scorecardresearch

IND vs SL 2nd T20 Highlights: श्रीलंकेचा भारतावर १६ धावांनी विजय, मालिकेत १-१ अशी बरोबरी

India vs Sri Lanka 2nd T20I Hightlights Match Updates: भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसरा टी२० सामना एमसीए क्रिकेट स्टेडियमवर खेळला गेला. मालिका विजयाच्या उद्देशाने मैदानात उतरलेल्या भारतीय संघाला या सामन्यात हे उद्दिष्ट पूर्ण करण्यात अपयश‌ आले. श्रीलंका संघाने उत्कृष्ट सांघिक खेळ करत भारतीय संघाला १६ धावांनी पराभूत करण्यात यश मिळवले.

IND vs SL 2nd T20 Highlights: श्रीलंकेचा भारतावर १६ धावांनी विजय, मालिकेत १-१ अशी बरोबरी
भारत विरुद्ध श्रीलंका टी२० हायलाइट्स अपडेट

India vs Sri Lanka 2nd T20 Highlights Score Updates: भारत आणि श्रीलंका यांच्यातील टी२० मालिकेतील दुसऱ्या सामन्यात श्रीलंकेने भारताचा 16 धावांनी पराभव केला. यासह श्रीलंका संघाने तीन सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली आहे. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली भारताचा हा पहिलाच पराभव आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेने भारतासमोर २०७ धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात टीम इंडियाला आठ विकेट्स गमावून केवळ १९० धावा करता आल्या.

भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसरा टी२० सामना होत असून हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने पहिला सामना जिंकून मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. आजचा सामना पुण्याच्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियममध्ये खेळला जात आहे. उभय संघांतील पहिला टी२० सामना भारताने अवघ्या दोन धावांच्या अंतराने जिंकला होता. मालिकेतील हा दुसरा सामना निर्णायक असून भारताकडे मालिका नावावर करण्याची संधी आहे. पण या महत्वाच्या सामन्यात अर्शदीप सिंग याने एका षटकात तीन नो बॉल टाकण्याची चूक करून बसला.

प्रथम फलंदाजी करणाऱ्या श्रीलंकेने भारतासमोर २०७ धावांचे मोठे लक्ष्य ठेवले आहे. या सामन्यात श्रीलंकेच्या संघाने शानदार सुरुवात केली. यानंतर मधल्या षटकांमध्ये श्रीलंकेचा डाव गडगडला, पण शेवटी कर्णधार दासुन शनाकाने आक्रमक फलंदाजी करत संघाची धावसंख्या २०६ धावांपर्यंत नेली. श्रीलंकेकडून कुशल मेंडिस आणि दसून शनाका यांनी अर्धशतके झळकावली. भारताकडून उमरान मलिकने तीन विकेट्स घेतल्या. प्रथम फलंदाजीचे आमंत्रण मिळाल्यानंतर श्रीलंकेचे सलामीवीर कुसल मेंडीस आणि पथुम निसंका यांनी वेगवान फलंदाजी केली. खास करून मेंडीसने आक्रमक रूप दाखवत अर्शदीप सिंग व शिवम मावी यांचा समाचार घेतला. या दोघांनी ८.२ षटकात ८० धावांची सलामी दिली. चहलने भारताला पहिले यश मिळवून दिले.

भारतीय फिरकी गोलंदाजांनी मधल्या षटकात विकेट्स घेत भारताला सामन्यात पुन्हा आणले होते. मात्र शिवम मावी, अर्शदीप सिंग आणि उमरान मलिक यांनी मिळून तब्बल ७ नो बॉल टाकले. त्यामुळे श्रीलंकेला खुले मैदान फटके मारण्यासाठी मिळाले. भारताकडून सर्वाधिक विकेट्स उमरान मलिकने घेतल्या. तर अक्षर पटेल आणि युजवेंद्र चहलने मिळून ३ विकेट्स घेत त्याला साथ दिली.

