scorecardresearch

IND vs SL 3rd T20 Highlights: नवीन वर्षात हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा श्रीलंकेवर तब्बल ९१ धावांनी विजय, मालिका २-१ ने जिंकली

India vs Sri Lanka 3rd T20I Highlights Updates: पुण्यातील पराभवाचा वचपा काढत हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ आज राजकोटमध्ये श्रीलंकेला ९१ धावांनी धूळ चारली

IND vs SL 3rd T20 Highlights: नवीन वर्षात हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा श्रीलंकेवर तब्बल ९१ धावांनी विजय, मालिका २-१ ने जिंकली
भारत विरुद्ध श्रीलंका टी२० लाइव्ह हायलाइट्स

India vs Sri Lanka 3rd T20 Highlights Score Updates: भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन सामन्यांच्या टी२० मालिकेतील अंतिम सामना शनिवारी, ७ जानेवारी रोजी राजकोटमध्ये खेळवला गेला. भारताने श्रीलंकेला धूळ चारत तब्बल ९१ धावांनी दणदणीत विजय मिळवला. राजकोट येथील सामन्यात भारतीय संघाचा विस्फोटक फलंदाज सूर्यकुमार यादव याने पुन्हा एकदा वादळी खेळी केली. त्याने यादरम्यान शतक झळकावत खास विक्रम आपल्या नावावर नोंदवला. त्याने युवराज सिंग आणि विराट कोहली यांच्यापेक्षा जास्त वेळा अशी कामगिरी करण्याचा मान मिळवला आहे. त्याला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. तर अक्षर पटेलला मालिकावीराच्या पुरस्काराने गौरविण्यात आले.

पहिल्या टी२० मध्ये टीम इंडियाने २ धावांनी विजय मिळवत १-० अशी आघाडी घेतली होती, तर पुण्यातील दुसऱ्या सामन्यात पाहुण्या संघाने पुनरागमन करत १६ धावांनी विजय मिळवून मालिकेत बरोबरी साधली होती. आता निर्णायक सामन्यात टीम इंडियाने शानदार कामगिरी करत नवीन वर्षातील पहिला मालिका विजय  नोंदवला. टीम इंडियाने हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली सलग तिसरी मालिका जिंकली. त्याचबरोबर श्रीलंकेने सामना जिंकण्यासाठी खूप प्रयत्न केले मात्र ते अपयशी ठरले.

सूर्यकुमार यादवने आंतरराष्ट्रीय टी२० मध्ये तिसरे शतक पूर्ण केले आहे. त्याने ४५ चेंडूत आपले शतक पूर्ण केले. सूर्याने गेल्या वर्षी इंग्लंड आणि न्यूझीलंडविरुद्ध शतके झळकावली होती. टी२० मध्ये भारताकडून तीन शतके झळकावणारा तो दुसरा फलंदाज ठरला आहे. रोहित शर्माची त्याच्यापेक्षा जास्त शतके आहेत. रोहितने टी२० मध्ये चार शतके झळकावली आहेत.

Live Updates

India vs Sri Lanka 3rd T20 Highlights Match Updates in Marathi: भारत विरुद्ध श्रीलंका टी२० हायलाइट्स अपडेट

22:11 (IST) 7 Jan 2023
IND vs SRI: श्रीलंकेला नववा धक्का

श्रीलंकेची शेवटची आशा असणारा कर्णधार दासुन शनाका २३ धावा करून बाद झाला. त्याला अर्शदीप सिंगने बाद केले.

श्रीलंका १३६-९

https://twitter.com/BCCI/status/1611764556115894273?s=20&t=dwQcaSn46U5Us3DnCshvgw

22:06 (IST) 7 Jan 2023
IND vs SRI: उमरान मलिकचे धारदार गोलंदाजीपुढे तीक्षणाचे लोटांगण

उमरान मलिकच्या जाळ काढणाऱ्या चेंडूवर महेश तीक्षणा अवघ्या २ धावांवर त्रिफळाचीत झाला.

श्रीलंका १२७-८

https://twitter.com/BCCI/status/1611763164630355971?s=20&t=oHO0HrDjSqOAlB2NiMRp5g

22:00 (IST) 7 Jan 2023
IND vs SRI: श्रीलंकेला सातवा धक्का

चमिका करुणारत्ने भोपळाही न फोडता हार्दिक पांड्याच्या गोलंदाजीवर पायचीत झाला.

