियममध्ये पोहोचला. सध्या राहुल द्रविड पूर्णपणे व्यवस्थित आहे आणि तो टीम इंडियासोबत ड्रेसिंग रूममध्ये आहे. बंगाल क्रिकेट असोसिएशनच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याला औषध देण्यात आले आहे. सामन्याबद्दल बोलायचे, तरश्रीलंकेने ३९.४ षटकांच्या समाप्तीनंतर सर्वबाद २१५ धावा केल्या आहेत. त्याचबरोबर भारतीय संघासमोर २१६ धावांचे लक्ष्य ठेवले.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 12-01-2023 at 17:49 IST

संबंधित बातम्या