India vs West Indies 4th T20I Highlights: हैदराबादमध्ये झालेल्या चौथ्या टी-२० सामन्यात वेस्ट इंडिजने भारताचा २४ धावांनी पराभव केला. यासह भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील टी-२० मालिका २-२ अशी बरोबरीत आली आहे. त्यामुळे आता या मालिकेचा निर्णायक सामना शनिवारी १७ ऑक्टोबरला बंगळुरूमध्ये खेळवला जाणार आहे. हा सामना जिंकणारा संघ मालिका आपल्या नावे करणार आहे. चौथ्या टी-२० सामन्यात विडिंज संघाकडून शे होपने पुन्हा एकदा कमालीची शतकी खेळी साकारली. तर गोलंदाजीत किमो पॉलने उत्कृष्ट कामगिरी करत ५ विकेट्स घेण्याचा कारनामा केला.
India vs West Indies 4th T20I: भारत विरुद्ध वेस्ट इंडिज चौथ्या टी-२० सामन्याचे हायलाईट्स
भारताचा पराभव
अर्शदीप सिंगला २०व्या षटकात फलंदाजी करताना गोलंदाजी करणाऱ्या खांद्यावरच बाऊन्सर लागला आणि वेदनेने प्रचंड कळवळताना दिसला. चेंडू जोरात लागल्याने पुढच्या चेंडूनंतर वेदना असह्य होत असल्याने तो पुन्हा मैदानावर बसला. यानंतर रिटायर्ड आऊट होण्याचा निर्णय घेतल्याने सामना तिथेच संपला आणि वेस्ट इंडिजने २४ धावांनी सामना जिंकत मालिका २-२ अशी बरोबरीत आणली.
१९वं षटक टाकण्याची जबाबदारी किमो पॉलला दिली आणि त्याने पुन्हा दोन विकेट्स घेत भारताला न सावरता येणारे धक्के दिले. त्याने दुसऱ्या चेंडूवर नितीश रेड्डीला झेलबाद केलं आणि पुढच्याच चेंडूवर नुकताच आलेला प्रिंस यादव क्लीन बोल्ड झाला. अशारितीने विजयाची शक्यता असताना या दोन विकेट्समुळे टीम इंडिया पुन्हा बॅकफूटवर गेली. यानंतर पाचव्या चेंडूवर मोठा फटका खेळताना अक्षर पटेल झेलबाद झाला. यासह किमो पॉलने टी-२० सामन्यात ५ विकेट्स घेतल्या आहेत.
IND vs WI Live: टीम इंडियाला सर्वात मोठा धक्का! विजयाच्या उंबरठ्यावर असताना तिलक वर्मा बाद
भारतीय संघाला निर्णायक क्षणी मोठा धक्का बसला आहे. तिलक वर्मा ४३ धावांवर माघारी परतला आहे.
IND vs WI Live: २४ चेंडूत किती धावांची गरज
नितीश रेड्डी आणि तिलक वर्माने अजूनही भारतीय संघाला सामन्यात टिकवून ठेवलं आहे. भारताला विजयासाठी २४ चेंडूंमध्ये ५९ धावांची गरज आहे.
IND vs WI Live: भारताला अजून एक धक्का
गुडाकेश मोतीच्या पुढच्या चेंडूवर नमन धीर स्टंपिंग होत बाद झाला.
IND vs WI Live: अभिषेक शर्मा बाद
भारतीय संघाला अभिषेक शर्माच्या रूपात मोठा धक्का बसला आहे. १२व्या षटकात गुडाकेश मोतीने त्याला झेलबाद केलं. भारताला विजयासाठी आता ५० चेंडूत ११८ धावांची गरज आहे.
IND vs WI Live: टीम इंडियाला दुसरा मोठा धक्का
भारतीय संघाला लागोपाठ दुसरा मोठा धक्का बसला आहे. इशान किशन अवघ्या ६ धावा करून माघारी परतला आहे.
IND vs WI Live: टीम इंडियाला पहिला मोठा धक्का! वादळी अर्धशतकानंतर संजू सॅमसन परतला माघारी
भारतीय संघाला पहिला मोठा धक्का बसला आहे. अर्धशतक झळकावल्यानंतर संजू सॅमसन झेलबाद होऊन माघारी परतला आहे.