श्रीलंका १२३-७

https://twitter.com/BCCI/status/1611761722670604288?s=20&t=9ngVnGJ0AdF9FLTJy0ACBA

21:53 (IST) 7 Jan 2023
IND vs SRI: श्रीलंकेला सहावा धक्का

वानिंदू हसरंगाने मोठा फटका मारताना तो ९ धावांवर बाद झाला. त्याला उमरान मलिकने दिपक हुड्डाकरवी झेलबाद केले.

श्रीलंका १०७-६

https://twitter.com/BCCI/status/1611760208069668864?s=20&t=-NHAG2UsNkrfXzGsRmhoUA

21:47 (IST) 7 Jan 2023
IND vs SRI: श्रीलंकेला पाचवा धक्का

धनंजया डी सिल्वा २२ धावा करून बाद झाला. त्याला युजवेंद्र चहलने शुबमन गिलकरवी झेलबाद केले.

श्रीलंका ९६-५

https://twitter.com/BCCI/status/1611758851514302466?s=20&t=Br5X5OCkGicudbjheoYsMw

21:39 (IST) 7 Jan 2023
IND vs SRI: श्रीलंकन डावाच्या १० षटकं पूर्ण, चरित असलंका बाद

मोठा फटका मारण्याच्या नादात चरित असलंका बाद झाला. तो १९ धावा करून चहलकरवी बाद झाला. शिवम मावीने त्याचा लॉंगला अप्रतिम झेल घेतला.

श्रीलंका ८४-४

https://twitter.com/BCCI/status/1611756481485107202?s=20&t=J5qK36PCkwvluG4j_hzi9A

21:23 (IST) 7 Jan 2023
IND vs SRI: श्रीलंकेला तिसरा धक्का

अविष्का फर्नांडो अवघी एक धाव करून कर्णधार हार्दिक पांड्याकरवी बाद झाला.

श्रीलंका ५१-३

https://twitter.com/BCCI/status/1611752241345744897?s=20&t=ojWgkhCBLhnsLCcNvh42Sw

21:19 (IST) 7 Jan 2023
IND vs SRI: श्रीलंकेला दुसरा धक्का

सलामीवीर पाथुम निसांका १५ धावा करून अर्शदीप सिंगच्या गोलंदाजीवर बाद झाला. शिवम मावीने त्याचा अफलातून झेल घेतला.

श्रीलंका ४४-२

https://twitter.com/BCCI/status/1611751003870879749?s=20&t=Q1uW6XzubOPg_FMc5YLA2g

21:13 (IST) 7 Jan 2023
IND vs SRI: श्रीलंकेला पहिला धक्का

कुसल मेंडीस २३ धावा करून बाद झाला. त्याला अक्षर पटेलने उमरान मलिककरवी झेलबाद केले.

श्रीलंका ४४-१

https://twitter.com/BCCI/status/1611749943940898817?s=20&t=oxbMedmtOnSI2Buh43BK_w

21:11 (IST) 7 Jan 2023
IND vs SRI: पॉवर प्ले श्रीलंकेची चांगली सुरुवात

धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेने चांगली सुरुवात केली आहे. कुसल मेंडीस आणि पाथुम निसांका या दोघांनी पॉवर प्ले मध्ये चौकार आणि षटकार मारले.

श्रीलंका ४४-०

20:48 (IST) 7 Jan 2023
IND vs SRI: २२९ धावांचा पाठलाग करण्यासाठी श्रीलंकेचे सलामीवीर मैदानात

२२९ धावांचा पाठलाग करण्यासाठी श्रीलंकेचे सलामीवीर मैदानात आले आहेत. भारताला पहिल्याच चेंडूवर विकेट मिळाली असती पण रिव्ह्यू घेतल्याने कुशल मेंडीस वाचला.

श्रीलंका ०-०

20:42 (IST) 7 Jan 2023
IND vs SRI: भारताने उभारला २२८ धावांचा डोंगर

सूर्यकुमार यादवच्या धडाकेबाज शतकाने भारताला २२८ धावांचे लक्ष उभारण्यात मदत केली. मालिका विजयासाठी श्रीलंकेला २२९ धावांचे मोठे लक्ष्य मिळाले आहे.

