scorecardresearch

तुम्ही ४३ कसोटी सामने खेळले आहेत, काही टार्गेट सेट केलंय का? असा प्रश्न विचारताच कर्णधार रोहित शर्मा म्हणाला, “क्या सर…”

भारत विरुद्ध श्रीलंका कसोटी मालिकेतील पहिला सामना आजपासून सुरु होत आहे. भारतीय संघाचं नेतृत्व कर्णधार रोहीत शर्माच्या खांद्यावर आहे.

rohit-sharma-m2
तुम्ही ४३ कसोटी सामने खेळले आहेत, काही टार्गेट सेट केलंय का? असा प्रश्न विचारताच कर्णधार रोहित शर्मा म्हणाला, "क्या सर…" (Photo- BCCI)

भारत विरुद्ध श्रीलंका कसोटी मालिकेतील पहिला सामना आजपासून सुरु होत आहे. भारतीय संघाचं नेतृत्व कर्णधार रोहीत शर्माच्या खांद्यावर आहे. विराट कोहलीनंतर आता रोहित शर्माकडे जबाबदारी सोपण्यात आली आहे. त्यामुळे रोहित शर्माचा नेतृत्वाचा कस लागणार आहे. कसोटी सामन्यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत पत्रकारांनी नव्याने कर्णधारपदाची धुरा घेतलेल्या रोहित शर्मावर प्रश्नांचा भडीमार केला. या प्रश्नांना रोहित शर्माने आपल्या शैलीत उत्तरं दिली.

रोहित शर्माला एका पत्रकारानं प्रश्न विचारलं की, तुम्ही आतापर्यंत ४० हून अधिक सामने खेळला आहात? स्वत:साठी काही टार्गेट सेट केलं आहे का? यावर रोहित शर्माने आपल्या शैलीत उत्तर दिलं. “क्या सर..काय टार्गेट सेट करू मी माझ्यासाठी…माझं टार्गेट टीमसाठी सेट आहे. माझ्यासाठी मी तितका विचार केला नाही. ४० सामने खेळलो आहे, मी ४० सामने खेळून खूश आहे. याचं मला कोणतंच दु:ख वाटत नाही. खूप साऱ्या दुखापती आणि चढउतार पाहिले आहेत. सरळ मार्ग नाही मिळत. त्यातून आपल्याला बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतील.” त्यानंतर एका पत्रकाराने खेळपट्टी आणि प्रेक्षकांबाबबत प्रश्न विचारल्यानंतर रोहित शर्मा एकदम आनंदी झाला. “असे प्रश्न कोण विचारतच नाही. असे प्रश्न विचारले तर मी उत्तर देईन ना. हा खरा प्रश्न आहे. प्रेक्षक मैदानात आले तर आम्हालाही उत्साह येतो.”

रोहित शर्मा आतापर्यंत ४३ कसोटी सामना खेळला असून ३,०४७ धावा केल्या आहेत. या सामन्यात रोहित शर्माने ८ शतकं आणि १४ अर्धशतकं झळकावली आहेत. २१२ ही त्याची सर्वोत्तम खेळी राहिली आहे. विराट कोहलीने दक्षिण आफ्रिकेतील कसोटी मालिकेतील पराभवानंतर कर्णधारपद सोडण्याची घोषणा केली होती. यानंतर रोहित शर्माकडे जबाबदारी सोपण्यात आली होती

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: India vs srilanka rohit sharma about test cricket goal rmt

ताज्या बातम्या