IND vs WI 3rd ODI Live, 27 July 2022 : भारत आणि वेस्ट इंडीज दरम्यान सुरू असलेली तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका भारताने ३-० अशी जिंकली आहे. बुधवारी झालेला या मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना भारताने जिंकला. मागील दोन सामन्यांप्रमाणे तिसरा सामनाही पोर्ट ऑफ स्पेनमधील क्वीन्स पार्क ओव्हल क्रिकेट स्टेडियममध्ये झाला. या सामन्यात भारताने यजमानांचा ११९ धावांनी पराभव केला. भारतीय कर्णधार शिखर धवनने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पावसाच्या व्यत्ययामुळे भारतीय संघाला ३६ षटकांमध्ये तीन बाद २२५ धावा करता आल्या. डकवर्थ-लुईस नियमाप्रमाणे वेस्ट इंडीजला ३५ षटकांमध्ये २५७ धावांचे लक्ष्य मिळाले होते.

Dinesh Karthik Says I won't be surprised if he crosses the 300 run mark in IPL
IPL 2024 : आयपीएलमध्ये लवकरच ३०० धावांचा टप्पा पार होणार, ‘या’ दिग्गज खेळाडूची मोठी भविष्यवाणी
IPL 2024 Lucknow Super Giants vs Chennai Super Kings Match Updates in Marathi
CSK vs LSG सामन्यानंतर IPL कडून दोन्ही संघांच्या कर्णधारांवर कारवाई, ऋतुराज-राहुलला १२ लाखांचा दंड
hamari Athapaththu 195 Runs Inning Helps Sri Lanka Chase Highest Record in Women ODI
SAW vs SLW: कितनी बडी बात? महिलांनीही पाडला एका दिवसात ६०० धावांचा पाऊस; दोघींनीच केल्या ३७९
IPL 2024 Punjab Kings vs Mumbai Indians Highlights in Marathi
PBKS vs MI Highlights, IPL 2024 : रोमहर्षक सामन्यात मुंबईचा पंजाबवर ९ धावांनी निसटता विजय, आशुतोष शर्माची वादळी खेळी ठरली व्यर्थ
Live Updates

India vs West Indies 3rd ODI Live Updates : भारत विरुद्ध वेस्ट इंडीज तिसऱ्या एकदिवसीय सामन्याचे सर्व अपडेट्स

03:04 (IST) 28 Jul 2022
वेस्ट इंडीजचा नववा गडी बाद

हेडन वॉल्शच्या रुपात वेस्ट इंडीजचा नववा गडी बाद झाला. भारतीय संघाचा विजय दृष्टीपथात आला आहे.

02:55 (IST) 28 Jul 2022
किमो पॉल शून्यावर बाद

किमो पॉल शून्यावर बाद झाला. वेस्ट इंडीजची अवस्था आठ बाद १२४ अशी झाली आहे.

02:42 (IST) 28 Jul 2022
वेस्ट इंडीजचा कर्णधार बाद

वेस्ट इंडीजचा कर्णधार निकोलस पूरन ४२ धावा करून बाद झाला आहे. शिखर धवनने त्याचा झेल टिपला.

02:32 (IST) 28 Jul 2022
केसी कार्टीच्या रुपात विंडीजचा पाचवा गडी बाद

केसी कार्टीच्या रुपात विंडीजचा पाचवा गडी बाद झाला आहे. विजयासाठी त्यांना आणखी १५४ धावांची आवश्यकता आहे.

02:09 (IST) 28 Jul 2022
वेस्ट इंडीजचा चौथा गडी बाद

वेस्ट इंडीजचा चौथा गडी बाद झाला आहे. ब्रँडन किंग ४२ धावा करून बाद झाला.

01:52 (IST) 28 Jul 2022
शाय होपच्या रुपात वेस्ट इंडीजला तिसरा धक्का

शाय होपच्या रुपात वेस्ट इंडीजचा तिसरा गडी बाद झाला आहे. यजमानांची अवस्था दहा षटकांमध्ये तीन बाद ४८ झाली आहे.

01:29 (IST) 28 Jul 2022
पाच षटकांमध्ये विंडीजच्या दोन बाद १९ धावा

वेस्ट इंडीजच्या डावाची सुरुवात चांगली झाली नाही. पाच षटकांमध्ये विंडीजच्या दोन बाद १९ धावा झाल्या आहेत.

01:16 (IST) 28 Jul 2022
मोहम्मद सिराजला सलग दुसरा बळी

मोहम्मद सिराजला सलग दुसरा बळी मिळाला आहे. त्याने सलामीवीर शामराह ब्रूक्सला शून्यावर बाद केले. विंडीजची अवस्था दोन बाद शून्य अशी झाली आहे.

01:14 (IST) 28 Jul 2022
विंडीजचा सलामीवीर शून्यावर बाद

विंडीजचा सलामीवीर कायले मेयर्स शून्यावर बाद झाल आहे. मोहम्मद सिराजने त्याला त्रिफळाचित केले.

01:10 (IST) 28 Jul 2022
वेस्ट इंडीजला ३५ षटकांमध्ये २५७ धावांचे आव्हान

वेस्ट इंडीजला ३५ षटकांमध्ये २५७ धावांचे आव्हान मिळाले आहे. विंडीज फलंदाज मैदानात उतरले आहेत.

00:16 (IST) 28 Jul 2022
खेळात पावसाचा पुन्हा अडथळा

३६ षटकानंतर पावसाला पुन्हा सुरुवात झाली आहे. खेळ थांबला तेव्हा भारताच्या तीन बाद २२५ धावा झाल्या आहेत.

