India vs West Indies 1st T20I: भारतीय संघाने काही दिवसांपूर्वीच श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली खेळताना सुवर्णपदकाला गवसणी घातली. भारतीय संघाने फायनलमध्ये पाकिस्तानचा पराभव केला. भारतीय खेळाडू आता भारतात परतले असून वेस्ट इंडिजचा सामना करताना दिसून येणार आहेत. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील टी-२० मालिकेतील पहिला टी-२० सामना लखनौच्या एकाना स्टेडियमवर पार पडला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या वेस्ट इंडिजने १७१ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाने एकतर्फी विजयाची नोंद केली. यादरम्यान श्रेयस अय्यरने दमदार शतक झळकावलं.

Live Updates

India vs West Indies 1st T20I: भारत आणि वेस्ट इंडिज सामन्याचे हायलाईट्स.

22:21 (IST) 6 Oct 2026

IND vs WI Live: भारतीय संघाचा विजय

या सामन्यात प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या वेस्ट इंडिजने १७१ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाने ८ गडी राखून विजयाची नोंद केली आहे.

21:48 (IST) 6 Oct 2026

IND vs WI Live: श्रेयस अय्यरचं तुफानी अर्धशतक! टीम इंडिया विजयाच्या उंबरठ्यावर

भारतीय संघाला २ धक्के बसल्यानंतर श्रेयस अय्यर फलंदाजीला आला. दरम्यान श्रेयस अय्यरने २८ चेंडूंमध्ये आपलं अर्धशतक झळकावलं.

21:26 (IST) 6 Oct 2026

IND vs WI Live: पावरप्लेमध्ये टीम इंडियाची दमदार सुरूवात!

पावरप्लेमध्ये भारतीय संघाला २ मोठे धक्के बसले. पण भारतीय संघाने ६१ धावांपर्यंत मजल मारली आहे. इशान किशन आणि श्रेयस अय्यरने मिळून भारतीय संघाचा डाव सावरला आहे.

20:42 (IST) 6 Oct 2026

IND vs WI Live: वेस्ट इंडिज ऑल आऊट! टीम इंडियाला विजयासाठी इतक्या धावांची गरज

वेस्ट इंडिजने दमदार सुरूवात केली होती. पण भारतीय गोलंदाजांनी दमदार गोलंदाजी केली. दरम्यान वेस्ट इंडिजचा डाव १७१ धावांवर आटोपला आहे. भारतीय संघाला विजयासाठी १७२ धावा करायच्या आहेत.

20:39 (IST) 6 Oct 2026

IND vs WI Live: वादळी अर्धशतक झळकावल्यानंतर रुदरफोर्ड परतला माघारी

रुदरफोर्डने वादळी अर्धशतक झळकावलं. पण मयांक यादवने त्याला झेलबाद करत माघारी धाडलं आहे.

20:24 (IST) 6 Oct 2026

IND vs WI Live:नमन धीरच्या गोलंदाजीची जादू! वेस्ट इंडिजचा आठवा फलंदाज तंबूत

नमन धीरने पदार्पणात दमदार गोलंदाजी केली आहे. त्याने शमार स्प्रिंगरला झेलबाद करत माघारी धाडलं आहे. यासह १३५ धावांवर वेस्ट इंडिजला आठवा धक्का बसला आहे.

20:04 (IST) 6 Oct 2026

IND vs WI Live: शे होप अर्धशतक झळकावल्यानंतर परतला माघारी! नमन धीरने घेतली पहिली विकेट

शे होप अर्धशतक झळकावल्यानंतर ५२ धावा करून माघारी परतला आहे. त्याला नमन धीरने बाद करत माघारी धाडलं आहे.

20:01 (IST) 6 Oct 2026

IND vs WI Live: शे होप- रुदरफोर्डची जोडी जमली! वेस्ट इंडिजच्या १०० धावा पूर्ण

वेस्ट इंडिजकडून शे होप आणि रुदरफोर्डने तुफान फटकेबाजी केली आहे. ११ षटकांत वेस्ट इंडिजने १०० धावांचा पल्ला गाठला आहे.

