India vs West Indies 3rd T20I Highlights: भारत आणि वेस्ट इंडिज या दोन्ही संघांमध्ये सुरू असलेल्या ५ टी-२० सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना इंदूरच्या मैदानावर पार पडला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने २२३ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजला २०९ धावांपर्यंत मजल मारता आली होती. यासह भारतीय संघाने हा सामना १४ धावांनी आपल्या नावावर केला. यासह मालिकेत २-१ ने आघाडी घेतली आहे.
IND vs WI 3rd T20I Highlights: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील तिसऱ्या टी-२० सामन्याचे हायलाईट्स
IND vs WI Live: अभिषेक शर्मा अन् इशान किशनची फटकेबाजी, गोलंदाजीत अर्शदीपचा जलवा; भारताचा दमदार विजय
भारताने वेस्ट इंडिजविरुद्धच्या तिसऱ्या टी-२० सामन्यात २२३ धावांचा बचाव करत शानदार विजय मिळवला. अभिषेक शर्मा आणि इशान किशनच्या फलंदाजीनंतर अर्शदीप सिंगने निर्णायक गोलंदाजी केली. या विजयासह भारताने पाच सामन्यांच्या मालिकेत २-१ ने आघाडी घेतली.
IND vs WI Live:वेस्ट इंडिजला १२ चेंडूंमध्ये विजयासाठी किती धावांची गरज?
वेस्ट इंडिजला १२ चेंडूंमध्ये विजयासाठी ४८ धावांची गरज आहे.
IND vs WI Live: अर्शदीप सिंगने दिले लागोपाठ धक्के
अर्शदीप सिंगने वेस्ट इंडिजला लागोपाठ २ धक्के देऊन भारतीय संघाला विजयाच्या उंबरठ्यावर पोहोचवलं आहे. आधी किमो पॉल आणि त्यानंतर रुदरफोर्डला बाद करत माघारी धाडलं.
IND vs WI LIVE: निर्णायक क्षणी विकेट! सॅम्पसन परतला माघारी
नितीश कुमार रेड्डीने सॅम्पसनला २४ धावांवर बाद करत माघारी धाडलं आहे.
IND vs WI Live: नमन धीरने दिला वेस्ट इंडिजला चौथा धक्का! कमिल पूरन परतला माघारी
नमन धीरने पुन्हा एकदा षटकार खाल्यानंतर विकेट घेतली आहे. त्याने कमिल पूरनला ४२ धावांवर माघारी धाडलं आहे.
IND vs WI Live: वेस्ट इंडिजला तिसरा धक्का! रोमन पॉवेलला अक्षर पटेलने धाडलं माघारी
वेस्ट इंडिजला ज्या फलंदाजांकडून अपेक्षा होती, ते फलंदाज माघारी परतले आहेत. अक्षर पटेलने रोमन पॉवेलला बाद करत माघारी धाडलं आहे.
IND vs WI: वेस्ट इंडिजला पहिला मोठा धक्का! शे होप परतला माघारी
वेस्ट इंडिजला सुरूवातीलाच मोठा धक्का बसला आहे. संघातील सर्वात फॉर्मात असलेल्या शे होपला अर्शदीप सिंगने बाद करत माघारी धाडलं आहे.
IND vs WI Live: टीम इंडिया ऑल आऊट! वेस्ट इंडिजसमोर ठेवलं इतक्या धावांचं आव्हान
भारतीय संघाने दमदा सुरूवात केली होती. पण शेवट हवा तसा करता आलेला नाही. जशी सुरूवात केली होती, त्यानुसार भारतीय संघाने २५० हून अधिक धावा करायला हव्या होत्या. पण भारतीय संघाचा डाव २२३ धावांवर आटोपला आहे. वेस्ट इंडिजला विजयासाठी २२४ धावा करायच्या आहेत.
IND vs WI Live: तिलक वर्मा धावबाद होऊ परतला माघारी! टीम इंडियाला सातवा धक्का
तिलक वर्मा आणि अक्षर पटेलची जोडी जमली होती. पण एका चुकीमुळे तिलक वर्माला धावबाद होऊन माघारी परतावं लागलं आहे.
भारतीय संघाला पाचवा मोठा धक्का बसला आहे. नमन धीरला मोठी खेळी करण्याची संधी होती. पण तो स्वस्तात माघारी परतला आहे. १३५ धावांवर भारताचे ५ फलंदाज माघारी परतले आहेत.
IND vs WI Live: इशान पाठोपाठ कर्णधार श्रेयस अय्यर परतला तंबूत! टीम इंडियाला तिसरा मोठा धक्का
भारतीय संघाला एकाच षटकांत लागोपाठ २ धक्के बसले आहेत. इशान किशन बाद झाल्यानंतर कर्णधार श्रेयस अय्यर देखील बाद होऊन माघारी परतला आहे.
IND vs WI Live: टीम इंडियाला दुसरा मोठा धक्का! इशान किशन परतला माघारी
भारतीय संघाला दुसरा मोठा धक्का बसला आहे. इशान किशन स्टेपआऊट होऊन मोठा फटका मारायला गेला, पण तो स्टंपिंग होऊन ३७ धावांवर माघारी परतला आहे.
IND vs WI Live: अभिषेक शर्माचं वादळी अर्धशतक! पावरप्लेमध्ये टीम इंडियाचा बोलबाला
अभिषेक शर्माची बॅट पुन्हा एकदा तळपली. या डावात फलंदाजी करताना त्याने १८ चेंडूत आपलं अर्धशतक पूर्ण केलं आहे.
IND vs WI Live: ५० धावा पूर्ण
भारतीय संघाला सुरूवातीलाच मोठा धक्का बसला होता. संजू बाद झाल्यानंतर इशान आणि अभिषेकने मिळून संघाचा डाव सावरला. दोघांनी मिळून ४.२ षटकांत ५० धावा केल्या आहेत.
IND vs WI Live: टीम इंडियाला मोठा धक्का
भारतीय संघाला सुरूवातीलाच मोठा धक्का बसलाआहे. संजू सॅमसन अवघ्या ३ धावा करून माघारी परतला आहे.
IND vs WI Live: नाणेफेक
या सामन्यातही वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या सामन्यातही वेस्ट इंडिजने प्रथम गोलंदाजी करून मोठ्या धावसंख्येचा पाठलाग केला होता.
IND vs WI Live: किती वाजता सुरू होणार सामना?
हा सामना इंदूरच्या मैदानावर खेळवला जाणार आहे. हा सामना संध्याकाळी ७ वाजता सुरू होईल. तर नाणेफेक संध्याकाळी ६:३० वाजता होईल.
IND vs WI Live: मालिका १-१ ने बरोबरीत
मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाने दमदार विजय मिळवत १-० ने आघाडी घेतली होती. पण त्यानंतर झालेल्या दुसऱ्या टी-२० सामन्यात वेस्ट इंडिजच्या फलंदाजांनी दमदार पुनरागमन केलं आणि मालिका १-१ ने बरोबरीत आणली.

IND vs WI 3rd T20I Highlights: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील तिसऱ्या टी-२० सामन्याचे हायलाईट्स