IND vs WI: टीम इंडियाच्या ५५ धावा अन् संजू सॅमसनचं अर्धशतक पूर्ण
भारतीय संघाने ३ षटकात ५० धावांचा पल्ला गाठला. यादरम्यान संजू सॅमसनने आपलं अर्धशतक पूर्ण केलं आहे.
IND vs WI Live: टीम इंडियाची दमदार सुरूवात
धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाने ३ षटकांत ५० धावांचा पल्ला गाठला आहे.
IND vs WI Live: शे होपचं दमदार शतक! वेस्ट इंडिजने भारतासमोर ठेवलं २४८ धावांचं आव्हान
या सामन्यातही शे होपच्या फलंदाजीचा बोलबाला पाहायला मिळाला. शे होपने नाबाद १०२ धावांची खेळी केली आणि भारतीय संघासमोर २४८ धावांचं आव्हान ठेवलं.
IND vs WI Live: शे होप- रुदरफोर्डच्या फलंदाजीचा कहर! १७ व्या षटकात २०० धावा पूर्ण
वेस्ट इंडिजच्या फलंदाजांकडून तुफान फटकेबाजी पाहायला मिळाली आहे. वेस्ट इंडिजने अवघ्या १७ व्या षटकात २०० धावांचा पल्ला गाठला आहे.
IND vs WI Live: अर्शदीप सिंगने दिला वेस्ट इंडिजला तिसरा मोठा धक्का! पॉवेल परतला तंबूत
पॉवेल आणि होपची जोडी चांगलीच जमली होती. त्यामुळे ही जोडी फोडणं गरजेचं होतं. अर्शदीप सिंगने पॉवेलला २४ धावांवर बाद करत माघारी धाडलं आहे.
IND vs WI Live: शै होपचं अर्धशतक
या संपूर्ण दौऱ्यावर कर्णधार शे होपच्या फलंदाजीचा बोलबाला पाहायला मिळाला आहे. या सामन्यातही फलंदाजी करताना त्याने षटकार खेचून २८ चेंडूंमध्ये आपलं अर्धशतक पूर्ण केलं आहे.
IND vs WI Live: प्रिन्स यादवने दिला वेस्ट इंडिजला दुसरा धक्का! हेटमायर परतला माघारी
प्रिन्स यादवने आपल्याच गोलंदाजीवर झेल घेत शिमरॉन हेटमायरला माघारी पाठवलं आहे. तो ३३ धावा करून माघारी परतला आहे.
IND vs WI Live: वेस्ट इंडिजची दमदार सुरूवात
वेस्ट इंडिजने पावरप्लेमध्ये तुफान फटकेबाजी केली. यादरम्यान ७ षटकांत वेस्ट इंडिजने १ गडी बाद ९० धावा केल्या आहेत.
IND vs WI Live: वेस्ट इंडिजची दमदार सुरुवात
वेस्ट इंडिजकडून डावाची सुरुवात करण्यासाठी आलेल्या होप आणि अँड्र्यूने दमदार सुरुवात करून दिली आहे. ४ षटकात वेस्ट इंडिजने ५२ धावा केल्या आहेत.
या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या सामन्यासाठी भारतीय संघाच्या प्लेईंग ११ मध्ये कुठलाही बदल करण्यात आलेला नाही. त्यामुळे वैभव सूर्यवंशीला पुन्हा एकदा बाहेर बसावं लागणार आहे.
IND vs WI Live: भारताची मालिका विजयावर नजर
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील चौथा सामना आज हैदराबादमधील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवला जाईल. भारतीय संघ हा सामना जिंकत मालिका जिंकण्याच्या उद्देशाने मैदानावर उतरणार आहे. या मालिकेत सध्या भारतीय संघ २-१ असा आघाडीवर आहे.
IND vs WI Live: भारत वि. वेस्ट इंडिज सामना
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील चौथा टी-२० सामना आज १४ ऑक्टोबर २०२६ ला खेळवला जाणार आहे. हा सामना संध्याकाळी ७ वाजता सुरू होणार आहे.

India vs West Indies 4th T20I: भारत विरुद्ध वेस्ट इंडिज चौथ्या टी-२० सामन्याचे लाईव्ह अपडेट्स.