श्रीलंकेने ठेवलेल्या २०७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पॉवर प्ले मध्ये भारताने खराब फलंदाजी केली. सलामीवीर इशान किशन, शुबमन गिल, राहुल त्रिपाठी आणि दिपक हुड्डा यांना दोन आकडी धावसंख्या देखील करता आली नाही. त्यानंतर आलेला कर्णधार हार्दिक पांड्याला देखील मोठी धावसंख्या उभारता आली नाही. मात्र त्यानंतर आलेल्या अक्षर पटेलने सूर्यकुमार यादवला साथ देत अर्धशतकी भागीदारी केली. त्यांच्यात ९१ धावांची भागीदारी झाली. पण सूर्या ५१ धावा करून बाद झाला. त्यानंतर अक्षर पटेलने शिवम माविच्या साथीने लक्ष्याच्या जवळ पोहोचवण्याचा प्रयत्न केला. मात्र तो ३१ चेंडूत ६५ धावा करून बाद झाला आणि भारताच्या अशा संपुष्टात आल्या.

Live Updates

India vs Sri Lanka 2nd T20 Highlights Match Updates in Marathi: भारत विरुद्ध श्रीलंका टी२० हायलाइट्स अपडेट्स

22:43 (IST) 5 Jan 2023
IND vs SL:श्रीलंकेचा भारतावर १६ धावांनी विजय, मालिकेत १-१ अशी बरोबरी

श्रीलंकेचा भारतावर १६ धावांनी विजय मिळवला, मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली.

भारत १९०-८

22:41 (IST) 5 Jan 2023
IND vs SL: भारताला मोठा धक्का, अक्षर पटेल बाद

झुंजार खेळी करत अष्टपैलू अक्षर पटेलने ६५ धावा करून बाद झाला. त्याला शनाकाने बाद केले.

भारत १८९-७

22:37 (IST) 5 Jan 2023
IND vs SL: शेवटच्या षटकात भारताला ६ चेंडूत २१ धावांची गरज

शेवटच्या षटकात भारताला ६ चेंडूत २१ धावांची गरज

भारत १८६-६

22:33 (IST) 5 Jan 2023
IND vs SL: शिवम मावीची अफलातून फटकेबाजी

शिवम मावीची अफलातून फटकेबाजी, एका षटकात दोन षटकार आणि एक चौकार मारत १६ धावा कुटल्या. १२ चेंडूत ३२ धावांची गरज आहे.

भारत १७५-६

22:21 (IST) 5 Jan 2023
IND vs SL: भारताला मोठा धक्का, सूर्यकुमार यादव बाद

सूर्यकुमार अर्धशतक करून बाद झाला. त्याला दिलशान मदुशंकाने हसरंगाकरवी झेलबाद केले. आता मदार अक्षर पटेलवर आहे.

भारत १४८-६

https://twitter.com/BCCI/status/1611042121544499200?s=20&t=r6Q1EiiHBUPMACnMVrLjIw

22:16 (IST) 5 Jan 2023
IND vs SL: मिस्टर ३६० सूर्याचे अर्धशतक

मिस्टर ३६० सूर्याचे अर्धशतक अवघ्या ३० चेंडूत पूर्ण केले. टीम इंडियाला २९ चेंडूत ६१ धावांची गरज आहे.

भारत १४७-५

22:12 (IST) 5 Jan 2023
IND vs SL: अक्षर पटेलचे तुफानी अर्धशतक

अक्षर पटेलने अवघ्या २० चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. त्याच्या या तुफानी खेळीने भारताच्या आशा पुन्हा पल्लवित केल्या आहेत.

भारत १३७-५

https://twitter.com/BCCI/status/1611039441921142785?s=20&t=cKhq9oSmN1JJBqVXjfU7bQ

22:05 (IST) 5 Jan 2023
IND vs SL: भारताच्या १०० धावा पूर्ण, अक्षर पटेल- सूर्यकुमार यांच्यात अर्धशतकी भागीदारी

अक्षर पटेल- सूर्यकुमार यांच्यात अर्धशतकी भागीदारी झाली असून त्यात अक्षरने सलग तीन षटकार वानिंदू हसरंगाला मारत डाव सावरण्याचा प्रयत्न केला. त्याच्या एका षटकात २६ धावा कुटल्या.