00:01 (IST) 28 Jul 2022
भारताचा तिसरा गडी बाद

सूर्यकुमार यादव आठ धावा करून बाद झाला आहे. भारताच्या ३४ षटकांमध्ये तीन बाद २१२ धावा झाल्या आहेत.

23:53 (IST) 27 Jul 2022
श्रेयस अय्यरच्या रुपात भारताचा दुसरा गडी बाद

श्रेयस अय्यरच्या रुपात भारताचा दुसरा गडी बाद झाला आहे. त्याने ३४ चेंडूत ४४ धावा केल्या.

23:40 (IST) 27 Jul 2022
३० षटकांमध्ये भारताच्या एक बाद १७९ धावा

३० षटकांमध्ये भारताच्या एक बाद १७९ धावा झाल्या आहेत. भारतीय फलंदाजांकडे आणखी १० षटके बाकी आहेत.

23:22 (IST) 27 Jul 2022
गिल आणि अय्यरची फटकेबाजी सुरू

शुबमन गिल आणि श्रेयस अय्यरने फटकेबाजी सुरू केली आहे. २६ षटकांमध्ये भारताच्या एक बाद १४६ धावा झाल्या आहेत.

23:14 (IST) 27 Jul 2022
पाऊस थांबल्याने खेळाला पुन्हा सुरुवात

पोर्ट ऑफ स्पेनमध्ये पाऊस थांबला असून खेळाला पुन्हा सुरुवात झाली आहे. दोन्ही संघातील खेळाडू मैदानावरती आले आहेत.

23:05 (IST) 27 Jul 2022
प्रत्येकी ४० षटकांचा होणार सामना

पावसाच्या व्यत्ययामुळे दोन्ही संघाच्या डावातील प्रत्येकी १० षटके कमी करण्यात आली आहेत.

20:51 (IST) 27 Jul 2022
पावसाचा खेळामध्ये व्यत्यय

क्वीन्स पार्क ओव्हलमध्ये पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे खेळ थांबवण्यात आला आहे.

20:41 (IST) 27 Jul 2022
भारताचा पहिला गडी बाद

कर्णधार शिखर धवन अर्धशतक करून बाद झाला आहे. त्याने ७४ चेंडूत ५८ धावा केल्या. २३ षटकांमध्ये भारताच्या एक बाद ११३ धावा झाल्या आहेत.

20:37 (IST) 27 Jul 2022
शुबमन गिलचे अर्धशतक

भारतीय सलामीवीर शुबमन गिलने एकदिवसीय कारकिर्दीतील दुसरे अर्धशतक ठोकले. त्याने ६० चेंडूंमध्ये ५० धावा केल्या.

20:27 (IST) 27 Jul 2022
भारताचा धावफलक शंभरीपार

२० व्या षटकामध्ये भारताचा धावफलक शंभरीपार गेला आहे. शिखर धवन आणि शुबमन गिल यांनी भारताला दमदार सुरुवात करून दिली आहे.

20:21 (IST) 27 Jul 2022
कर्णधार शिखर धवनचे अर्धशतक

कर्णधार शिखर धवनने अर्धशतक पूर्ण केले. त्याने ६२ चेंडूमध्ये ५० धावा केल्या.

20:04 (IST) 27 Jul 2022
१५ षटकांमध्ये भारताच्या बिनबाद ७६ धावा

१५ षटकांमध्ये भारताच्या बिनबाद ७६ धावा झाल्या आहेत. शिखर धवन ४० आणि शुबमन गिल ३३ धावांवर खेळत आहेत.

19:42 (IST) 27 Jul 2022
१० षटकांमध्ये भारताच्या बिनबाद ४५ धावा

पावर प्लेची षटके सुरू असूनही भारतीय सलामीवीर सावध खेळ करत आहेत. पहिल्या १० षटकांमध्ये भारताच्या बिनबाद ४५ धावा झाल्या आहेत.

19:35 (IST) 27 Jul 2022
आठ षटकांमध्ये भारताच्या बिनबाद ३७ धावा

आठ षटकांमध्ये भारताच्या बिनबाद ३७ धावा झाल्या आहेत. शिखर धवन २० आणि शुबमन गिल १६ धावांवर खेळत आहेत.

19:22 (IST) 27 Jul 2022
पाच षटकांमध्ये भारताच्या बिनबाद १७ धावा

भारतीय सलामीवीरांनी सावध सुरुवात केली आहे. पाच षटकांमध्ये भारताच्या बिनबाद १७ धावा झाल्या आहेत.

19:08 (IST) 27 Jul 2022
दोन षटकांमध्ये भारताच्या बिनबाद १० धावा

पहिल्या दोन षटकांमध्ये भारताच्या बिनबाद १० धावा झाल्या आहेत. शुबमन गिलने चौकारासह आपले खाते उघडले.

19:00 (IST) 27 Jul 2022
भारताच्या फलंदाजीला सुरुवात

भारताच्या फलंदाजीला सुरुवात झाली आहे. सलामीवीर शिखर धवन आणि शुबमन गिल मैदानात उतरले आहेत.

18:42 (IST) 27 Jul 2022
विंडीज संघात जेसन होल्डरचे आगमन

वेस्ट इंडीज संघ : शाय होप (यष्टीरक्षक), कायले मेयर्स, शमारह ब्रूक्स, ब्रँडन किंग, निकोलस पूरन (कर्णधार), अकिल होसेन, जेडेन सील्स, हेडन वॉल्श, कीमो पॉल, जेसन होल्डर, केसी कार्टी.

18:39 (IST) 27 Jul 2022
प्रसिद्ध कृष्णाला पुन्हा संधी

भारतीय संघ : शिखर धवन (कर्णधार), शुबमन गिल, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), दीपक हुडा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज, युझवेंद्र चहल, प्रसिद्ध कृष्णा