भारत २२८-५

https://twitter.com/ICC/status/1611741705899855872?t=Ug7aauUM0hmKlirTMKNkJw&s=08

20:37 (IST) 7 Jan 2023
IND vs SRI: भारताकडून सर्वात जलद शतक ठोकणाऱ्यांच्या यादीत सूर्या दुसऱ्या क्रमांकावर

भारताकडून सर्वात जलद शतक ठोकणाऱ्यांच्या यादीत सूर्या दुसऱ्या क्रमांकावर पोहचला आहे. त्याने ४५ चेंडूत शतक शतक ठोकले. याधी केएल राहुलने ४६ चेंडूत केले होते. रोहित शर्मा ३५ चेंडूत शतक करत अजूनही पहिल्या स्थानावर टिकून आहे.

भारत २२८-५

20:28 (IST) 7 Jan 2023
IND vs SRI: भारताच्या २०० धावा आणि सूर्यकुमारचे शतक

भारताचा 'द-स्काय' आणि मिस्टर ३६० अशी ओळख असणाऱ्या सूर्यकुमार यादवने शानदार शतक झळकावले. त्याने तिसरे शतक साजरे केले.

भारत २०१-५

20:21 (IST) 7 Jan 2023
IND vs SRI: दिपक हुड्डा बाद, भारताला पाचवा धक्का

एका बाजूला सूर्यकुमार खेळत असताना दुसऱ्या बाजूला मात्र विकेट्स पडत आहेत. दिपक हुड्डा केवळ ४ धावा करून बाद झाला.

भारत १८९-५

https://twitter.com/BCCI/status/1611736891015188482?s=20&t=_-yD-mvHzRE9fAhXzCHTAQ

20:17 (IST) 7 Jan 2023
IND vs SRI: मोठा फटका मारण्याच्या नादात हार्दिक पांड्या बाद

मोठा फटका मारण्याच्या नादात भारताचा कर्णधार हार्दिक पांड्या बाद झाला त्याने केवळ ४ धावा केल्या.

भारत १७४-४

https://twitter.com/BCCI/status/1611735470618316802?s=20&t=KgNCEqIto7dS0tIeGJpa8A

20:14 (IST) 7 Jan 2023
IND vs SRI: मिस्टर ३६० सूर्याचे अफलातून षटकार

आजच्या सामन्यात तीन षटकार त्याच्या खास ट्रेड मार्क शॉट मारले.

भारत १७४-३

20:10 (IST) 7 Jan 2023
IND vs SRI: भारताला तिसरा धक्का, शुबमन गिल बाद

श्रीलंकेला अखेर भागीदारी तोडण्यात यश आले. शुबमन गिलने ३६ चेंडूत ४६ धावा केल्या. त्याला वानिंदू हसरंगाने त्रिफळाचीत केले.

भारत १६३-३

https://twitter.com/BCCI/status/1611734376492195842?s=20&t=gsUKwpvgyMPuupKZSKMOKA

20:01 (IST) 7 Jan 2023
IND vs SRI: सूर्यकुमार यादवचे राजकोटमध्ये तांडव

'द-स्काय' अशी ओळख असणाऱ्या सूर्यकुमार यादव राजकोटच्या मैदानात श्रीलंकेच्या गोलंदाजासमोर तांडव करताना दिसत आहे. त्याने अवघ्या २६ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले.

भारत १३०-२

https://twitter.com/BCCI/status/1611731929593942022?s=20&t=059PrPhdpiTbi8PehpDr5g

19:52 (IST) 7 Jan 2023
IND vs SRI: मिस्टर ३६० ने मारला स्वीप षटकार

मिस्टर ३६० सूर्यकुमार यादवने चमिका करुणारत्नेला अफलातून त्याचा ट्रेड मार्क षटकार मारला.

भारत १०४-२

19:44 (IST) 7 Jan 2023
IND vs SRI: पहिल्या दहा षटकात भारताची सरासरी उत्तम

सूर्यकुमार यादव आणि शुबमन गिल या दोघांनी शानदार फटकेबाजी करत पहिल्या दहा षटकात सरासरी धावसंख्या उत्तम राखली आहे. असेच खेळत राहिले तर १८०-१९० धावा होतील असा अंदाज वर्तवला जात आहे.

भारत ९२-२

19:29 (IST) 7 Jan 2023
IND vs SRI: भारताला दुसरा धक्का

मोठा फटका मारण्याच्या नादात राहुल त्रिपाठी ३५ धावांवर बाद झाला. त्याला चमिका करुणारत्नेने दिलशान मदुशंकाकरवी झेलबाद केले.