19:36 (IST) 6 Oct 2026

IND vs WI: वेस्ट इंडिजला ३ लागोपाठ धक्के! हेटमायरनंतर पॉवेलही परतला तंबूत

शिमरन हेटमायर धावबाद झाल्यानंतर वेस्ट इंडिजला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. रोमन पॉवेल शून्यावर माघारी परतला आहे.

19:26 (IST) 6 Oct 2026

IND vs WI Live: वेस्ट इंडिजला पहिला मोठा धक्का! पूरन परतला माघारी

वेस्ट इंडिजला अर्शदीप सिंगने पहिला धक्का दिला आहे. कमिल पूरन १२ धावा करून माघारी परतला आहे.

19:15 (IST) 6 Oct 2026

IND vs WI : वेस्ट इंडिजची दमदार सुरूवात! २ षटकांत कुटल्या इतक्या धावा

या सामन्यात नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजीला आलेल्या वेस्ट इंडिजने २ षटकांत २१ धावा कुटल्या आहेत.

18:44 (IST) 6 Oct 2026
IND vs WI Live: नमन धीरचं पदार्पण

या सामन्यासाठी मुंबई इंडियन्सचा स्टार खेळाडू नमन धीरला टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची संधी देण्यात आली आहे.

18:33 (IST) 6 Oct 2026

IND vs WI Live: टीम इंडियाचा नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय! वैभव सूर्यवंशी खेळणार का?

या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

17:06 (IST) 6 Oct 2026

IND vs WI Live: भारत - वेस्ट इंडिज पहिला टी-२० सामना रद्द होणार? जाणून घ्या लेटेस्ट अपडेट

गोमती नदीच्या पूराच्या पाण्याचा विचार करता गेट क्रमांक १ जवळ मोठमोठे दगड ठेवण्यात आले आहेत. नदीच्या पाण्याचा वाढता प्रवाह रोखण्यासाठी आणि स्टेडियम परिसराचं संरक्षण करण्याच्या दृष्टीने हे पाऊल उचलण्यात आलं आहे. एकाना स्टेडियमसमोरून शहीद पथ जातो, तर त्याच्या दुसऱ्या बाजूला उत्तर प्रदेश पोलीस मुख्यालय आहे. सध्या पोलीस मुख्यालयासमोरील सर्व्हिस रोडवर सुमारे एक फूट पाणी साचलं आहे.

पुराच्या धोक्याबाबतची परिस्थिती स्पष्ट करताना, एकाना क्रिकेट स्टेडियमच्या व्यवस्थापनाने सांगितलं की याचा सामन्यावर कोणताही परिणाम होणार नाही; ही एक चांगली बातमी आहे. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिला टी-२० सामना नियोजित वेळेनुसारच सुरू होईल, असं तूर्तास प्रशासनाने म्हटलं आहे.

16:58 (IST) 6 Oct 2026

IND vs WI Live: सामना होणार का?

भारताच्या सामन्यापूर्वी स्टेडियमजवळील नदीच्या पाण्याची पातळी वाढल्याने प्रशासन सतर्क झालं आहे. नदीचं पाणी स्टेडियमच्या गेट क्रमांक १ पासून सुमारे १०० मीटर अंतरापर्यंत पोहोचलं आहे. काही दिवसांपूर्वी स्टेडियमपासून काही अंतरावर नदीकाठी संरक्षक बांध उभारण्यात आला होता. आता पाणी त्या बांधालाही लागलं आहे. मात्र, एकाना स्टेडियम उंच ठिकाणी असल्याने सध्या नदीचं पाणी स्टेडियममध्ये पोहोचण्याची शक्यता कमी असल्याचं सांगितलं जात आहे. तरीही संभाव्य धोका लक्षात घेऊन नदीकाठावर कायमस्वरूपी संरक्षणात्मक बांधकाम करण्याच्या दृष्टीने तयारी सुरू करण्यात आली आहे.

Team india

India vs West Indies 1st T20I: भारत आणि वेस्ट इंडिज सामन्याचे हायलाईट्स.