भारत ११६-५

https://twitter.com/BCCI/status/1611038593002385409?s=20&t=mX_MnfeDKiErssN65csmNw

21:55 (IST) 5 Jan 2023
IND vs SL: भारताला मोठ्या फटक्यांची गरज

सूर्यकुमार यादव आणि अक्षर पटेलला या दोघांनी मोठे फटके मारण्याची गरज आहे. मात्र श्रीलंकेच्या गोलंदाजांनी कसून गोलंदाजी केली आहे. धावबाद होता होता अक्षर पटेल वाचला.

भारत ८४-५

21:45 (IST) 5 Jan 2023
IND vs SL: भारताला पाचवा धक्का

दिपक हुड्डाने हवेत फटका मारत ९ धावांवर बाद झाला. त्याला वानिंदू हसरंगाने बाद केले. टीम इंडिया अडचणीत सापडली आहे.

भारत ५७-५

https://twitter.com/BCCI/status/1611032980868431873?s=20&t=EyVfHSTABs5CIZCW4RWZHw

21:35 (IST) 5 Jan 2023
IND vs SL: भारताचे अर्धशतक पूर्ण, सूर्यकुमार यादवला मोठी खेळी खेळणे आवश्यक

भारतीय संघाचे अर्धशतक पूर्ण झाले असून टीम इंडियाला मोठ्या भागीदारीची गरज आहे. उपकर्णधार सूर्यकुमार यादवला मोठी खेळी खेळणे गरजेचे…

भारत ५२-४

21:22 (IST) 5 Jan 2023
IND vs SL: भारताला मोठा धक्का, कर्णधार तंबूत

हार्दिक पांड्याने खराब फटका खेळत १२ धावांवर बाद झाला. त्याला चमिका करुणारत्नेने बाद केले. भारतीय संघ सध्या अडचणीत आलेला आहे.

भारत ३४-४

https://twitter.com/BCCI/status/1611027406017683458?s=20&t=ivq_x85uSZ1VZnydr4rrNQ

21:09 (IST) 5 Jan 2023
IND vs SL: भारताला सलग दोन धक्के

'कसून' रजिथा आणि दिलशान मदुशंकाने जबदरस्त गोलंदाजी करत भारताला लागोपाठ दोन धक्के दिले. राहुल त्रिपाठी-शुबमन गिल एकापाठोपाठ बाद झाले. त्यांनी अनुक्रमे ५-५ धावा केल्या.

भारत २१-३

https://twitter.com/BCCI/status/1611024120984240134?s=20&t=_PTg7jpvL0is52sC7iRu1g

21:05 (IST) 5 Jan 2023
IND vs SL: रिव्हर्स स्वीप खेळताना राहुल त्रिपाठीच्या डोक्याला लागला चेंडू

रिव्हर्स स्वीप खेळताना राहुल त्रिपाठीच्या डोक्याला चेंडू लागला. मात्र फार काही मोठी दुखापत झाली नाही,

भारत २१-१

21:00 (IST) 5 Jan 2023
IND vs SL: भारताला पहिला धक्का

फॉर्ममध्ये असणारा इशान किशन अवघ्या २ धावांवर त्रिफळाचीत झाला. त्याला रजिथाने बाद केले.

भारत १२-१

https://twitter.com/BCCI/status/1611022206695542793?s=20&t=_PTg7jpvL0is52sC7iRu1g

20:52 (IST) 5 Jan 2023
IND vs SL: २०७ धावांचा पाठलाग करण्यासाठी भारतीय सलामीवीर मैदानात

२०७ धावांचा पाठलाग करण्यासाठी भारतीय सलामीवीर मैदानात आले आहेत. मात्र टीम इंडियाला मोठ्या भागीदारीची गरज आहे.

