India vs Srilanka 1st Test Day 2 Live Updates: भारत आणि श्रीलंका या दोन्ही संघांमध्ये २ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला कसोटी सामना गॉलच्या मैदानावर सुरू आहे. या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. सुरुवातीच्या दोन्ही दिवसात भारतीय संघाचा बोलबाला पाहायला मिळाला आहे. भारतीय संघाने २ दिवसाअखेर ९ गडी बाद ४६० धावा केल्या आहेत.
दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला! टीम इंडियाने उभारला ४६० धावांचा डोंगर
भारतीय संघाने दुसऱ्या दिवसाअखेर ९ गडी बाद ४६० धावा केल्या आहेत.
अर्धशतक झळकावल्यानंतर ध्रुव जुरेल परतला माघारी! टीम इंडियाचे ७ फलंदाज तंबूत
भारतीय संघाला सातवा धक्का बसला आहे. अर्धशतक झळकावल्यानंतर जुरेल ५१ धावांवर माघारी परतला आहे.
ध्रुव जुरेलचं दमदार अर्धशतक! टीम इंडिया ४०० पार
ध्रुव जुरेलने ६६ चेंडूंचा सामना करत दमदार अर्धशतकी खेळी केली आहे.
पडिक्कल पाठोपाठ जडेजाही परतला माघारी! टीम इंडियाचे ६ फलंदाज तंबूत
भारतीय संघाला सहावा मोठा धक्का बसला आहे. रवींद्र जडेजा अवघ्या १३ धावा करुन माघारी परतला आहे.
भारताचा निम्मा संघ तंबूत! देवदत्त पडिक्कल परतला माघारी
देवदत्त पडिक्कल १६७ धावा करुन माघारी परतला आहे.
केएल राहुल परतला माघारी
भारतीय संघाला चौथा धक्का बसला आहे. केएल राहुल पुन्हा एकदा फलंदाजी करण्यासाठी मैदानात आला. पण तो ८१ धावांवर माघारी परतला आहे.
पाऊस थांबला! दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरु; किती षटकांचा खेळ होणार? वाचा लेटेस्ट अपडेट
दुसऱ्या दिवसातील खेळ सुरु झाला आहे. दुसरे सत्र २:३५ ते ४ पर्यंत असणार आहे. त्यानंतर २० मिनिटांचा टी ब्रेक असेल. त्यानंतर ४:२० ते ५:४५ पर्यंत तिसऱ्या सेशनचा खेळ सुरु राहिल.
सामना किती वाजता सुरु होणार?
पावसामुळे दुसऱ्या दिवसाचा खेळ अजूनही सुरु होऊ शकलेला नाही. आता पाऊस थांबला असून लंच ब्रेक घेण्यात आला आहे. कव्हर्स काढण्यात आले आहेत. त्यामुळे १२ वाजून २० मिनिटांनी सामना पुन्हा सुरु होऊ शकतो, असं म्हटलं जात आहे
पाऊस थांबला
पावसामुळे सामना सुरु होण्यास बराच उशीर झाला आहे. पण आता पाऊस थांबला असून लवकरच सामन्याला सुरुवात होऊ शकते.
सामना सुरू होण्यास उशीर
भारत आणि श्रीलंका या दोन्ही संघांमध्ये सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यातील पहिल्या दिवशीही पावसाचा जोर पाहायला मिळाला होता. आता दुसऱ्या दिवशीही पावसामुळे सामना सुरू होऊ शकलेला नाही. पाऊस सुरू असल्याने सामना सुरू होण्यास आणखी उशीर होऊ शकतो