भारत ५२-२

https://twitter.com/BCCI/status/1611723828933324801?s=20&t=KJCtvDiDpI0BImpsUvnq0A

19:27 (IST) 7 Jan 2023
IND vs SRI: पॉवर प्ले मध्ये भारताची चांगली सुरुवात, भारताचे अर्धशतक पूर्ण

शुबमन गिल आणि राहुल त्रिपाठी यांनी डाव सावरत भारताला चांगली सुरुवात करून दिली. निर्णायक सामन्यात टीम इंडियाला मोठी धावसंख्या उभारावी लागणार आहे. दोघांमध्ये अर्धशतकी भागीदारी झाली.

भारत ५२-१

https://twitter.com/BCCI/status/1611724260820799488?s=20&t=I9N_RsVDJQ-CBbG_d2O3jw

19:21 (IST) 7 Jan 2023
IND vs SRI: पहिल्या विकेट नंतर शुबमनची फटकेबाजी

इशान किशन बाद झाल्यानंतर शुबमन गिलने षटकार आणि चौकार मारत दबाव कमी करण्याचा प्रयत्न केला. राहुल त्रिपाठीने देखील त्याला दोन चौकार मारून चांगली साथ देत आहे.

भारत ३१-१

19:12 (IST) 7 Jan 2023
IND vs SRI: कसून रजिथाचे निर्धाव षटक

रजिथाने 'कसून' गोलंदाजी करत भारतीय डावाचे दुसरे षटक निर्धाव टाकले.

भारत ७-१

19:04 (IST) 7 Jan 2023
IND vs SRI: भारताला पहिला धक्का, इशान किशन बाद

पहिल्याच षटकात स्लीपमध्ये झेल देत इशान किशन अवघी १ धाव करून बाद झाला. त्याला दिलशान मदुशंकाने बाद केले.

भारत ३-१

https://twitter.com/BCCI/status/1611717875479506947?s=20&t=IYtCOYLIncYdIivl7AySbA

19:00 (IST) 7 Jan 2023
IND vs SRI: भारताचे सलामीवीर खेळपट्टीवर दाखल

भारताचे सलामीवीर शुबमन गिल आणि इशान किशन खेळपट्टीवर दाखल झाले असून टीम इंडियाला मोठ्या भागीदारीची गरज आहे.

भारत ०-०

https://twitter.com/BCCI/status/1611715674833051648?s=20&t=byaJh9svWBjzlC26dEro2Q

18:39 (IST) 7 Jan 2023
IND vs SRI: श्रीलंका प्लेईंग ११

श्रीलंकेने अंतिम अकरामध्ये एक बदल केला आहे. भानुका राजपक्षे ऐवजी अविष्का फर्नांडोला संधी देण्यात आली.

https://twitter.com/BCCI/status/1611710863370747904?s=20&t=TWIoWgy5CCOXR6Lc068cFA

18:33 (IST) 7 Jan 2023
IND vs SRI: हार्दिक पांड्याने नाणेफेक जिंकत घेतला फलंदाजीचा निर्णय

हार्दिक पांड्याने नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला. मुरली कार्तिकशी बोलून झाल्यावर त्याने श्रीलंकेचा कर्णधार दसून शनाकाला 'ALL THE BEST BOY' असे म्हटले.

https://twitter.com/BCCI/status/1611710021007736832?s=20&t=DQ1-9vLZx1en1Y7xHm7gaQ

18:26 (IST) 7 Jan 2023
IND vs SRI: पुण्यातील हिरो ठरलेला अक्षर पटेल होम ग्राउंडवर दाखवणार का जलवा?

पुण्यातील हिरो ठरलेला अक्षर पटेल होम ग्राउंडवर दाखवणार का जलवा? हे आजच्या सामन्यात लवकरच कळणार समजेल. तो मुळचा आनंद जिल्ह्यातील आहे. मागच्या सामन्यात ४ विकेट्स घेत त्याने २४ धावा दिल्या. फलंदाजीतील योगदानाबद्दल बोलायचे झाले तर ६५ धावा घेत त्याने भारताला विजयानजीक नेले होते. मात्र तो बाद झाला आणि भारताचा पराभव झाला.

18:18 (IST) 7 Jan 2023
IND vs SRI: राजकोटमध्ये भारताची कामगिरी

राजकोटच्या मैदानावर भारतीय संघ गेली ६ वर्षे अजिंक्य आहे. येथे झालेल्या एकूण ४ सामन्यांपैकी भारताला तीन सामन्यात विजय आणि एका सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले. २०१७ मध्ये न्यूझीलंडने भारताचा ४० धावांनी पराभव केला होता.

