IND vs SL : मॅच सुरू होण्यापूर्वीच भारताच्या कर्णधारानं केलं सेलिब्रेशन..पाहा व्हिडिओ

नाणेफेक होतात धवननं मांडी थोपटली आणि आनंद साजरा केला.

india vs sri lanka shikhar dhawan celebrates after winning the toss video goes viral
भारत वि. श्रीलंका

श्रीलंका दौर्‍यावर टीम इंडियाचा कर्णधार असलेला शिखर धवन आपल्या मस्तमौला शैलीसाठी ओळखला जातो. हीच शैली त्याने श्रीलंकेविरुद्धच्या तिसर्‍या एकदिवसीय सामन्यात दर्शवली. सहसा खेळाडू सामन्यादरम्यान उत्सव साजरा करतात, परंतु नाणेफेक जिंकल्यानंतरच धवनने आनंद साजरा केला. श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेच्या पहिल्या दोन सामन्यांमध्ये धवनने नाणेफेक गमावली होती, परंतु तिसऱ्या वनडे सामन्यात नाणेफेक जिंकताच त्याने स्वतःच्या शैलीत ‘थाई फाइव्ह’ साजरे केले.

धवनचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे आणि चाहत्यांनाही हा व्हिडिओ आवडला आहे. तिसर्‍या वनडेमध्ये नाणेफेक जिंकल्यानंतर भारताने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. या मालिकेत प्रथमच भारताला प्रथम फलंदाजीची संधी मिळाली. २३ षटकात टीम इंडियाने ३ फलदाजांना गमावत १४७ धावा केल्या. त्यानंतर सामना पावसामुळे थांबवण्यात आला. वेळ वाया गेल्यामुळे हा सामना प्रत्येकी ४७ षटकाचा खेळवण्यात येत आहे.

 

हेही वाचा – टी-२० वर्ल्डकप फायनलमध्ये पाकिस्तान भारताला हरवणार – शोएब अख्तर

नाणेफेक जिंकल्यानंतर धवनने टीम इंडियात एक-दोन नव्हे, तर सहा बदल केले. त्यापैकी पाच खेळाडूंना वनडे कॅप देण्यात आली. या सामन्यात संजू सॅमसन, नितीश राणा, चेतन साकारिया, कृष्णप्पा गौतम आणि राहुल चहर यांनी पदार्पण केले. डावखुरा वेगवान गोलंदाज नवदीप सैनीचा देखील प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश होता.

वनडे क्रिकेट सुरू झाल्यापासून टीम इंडियात दुसऱ्यांदा पाच खेळाडूंनी एकावेळी पदार्पण केले आहे. १९८०मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताकडून पाच खेळाडूंनी पदार्पण केले होते. दिलीप दोशी, किर्ती आझाद, संदीप पाटील, तिरुमालाई श्रीनिवासन, रॉजर बिन्नी या पाच खेळाडूंनी पदार्पण केले होते. हा सामना मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर खेळवण्यात आला होता.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: India vs sri lanka shikhar dhawan celebrates after winning the toss video goes viral adn

ताज्या बातम्या