scorecardresearch

Premium

वन-डे, टी-20 मालिकेसाठी वेस्ट इंडिज संघाची घोषणा, ख्रिस गेलचा संघात समावेश नाही

टी-20 संघात पोलार्ड-ब्राव्हो परतले

ख्रिस गेल, chris gayle, t 20 world cup, icc t 20 world cup
ख्रिस गेल खासगी स्पर्धेत खेळत असल्यामुळे तो संघासाठी उपलब्ध नाहीये

भारताविरुद्ध सुरु असलेल्या कसोटी मालिकेत वेस्ट इंडिजच्या संघाला राजकोट कसोटीत डावाने पराभव स्विकारावा लागला. मालिकेतला दुसरा सामना 12 ऑक्टोबरपासून हैदराबादच्या मैदानावर खेळवला जाणार आहे. मात्र आगामी वन-डे व टी-20 मालिकेसाठी वेस्ट इंडिजने आपला तुल्यबळ संघ मैदानात उतरवला आहे. आज वेस्ट इंडिजच्या संघाची घोषणा करण्यात आली.

वेस्ट इंडिजचा धडाकेबाज फलंदाज ख्रिस गेलचा संघात समावेश करण्यात आलेला नसला तरीही, कायरन पोलार्ड, डॅरेन ब्राव्हो या दिग्गज खेळाडूंना संघात जागा मिळालेली आहे. फिरकीपटू सुनील नरीनही संघात जागा मिळवू शकला नाहीये. याचसोबत अँड्रे रसेल याला वन-डे संघातून वगळण्यात आलं असलं तरी टी-20 संघात जागा देण्यात आली आहे.

वन-डे मालिकेसाठी वेस्ट इंडिजचा संघ पुढीलप्रमाणे –

जेसन होल्डर (कर्णधार), फॅबिअन अॅलेन, सुनिल अँब्रिस, देवेंद्र बिशु, चंद्रपॉल हेमराज, शिमरॉन हेटमेयर, शाई होप, अल्झारी जोसेफ, एविन लुईस, अॅशले नर्स, किमो पॉल, रोवमन पॉवेल, केमार रोच, मार्लन सॅम्युअल्स, ओशने थॉमस

टी-20 मालिकेसाठी वेस्ट इंडिजचा संघ पुढीलप्रमाणे –

कार्लोस ब्रेथवेट (कर्णधार), फॅबिअन अॅलेन, डॅरेन ब्राव्हो, शिमरॉन हेटमेयर, एविन लुईस, ओबेड मॅकॉय, अॅशले नर्स, किमो पॉल, खारे पाईरे, कायरन पोलार्ड, रोवमन पॉवेल, दिनेश रामदिन, अँड्रे रसेल, शेरफन रुदरफोर्ड, ओशने थॉमस

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व क्रीडा, वर्ल्डकप २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: India vs west indies no chris gayle sunil narine in windies squad kieron pollard darren bravo return

First published on: 08-10-2018 at 10:59 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×