Team India Schedule Of IND vs SL Tour: भारतीय संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. दोन्ही संघांमध्ये ५ टी-२० आणि ३ वनडे सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. ही मालिका सुरू असताना श्रीलंका क्रिकेट बोर्डाकडून भारताच्या श्रीलंका दौऱ्याची घोषणा करण्यात आली आहे. भारतीय संघ ऑगस्ट महिन्यात श्रीलंकेविरुद्ध २ कसोटी सामन्यांची मालिका खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे. ही मालिका वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेचा भाग असणार आहे. त्यामुळे ही मालिका अतिशय महत्वाची असणार आहे. दरम्यान जाणून घ्या या मालिकेचं संपूर्ण वेळापत्रक.

ऑगस्ट महिन्यात २ कसोटी सामन्यांची मालिका

भारतीय कसोटी संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी युवा फलंदाज शुबमन गिलकडे आहे. गिलच्या नेतृत्वाखाली खेळणारा भारतीय संघ श्रीलंका दौऱ्यावर आहे. दोन्ही संघांमध्ये २ कसोटी सामन्यांची खेळवली जाणार आहे. मुख्य बाब म्हणजे, ही मालिका वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेचा भाग असणार आहे. त्यामुळे भारतीय संघाकडे गुणतालिकेत वर येण्याची सुवर्णसंधी असणार आहे. भारतीय संघाला या सर्धेत हवी तशी कामगिरी करता आलेली नाही. त्यामुळे दोन्ही सामने जिंकून भारतीय संघ आपली गुणतालिकेतील स्थिती सुधारण्याचा प्रयत्न करताना दिसेल.

भारत – श्रीलंका मालिका केव्हा सुरू होणार?

भारत आणि श्रीलंका या दोन्ही संघांमध्ये होणारी मालिका १५ ऑगस्टपासून सुरू होणार आहे. पहिला कसोटी सामना १५ ऑगस्ट ते १९ ऑगस्टदरम्यान गॉलच्या मैदानावर खेळवला जाणार आहे. तर मालिकेतील दुसरा सामना २३ ते २७ ऑगस्टदरम्यान खेळवला जाणार आहे. हा सामना कोलंबोत खेळवला जाणार आहे.

भारत – श्रीलंका मालिकेचं संपूर्ण वेळापत्रक

पहिला कसोटी सामना – १५ ते १९ ऑगस्ट, गॉल

दुसरा कसोटी सामना – २३ ते २७ ऑगस्ट, कोलंबो

भारतीय संघाचं वेळापत्रक सध्या खूप व्यस्त आहे. आयपीएल २०२६ स्पर्धा झाल्यानंतर भारतीय संघ अफगाणिस्तानविरुद्ध कसोटी आणि वनडे सामन्यांची मालिका खेळण्यासाठी मैदानात उतरला होता. या मालिकेनंतर टी-२० मालिकेसाठी आयर्लंड दौऱ्यावर रवाना झाला. सध्या भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर आहे. या दौऱ्यावर टी-२० आणि वनडे सामन्यांची मालिका झाल्यानंतर भारतीय संघ श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे.