India vs Srilanka 2nd Test Live Score: भारत आणि श्रीलंका या दोन्ही संघांमधील २ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा कसोटी सामना कोलंबोत पार पडला. या सामन्यातील पहिल्या डावात फलंदाजी करताना भारतीय संघाने ५०० धावांचा डोंगर उभारला होता. प्रत्युत्तरात श्रीलंकेने २९० धावा केल्या. त्यानंतर भारतीय संघाने श्रीलंकेला फॉलोऑन दिला. पण भारतीय गोलंदाज विकेट्स घेण्यात अपयशी ठरले. तर सोनल दिनुशाने दमदार शतकी खेळी केली आणि सामना ड्रॉ करण्यात मोलाची भूमिका बजावली. भारतीय संघाकडे हा सामना जिंकण्याची सुवर्णसंधी होती. पण सोनलने शतक झळकावून श्रीलंकेला २०० धावांची आघाडी मिळवून दिली.

श्रीलंकेचे ९ फलंदाज तंबूत! आघाडी २०० धावांच्या जवळ

श्रीलंकेला नववा धक्का बसला आहे. कुमारा बाद होऊ माघारी परतला आहे. श्रीलंका २०० धावांची आघाडी घेण्याच्या अगदी जवळ पोहोचला आहे.

दिनूशाच्या नावे दुर्मीळ विक्रम

फॉलोऑन मिळालेल्या संघाकडून दोन्ही डावात शतक झळकावणाऱ्या मोजक्या खेळाडूंमध्ये सोनल दिनूशाचा समावेश झाला आहे. विजय हजारे, अँडी फ्लॉवर यांच्या मांदियाळीत दिनूशाचं नाव समाविष्ट झालं आहे.

सोनल दिनूशाचं शतक

भन्नाट फॉर्मात असलेल्या सोनल दिनूशाने चहापानापर्यंत लगेचच शतक पूर्ण केलं. दिनूशाचं सामन्यातलं दुसरं आणि मालिकेतलं तिसरं शतक आहे. श्रीलंकेकडे १७३ धावांची आघाडी आहे.

ध्रुव जुरेलचा भन्नाट कॅच! श्रीलंका ऑलआऊट होण्याच्या उंबरठ्यावर

श्रीलंकेला आठवा धक्का बसला आहे. जडेजाच्या गोलंदाजीव ध्रुव जुरेलने स्लीपमध्ये भन्नाट कॅच घेतला. प्रभात जयसूर्या अवघ्या २ धावांवर माघारी परतला आहे.

श्रीलंकेच्या ३५० धावा पूर्ण! सोनलकडे शतक पूर्ण करण्याची संधी

श्रीलंकेने ३५० धावांचा पल्ला गाठला असून १३५ धावांची आघाडी घेतली आहे. सोनल शतक झळकावण्याच्या अगदी जवळ पोहोचला आहे.

श्रीलंकेची आघाडी १०० पार

भारतीय संघाने श्रीलंकेला फॉलोऑन दिल्यानंतर, श्रीलंकेचा संघ लवकर ऑलआऊट होईल असं वाटलं होतं. पण केशा आणि सोनलच्या भागीदारीच्या बळावर श्रीलंकेने १०० धावांची आघाडी घेतली आहे.

श्रीलंकेच्या ३०० धावा पूर्ण

श्रीलंकेने सातव्या विकेटसाठी मोठी भागीदारी करुन संघाची धावसंख्या ३०० पार पोहोचवली आहे. यासह श्रीलंकेने ९० धावांची आघाडी घेतली आहे.