18:16 (IST) 7 Jan 2023
IND vs SRI: राजकोटच्या सौराष्ट्र क्रिकेट स्टेडियमवर पहिल्या डावातील सरासरी

राजकोटच्या सौराष्ट्र क्रिकेट स्टेडियमवर पहिल्या डावातील सरासरी धावसंख्या १७९ आणि दुसऱ्या डावात १४९ अशी आहे. फिरकीपटूंना येथे अनेकदा मदत मिळते. वेगवान गोलंदाज संथ चेंडूंचा फायदा घेताना दिसतात. त्याचबरोबर दुसऱ्या डावातही दव प्रभावी ठरू शकतो.

18:15 (IST) 7 Jan 2023
IND vs SRI: अर्शदीप सिंगला आजच्या सामन्यात संधी मिळणार का?

पुण्यातील दुसऱ्या टी२० सामन्यात अर्शदीप सिंग याच्या वाईट कामगिरीमुळे त्याला तिसऱ्या सामन्यात खेळायला मिळणार की नाही यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अशात भारताच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये कोणाला जागा मिळू शकते हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. भारताचा युवा गोलंदाज अर्शदीप सिंग याने दुसऱ्या टी२० मध्ये २ षटकात तब्बल ५ नो-बॉल टाकले होते. त्याने पहिल्या षटकातच नो-बॉलची हॅटट्रिक पूर्ण केली होती.

18:12 (IST) 7 Jan 2023
IND vs SRI: काय रंग दाखवणार राजकोटची खेळपट्टी

राजकोट येथील सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर हा सामना होणार आहे. येथे सर्वोच्च धावसंख्या २०२ धावांची आहे. दुसरीकडे, सर्वात कमी धावसंख्येबद्दल बोलायचे तर, ती ८७ धावांची होती, जी दक्षिण आफ्रिकेच्या नावावर आहे. येथे धावांची सरासरी १६४ आहे, अशा स्थितीत फलंदाजांवर विश्वास व्यक्त केला जाऊ शकतो. हवामान राजकोटमध्ये नेहमी कोरडे असते. सध्या हिवाळा सुरु असल्याने रात्रीच्या सामन्यात दवाचा परिणाम अधिक होतो. मात्र पहिल्या दोन्ही सामन्यात ज्यांनी पहिले फलंदाजी केली आहे तेच विजयी झाले आहेत. त्यामुळे आजच्या सामन्यात नाणेफेक जिंकून दोन्ही कर्णधार काय निर्णय घेतात हे पाहणे महत्वाचे असेल.

18:06 (IST) 7 Jan 2023
IND vs SRI: भारतीय संघाचे राजकोटमध्ये झाले जोरदार स्वागत

राजकोटच्या स्टेडियममध्ये पोहचताच टीम इंडियाचे जोरदार चाहत्यांनी जल्लोष करत स्वागत केले. आतापर्यत भारताने मायदेशात एकही मालिका गमावली नाही. हार्दिक पांड्या हा विक्रम कायम ठेवतो हे पाहणे उत्सुकतेचे असणार आहे.

https://twitter.com/BCCI/status/1611368716763299841?s=20&t=GKuqWay5xMUDWEEqSGQ9Wg

18:03 (IST) 7 Jan 2023
IND vs SRI: हार्दिक पांड्या भारतात पहिली मालिका जिंकणार का? याकडे लक्ष

भारत आणि श्रीलंका यांच्यात टी२० मालिकेतील तिसरा आणि निर्णायक असा अखेरचा सामना राजकोटला खेळणार आहे. पुण्यातील पराभवाचे उट्टे काढण्याची हार्दिक ब्रिगेडला मोठी संधी असून ते काढण्यासाठी ते पूर्णपणे सज्ज आहेत.

https://twitter.com/BCCI/status/1611696062460497921?s=20&t=GKuqWay5xMUDWEEqSGQ9Wg

India vs Sri Lanka 3rd T20 Highlights Match Updates in Marathi: भारत विरुद्ध श्रीलंका टी२० हायलाइट्स अपडेट

पुण्यातील पराभवाचा वचपा काढत हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ आज राजकोटमध्ये श्रीलंकेला ९१ धावांनी धूळ चारली

First published on: 07-01-2023 at 17:24 IST

संबंधित बातम्या