IND-W vs SL-W 5th T20I Live Cricket Score: भारत आणि श्रीलंका या दोन्ही संघांमधील ५ टी-२० सामन्यांच्या मालिकेतील शेवटच्या सामन्यात भारतीय संघाने श्रीलंकेसमोर विजयासाठी १७६ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेला १६० धावांपर्यंत मजल मारता आली. हा सामना भारतीय संघाने १५ धावांनी आपल्या नावावर केला.

India Women vs Sri Lanka Women 5th T20I Match: या सामन्यात भारतीय संघाने श्रीलंकेवर १५ धावांनी विजय मिळवला आहे.
IND vs SL Live: टीम इंडियाचा दमदार विजय
भारतीय संघाने श्रीलंकेसमोर विजयासाठी १७६ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेला १६० धावांपर्यंत मजल मारता आली. हा सामना भारतीय संघाने १५ धावांनी आपल्या नावावर केला.
IND vs SL Live Score: श्रीलंकेला सातवा धक्का
श्रीलंकेला सातवा धक्का बसला आहे. समरविक्रमा अवघ्या ८ धावा करत माघारी परतली आहे. श्रीलंकेला अजूनही ३४ धावांची गरज आहे.
IND vs SA Live: श्रीलंकेचा निम्मा संघ तंबूत
श्रीलंकेचा डाव सावरणारी हसिनी परेरा ६५ धावा करून माघारी परतली आहे.
IND vs SL Live: दीप्ती शर्माने घडवला इतिहास! असा रेकॉर्ड करणारी ठरली पहिलीच खेळाडू
दीप्ती शर्मा ही महिलांच्या टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक गडी बाद करणारी गोलंदाज ठरली आहे.
IND vs SL Live Score: इमेशा दुलानीचं अर्धशतक
धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेकडून इमेशा दुलानीने आपल्या टी-२० आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील पहिलं अर्धशतक झळकावलं आहे.
IND vs SL Live: श्रीलंकेला पहिला धक्का! दीप्ती शर्माने घेतला भन्नाट कॅच
श्रीलंकेला पहिला मोठा धक्का बसला आहे. कर्णधार चमारी अटापटू माघारी परतली आहे.
IND vs SL Live:हरमनप्रीत कौरची दमदार अर्धशतकी खेळी! टीम इंडियाने श्रीलंकेसमोर ठेवलं इतक्या धावांचं आव्हान
या सामन्यातील पहिल्या डावात फलंदाजी करताना भारतीय संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरने ६८ धावांची खेळी केली . भारतीय संघाने २० षटकांअखेर ७ गडी बाद २७५ धावा केल्या आहेत.
IND vs SL Live: कर्णधार हरमनप्रीत कौर परतली माघारी
अखेर कर्णधार हकमनप्रीत कौरच्या खेळीचा शेवट झाला आहे. ती ६८ धावा करत माघारी परतली आहे.
IND vs SL Live Score: भारतीय संघाला सहावा धक्का
भारतीय संघाला सहावा धक्का बसला आहे. अमनजोत २१ धावा करत माघारी परतली आहे.
IND vs SL Live Score: हरमनप्रीत कौरचं अर्धशतक
भारतीय संघाला एकापाठोपाठ एक धक्के बसत असताना हरमनप्रीत कौर खंबीरपणे उभी राहिली. तिने अर्धशतक पूर्ण केलं आहे.
IND vs SL Live Score: भारतीय फलंदाजांचा फ्लॉप शो! निम्मा संघ परतला तंबूत
भारताचा निम्मा संघ तंबूत परतला आहे. दीप्ती शर्मा ७ धावांवर माघारी परतली आहे.
IND vs SL Live: हरलिन देओल परतली माघारी! भारताचे ३ फलंदाज बाद
हरलिन देओल अवघ्या १३ धावा करून माघारी परतली आहे.
IND vs SL Live Score: पावरप्ले
भारतीय संघाने पावरप्लेमध्ये फलंदाजी करताना २ गडी बाद ४० धावा केल्या आहेत.
IND vs SL Live: भारतीय संघाला दुसरा धक्का ! जी कमलिनी स्वस्तात परतली माघारी
भारतीय संघाला दुसरा मोठा धक्का बसला आहे. जी कमलिनी १२ धावा करून माघारी परतली आहे.
IND vs SL Live: भारतीय संघाला पहिला मोठा धक्का! शफाली वर्मा स्वस्तात परतली माघारी
भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. शफाली वर्मा अवघ्या ५ धावांवर माघारी परतली आहे.
Ind vs Sl live score: या सामन्यासाठी अशी आहे दोन्ही संघांची प्लेईंग ११
श्रीलंका महिला: हसिनी परेरा, चमारी अटापटू (कर्णधार), इमेशा दुलानी, हर्षिता समरविक्रमा, कविशा दिलहारी, निलाक्षीका सिल्वा, रश्मिका सेवावंडी, कौशानी नुथ्यांगना (यष्टिरक्षक), निमाशा मधुशानी, इनोका रणवीरा, मल्कीरा
भारतीय संघ : शफाली वर्मा, जी कमलिनी, ऋचा घोष (यष्टिरक्षक), हरमनप्रीत कौर (कर्णधार), हरलीन देओल, दीप्ती शर्मा, अमनजोत कौर, स्नेह राणा, अरुंधती रेड्डी, वैष्णवी शर्मा, श्री चरणी.
Ind vs sl live: या सामन्यासाठी अशी असू शकते भारतीय संघाची प्लेईंग ११:
शफाली वर्मा, स्मृती मानधना, जेमिमा रॉड्रिग्स/हरलीन देओल, हरमनप्रीत कौर (कर्णधार), अमनजोत कौर, ऋचा घोष/जी कमालिनी (यष्टिरक्षक), दीप्ति शर्मा, वैष्णवी शर्मा, अरुंधति रेड्डी, रेणुका सिंग, एन श्री चरणी.
IND-W vs SL- W Highlights: भारत विरुद्ध श्रीलंका महिला पाचव्या टी-२० सामन्याचे हायलाईट्स