भारत ०-०

20:42 (IST) 5 Jan 2023
IND vs SL: दसून शनाकाची तुफानी खेळी, भारताला विजयासाठी २०७ धावांचे आव्हान

श्रीलंकेचा कर्णधार याने तुफानी खेळी करत २०० धावापर्यंत नेले. शनाका आणि चमिका करुणारत्ने यांच्यात अर्धशतकी भागीदारी केली. अवघ्या २२ चेंडूत ५६ धावा केल्या.

श्रीलंका २०६-६

https://twitter.com/BCCI/status/1611017820867014656?s=20&t=dM70xdY5_MN0LuT3KqnXXQ

20:35 (IST) 5 Jan 2023
IND vs SL: अर्शदीप नो बॉलची मालिका सुरूच

दसून शनाका बाद झाला मात्र तो नो बॉल निघाल्याने श्रीलंकेला पुन्हा जीवदान मिळाले.

श्रीलंका १८३-६

20:27 (IST) 5 Jan 2023
IND vs SL: श्रीलंकेच्या दीडशे धावा पूर्ण

श्रीलंकेच्या दीडशे धावा पूर्ण झाल्या. मात्र उमरान मलिकची हॅटट्रिक हुकली.

श्रीलंका १५८-६

20:20 (IST) 5 Jan 2023
IND vs SL: श्रीलंकेला सहावा धक्का

उमरान मलिकच्या धारदार गोलंदाजीवर वानिंदू हसरंगाला भोपळाही फोडता आला नाही. तो त्रिफळाचीत झाला.

श्रीलंका १३८-६

https://twitter.com/BCCI/status/1611011516836499463?s=20&t=DBe9IUEHXQaI5voG-u4MJg

20:16 (IST) 5 Jan 2023
IND vs SL: श्रीलंकेला पाचवा धक्का

उमरान मलिकने श्रीलंकेला चरित असलंकाच्या रूपाने पाचवा धक्का दिला. त्याने ३७ धावा केल्या.

श्रीलंका १३८-५

https://twitter.com/BCCI/status/1611011096382701569?s=20&t=DBe9IUEHXQaI5voG-u4MJg

20:09 (IST) 5 Jan 2023
IND vs SL: राहुल त्रिपाठीकडून शानदार क्षेत्ररक्षण

राहुल त्रिपाठीकडून शानदार क्षेत्ररक्षणचे प्रदर्शन केले. चरित असलंका धावबाद होताना थोडक्यात बचावला. त्यानंतर त्याने दोन षटकार मारले. चहलचे षटक महागात पडले.

श्रीलंका १२७-४

20:06 (IST) 5 Jan 2023
IND vs SL: श्रीलंकेला चौथा धक्का, अक्षरला दुसरी विकेट

भारताच्या फिरकीपटूंनी शानदार गोलंदाजी करत टीम इंडियाला सामन्यात परत आणले. चांगल्या सुरुवातीनंतर श्रीलंकेची पडझड झाली. धनंजया डी सिल्वा अवघ्या ३ धावा करून दिपक हुड्डाच्या हातात झेल देत बाद झाला.

श्रीलंका ११०-४

https://twitter.com/BCCI/status/1611008304985120768?s=20&t=ue_xf1iVcUJ4KEQdDxqvPw

19:56 (IST) 5 Jan 2023
IND vs SL: श्रीलंकेला तिसरा धक्का, राहुल त्रिपाठीचा शानदार झेल

अक्षर पटेलने शानदार गोलंदाजी करत भारताला तिसरी विकेट मिळवून दिली. सलामीवीर पाथुम निसांका ३५ चेंडूत ३३ धावा करून पदार्पण करणाऱ्या राहुल त्रिपाठीच्या हातात झेल देत बाद झाला.

