IND vs SL 3rd T20 Highlights Today, 30 July 2024 : भारत आणि श्रीलंका यांच्यातील तिसरा टी-२० सामना पल्लेकेलेच्या मैदानावर खेळवला गेला. या सामन्यात श्रीलंकेचा कर्णधार चरिथ असलंकाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने श्रीलंकेच्या संघाला १३८ धावांचे लक्ष्य दिले. यानंतर श्रीलंकेचा संघ २० षटकांत १३७ धावा करू शकला. यासह सामना बरोबरीत राहिला. ज्यामुळे सामना निकालासाठी सुपर ओव्हरमध्ये पोहोचला. ज्यामध्ये श्रीलंकेने भारताला ३ धावांचे लक्ष्य दिले, जे टीम इंडियाचा कर्णधार सूर्याने चौकार मारुन पूर्ण केले. त्याचबरोबर तीन सामन्यांच्या मालिकेत श्रीलंकेला ३-० ने क्लीन स्विप दिला.