India Women vs Sri Lanka Women Final Live Cricket Score: वर्ल्डकपविजेत्या भारतीय संघाने संपूर्ण स्पर्धेत दिमाखदार कामगिरी करत आशिया चषकाच्या जेतेपदावर कब्जा केला. फायनलच्या मुकाबल्यात भारतीय संघाने श्रीलंकेवर ७२ धावांनी दणदणीत विजय मिळवला.

Live Updates

INDIA VS SRI LANKA WOMENS ASIA CUP 2026 FINAL LIVE SCORE UPDATES: भारत विरुद्ध श्रीलंका महिला आशिया चषक फायनल लाईव्ह स्कोअर अपडेट्स

23:24 (IST) 13 Sep 2026

भारत अजिंक्य; स्मृती-शफाली-श्री चरणी चमकल्या

भारतीय संघाने दिलेल्या १८४ धावांच्या लक्ष्यासमोर खेळताना श्रीलंकेचा डाव १११ धावांत आटोपला आणि भारतीय संघाने आशिया चषक स्पर्धेच्या जेतेपदावर कब्जा केला.

23:04 (IST) 13 Sep 2026

श्रीलंकेची पडझड सुरूच

मोठ्या लक्ष्यासमोर खेळताना टीम इंडियाची पडझड सुरूच आहे. कर्णधार चामरी अट्टापट्टूला गमावल्यानंतर श्रीलंकेच्या डावाची लय हरवली आहे.

22:44 (IST) 13 Sep 2026

श्रीलंकेने झटपट गमावल्या २ विकेट्स

दीप्ती शर्माने एका ओव्हरमध्ये २ विकेट्स पटकावत सामन्याचं पारडं भारताच्या बाजूने झुकवलं आहे.

21:38 (IST) 13 Sep 2026

IND vs SL Women's Asia Cup Final 2026: टीम इंडिया १८३

स्मृती मानधना आणि शफाली वर्मा यांच्या तडाखेबंद सलामीच्या बळावर भारतीय संघाने आशिया चषकाच्या फायनलमध्ये १८३ धावांची मजल मारली आहे. स्मृती-शफाली जोडी फुटल्यानंतर टीम इंडियाची घसरगुंडी उडाली.

21:06 (IST) 13 Sep 2026

IND vs SL Women's Asia Cup Final 2026: स्मृतीची खेळी संपुष्टात

कर्णधार हरमनप्रीत कौरबरोबर एकेरी धाव घेताना झालेल्या गोंधळात स्मृती मानधनाने आपली विकेट गमावली. हरमनप्रीतने चेंडू तटवून काढला आणि धावेसाठी विचारणा केली. दोघींनीही वेग पकडला नव्हता. अचूक थ्रोच्या बळावर स्मृती बाद झाली. तिने ३९ चेंडूत ५९ धावांची खेळी केली. या स्पर्धेत रनआऊट होण्याची तिची तिसरी वेळ आहे.

21:01 (IST) 13 Sep 2026

IND vs SL Women's Asia Cup Final 2026: शफाली वर्मा तंबूत

३९ चेंडूत ६८ धावांची खेळी करून शफाली वर्मा बाद झाली. प्रबोदाने तिला बाद केलं. शफाली-स्मृती जोडीने १२९ धावांची खणखणीत सलामी दिली.

20:53 (IST) 13 Sep 2026

IND vs SL Women's Asia Cup Final 2026: स्मृती मानधनाचे खणखणीत अर्धशतक

शेफाली वर्माच्या पाठोपाठ स्मृती मानधनानेही अवघ्या ३५ चेंडूत अर्धशतक साकारले आहे.

20:50 (IST) 13 Sep 2026

IND vs SL Women's Asia Cup Final 2026: १० षटकानंतर भारताच्या ९८ धावा

१० षटक अखेर भारतीय महिला संघाने ९८ धावा ठोकल्या.

20:35 (IST) 13 Sep 2026

शफाली वर्माचं अर्धशतक

दिलहारीच्या बॉलिंगवर चौकार लगावत शफाली वर्माने २४ चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं.

20:24 (IST) 13 Sep 2026

श्रीलंकेची विश्मी गुणरत्ने दुखापतग्रस्त

श्रीलंकेची विश्मी गुणरत्ने फिल्डिंग करताना दुखापतग्रस्त झाली आहे. तिच्या पायाला दुखापत झाली. दुखापतीचं स्वरुप गंभीर असल्याने तिला स्ट्रेचरवरून मैदानाबाहेर उपचारांसाठी नेण्यात आलं.

20:10 (IST) 13 Sep 2026

टीम इंडियाची आक्रमक सुरुवात

स्मृती मानधना आणि शफाली वर्मा यांनी पॉवरप्लेमध्ये आक्रमक सुरुवात केली आहे.

20:03 (IST) 13 Sep 2026

स्मृती मानधनाची चौकारासह सुरुवात

दमदार फॉर्मात असलेल्या स्मृती मानधनाने खणखणीत चौकारासह सुरुवात केली.

19:44 (IST) 13 Sep 2026

दोन्ही संघ असे आहेत

भारत- स्मृती मानधना, शफाली वर्मा, जी कमालिनी, हरमनप्रीत कौर (कर्णधार), ऋचा घोष (यष्टीरक्षक), भारती फुलमाळी, दीप्ती शर्मा, प्रेमा रावत, क्रांती गौड, श्री चरणी, नंदनी शर्मा

श्रीलंका- इमेशा दुलानी, चामरी अट्टापट्टू (कर्णधार), विश्मी गुणरत्ने, हसिनी परेरा, हर्षिता समराविक्रमा, कविशा दिलारी, निलाशिका सिल्व्हा, कौशिनी नुथयागंना (यष्टीरक्षक), सुगंदिका कुमारी, चामुदी प्रबोदा, मिथाली अयोध्या

19:37 (IST) 13 Sep 2026

भारतीय संघाने टॉस जिंकला, बॅटिंगचा निर्णय

भारतीय संघाने श्रीलंकेविरुद्धच्या आशिया चषकाच्या फायनलमध्ये टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला आहे.

India Beat Pakistan by 7 wickets sree charani prema rawat shafali verma wicket harmanpreet kaur Womens asia cup

INDIA VS SRI LANKA WOMENS ASIA CUP 2026 FINAL LIVE SCORE UPDATES: भारत विरुद्ध श्रीलंका महिला आशिया चषक फायनल लाईव्ह स्कोअर अपडेट्स