श्रीलंका ९६-३

https://twitter.com/BCCI/status/1611005929276977152?s=20&t=6zqQ_qUHdXDDCJrUfxhwVw

19:44 (IST) 5 Jan 2023
IND vs SL: उमरानचा श्रीलंकेला दुसरा धक्का

उमरान मलिकने टिच्चून गोलंदाजी करत भानुका राजपक्षेला अवघ्या २ धावांवर बाद केले. त्याचा आग ओकणारा चेंडू फलंदाजाला समजला नाही.

श्रीलंका ८३-२

19:40 (IST) 5 Jan 2023
IND vs SL: श्रीलंकेला पहिला धक्का,

युजवेंद्र चहलने भारताला पहिली विकेट मिळवून दिली. त्याने अर्धशतक केलेल्या कुसल मेंडिसला ५२ धावांवर बाद केले.

श्रीलंका ८०-१

https://twitter.com/BCCI/status/1611001886215401472?s=20&t=KPc4Mk-ckRb5k_56LR004g

19:35 (IST) 5 Jan 2023
IND vs SL: कुसल मेंडिसचे अर्धशतक

कुसल मेंडिसने उमरान मलिकला थर्ड मॅनला षटकार मारत अर्धशतक पूर्ण केले.

श्रीलंका ७८-०

19:28 (IST) 5 Jan 2023
IND vs SL: पॉवर प्ले मध्ये श्रीलंकेची शानदार सुरुवात

श्रीलंकेच्या सलामीवीर पुण्यात एका वेगळ्या इराद्याने मैदानात उतरले आहेत, असे दिसत आहेत. कारण अर्शदीप सिंग, शिवम मावी या दोघांनी मिळून चार नो बॉल टाकले. याचा परिणाम म्हणजे श्रीलंकेला फटके मारायला अधिक सोपे केले. त्यामुळे सहा षटकात त्यांनी ५० चा आकडा पार करत अर्धशतकी भागीदारी केली.

श्रीलंका ५५-०

19:27 (IST) 5 Jan 2023
IND vs SL: भारतीय गोलंदाजांनी केला कहर

दुसऱ्या टी२० मध्ये भारतीय गोलंदाज शिस्तीत राहिले नाहीत. मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने एकूण सहा अतिरिक्त धावा दिल्या, मात्र दुसऱ्या टी२० मध्ये चार षटकांत भारतीय गोलंदाजांनी चार नो बॉल केले. अर्शदीप सिंगने सलग तीन नो बॉल केले आहेत.

श्रीलंका ४९-०

19:13 (IST) 5 Jan 2023
IND vs SL: अर्शदीपच्या एका षटकात नो बॉलची हॅटट्रिक

हार्दिक पांड्याच्या चांगल्या षटकानंतर अर्शदीपचे पहिले षटक चांगलेच महागात पडले. तब्बल १९ धावा दिल्या आणि त्यात नो बॉलची हॅटट्रिक केली.

श्रीलंका २१-०

18:56 (IST) 5 Jan 2023
IND vs SL: श्रीलंकेचे सलामीवीर मैदानात दाखल

श्रीलंकेचे सलामीवीर मैदानात फलंदाजीसाठी उतरले आहेत. मालिकेत बरोबरी करणार? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

https://twitter.com/BCCI/status/1610990721749889024?s=20&t=hEcOlqhcvck4i1qT6PrvoA

18:34 (IST) 5 Jan 2023
IND vs SL: टीम इंडिया प्लेईंग-११

आजच्या सामन्यात राहुल त्रिपाठीला अंतिम अकरा मध्ये स्थान देण्यात आले आहे. एमसीए हे एकप्रकारे त्याचे होम ग्राउंड आहे. हर्षल पटेलच्या जागी अर्शदीप सिंगची वर्णी लागली आहे.

https://twitter.com/BCCI/status/1610985172354367490?s=20&t=zzMUruNAnE_X_3KELhQfCA

18:32 (IST) 5 Jan 2023
IND vs SL: भारताने नाणेफेक जिंकून घेतला गोलंदाजीचा निर्णय

भारताचा कर्णधार हार्दिक पांड्याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

https://twitter.com/BCCI/status/1610984860017123329?s=20&t=gHCMSYrLpACEi2McJUMn8w

18:27 (IST) 5 Jan 2023
IND vs SL: हार्दिक पांड्या आणि दसून शनाकाची टी२० कामगिरी

हार्दिक पांड्या कर्णधार म्हणून मागील ६ सामन्यांत अपराजित राहिला आहे. पुण्यातील मागच्या ७ सामन्यात पहिल्या डावातील १७०+ धावांचा बचाव करण्यात यश आले होते. हार्दिकची पुण्यातील सर्वोच्च टी२० धावसंख्या फक्त ५७आहे.

