India vs Sri Lanka 3-Day Warm-up Match Schedule: शुबमन गिलच्या नेतृत्त्वाखाली भारताचा कसोटी संघ श्रीलंका दौऱ्यासाठी पोहोचला आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यातील दोन कसोटी सामन्यांची मालिका १५ ऑगस्टपासून सुरू होणार असली, तरी त्याआधी भारतीय संघ या शुक्रवारी, ७ ऑगस्टपासून एका सराव सामन्यात खेळणार आहे. हा सामना तीन दिवसांचा असेल. भारतीय वेळेनुसार हा सामना किती वाजता सुरू होणार आणि तो टीव्ही किंवा मोबाईलवर कसा पाहता येईल, जाणून घेऊया.

भारतीय संघ श्रीलंकेत ५ ऑगस्ट रोजी दाखल झाला असून संघाने सरावाला सुरूवात केली आहे. दरम्यान, ७ ऑगस्टपासून ‘श्रीलंका इलेव्हन’विरुद्ध टीम इंडियाचा तीन दिवसांचा सराव सामना सुरू होणार आहे. या सामन्यात मात्र सर्व भारतीय खेळाडू खेळताना दिसतील आणि श्रीलंकेतील काही आंतरराष्ट्रीय खेळाडूंचाही यात सहभाग अपेक्षित असणार आहे. या सामन्यामुळे भारतीय खेळाडूंना येथील स्थानिक हवामान आणि खेळपट्टीच्या परिस्थितीचा अंदाज येईल. दोन्ही संघांमधील दोन सामन्यांची कसोटी मालिका १५ ऑगस्टपासून सुरू होणार आहे. हा पहिला सामना भारतासाठी ऐतिहासिक असेल, कारण तो भारतीय संघाचा ६०० वा कसोटी सामना ठरेल.

भारत आणि श्रीलंका यांच्यातील सराव सामना हा भारतीय वेळेनुसार सकाळी १० वाजता सुरू होणार आहे. तर संध्याकाळी जवळपास ५ वाजेपर्यंत सामन्याचे सेशन खेळवले जातील. हा सराव सामना ३ दिवसांचा खेळवला जाणार असून रविवारी हा सामना संपणार आहे. दोन्ही संघांतील हा सराव सामना कोलंबोमध्ये खेळवला जाणार आहे. या सामन्यानंतर भारतीय संघ गॉलसाठी रवाना होईल, जिथे कसोटी मालिकेतील पहिला सामना खेळवला जाईल.

भारत-श्रीलंका सराव सामना लाईव्ह कुठे पाहता येणार?

भारत विरुद्ध श्रीलंका मालिका सोनी स्पोर्ट्स या टीव्ही चॅनेलवर पाहता येणार आहे. तर मोबाईलवर पाहण्यासाठी ‘सोनीलिव्ह’ (SonyLIV) ॲपचा वापर करावा लागेल. सराव सामन्यानंतर कसोटी मालिकादेखील याच अॅपवर व टीव्ही चॅनेलवर पाहावी लागणार आहे.

श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारताचा संघ

शुबमन गिल (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), साई सुदर्शन, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मानव सुतार, मोहम्मद सिराज, प्रसिध कृष्णा, गुरनूर ब्रार, देवदत्त पडिक्कल, सारांश जैन, आकिब नबी