शनाकाचे भारताविरुद्ध शेवटचे चार टी२० आंतरराष्ट्रीय कामगिरी ४५, ३३*, ७४*, ४७*

18:06 (IST) 5 Jan 2023
IND vs SL: काय रंग दाखवणार पुण्याची खेळपट्टी

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन गहुंजे येथील स्टेडियमची खेळपट्टी पाहिली तर पहिल्या डावात १६० आणि दुसऱ्या डावात १३० धावसंख्या अशी सर्वसाधारण सरासरी राहिली आहे. ही खेळपट्टी फलंदाजांसाठी पूरक असून फिरकीपटूंनाही चांगली मदत मिळते. मागील सामन्यांचे निकाल पाहिले तर या खेळपट्टीवर लक्ष्य मोठे नसले तर दुसऱ्यांदा फलंदाजी करताना संघ जिंकला आहे. कारण हिवाळ्यात दव हा एक मोठा घटक आहे जो विजय आणि पराभव यात फरक पाडतो.

18:00 (IST) 5 Jan 2023
IND vs SL: भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसन मालिकेतून पडला बाहेर

श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या टी२० सामन्यापूर्वी भारतीय संघासाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसन दुखापत झाली आहे. त्यामुळे तो उर्वरित मालिकेतून बाहेर पडला आहे.संजू सॅमसनला पहिल्या सामन्यात झेल घेताना गुडघ्याला दुखापत झाली होती, त्याच्या जागी जितेश शर्माचा भारतीय संघात समावेश केला आहे.

17:51 (IST) 5 Jan 2023
IND vs SL: भारत आणि श्रीलंका यांच्यात पुण्यात होणार काट्याची लढत

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन गहुंजे येथील स्टेडीयममध्ये भारत आणि श्रीलंका यांच्यात रोमांचक मुकाबला होणार असून त्यासाठी टीम इंडिया मैदानात दाखल झाली आहे.

https://twitter.com/BCCI/status/1610969854747738118?s=20&t=SCxAF2GD-OXPdxiuFguNqw

17:46 (IST) 5 Jan 2023
IND vs SL: मालिका विजयाच्या इराद्याने भारतीय संघ उतरणार आजच्या सामन्यात

हार्दिक पांड्या नेतृत्वाखालील युवा टीम इंडियाने पहिल्या रोमांचक सामन्यात शानदार प्रदर्शन केले. तो सामना दोन धावांनी जिंकत मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. आजचा सामना जिंकून टीम इंडिया मालिकेत विजयी आघाडी घेणार का हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

https://twitter.com/BCCI/status/1610961864531537920?s=20&t=SCxAF2GD-OXPdxiuFguNqw

 

India vs Sri Lanka 2nd T20I Highlights Score Updates:भारत विरुद्ध श्रीलंका टी२० हायलाइट्स अपडेट्स

भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसरा टी२० सामना एमसीए क्रिकेट स्टेडियमवर खेळला गेला. मालिका विजयाच्या उद्देशाने मैदानात उतरलेल्या भारतीय संघाला या सामन्यात हे उद्दिष्ट पूर्ण करण्यात अपयश‌ आले. श्रीलंका संघाने उत्कृष्ट सांघिक खेळ करत भारतीय संघाला १६ धावांनी पराभूत करण्यात यश मिळवले.

First published on: 05-01-2023 at 17:42 IST

संबंधित बातम्या