India vs West Indies Pitch Report: आयसीसी टी -२० वर्ल्डकप २०२६ स्पर्धा सध्या शेवटच्या टप्प्यात आहे. सेमी फायनलमध्ये जाणारे ३ संघ ठरले आहेत. तर चौथ्या स्थानासाठी भारत आणि वेस्ट इंडिज या दोन्ही संघांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे. भारतीय संघाला जर सेमी फायनलमध्ये जायचं असेल तर, हा सामना कुठल्याही परिस्थितीत जिंकावा लागणार आहे. हा सामना कोलकात्यातील इडन गार्डन्सच्या मैदानावर खेळवला जाणार आहे. दरम्यान कोलकाताची खेळपट्टी कोणासाठी फायदेशीर ठरणार? जाणून घ्या पीच रिपोर्ट.

भारत आणि वेस्ट इंडिज या दोन्ही संघांनी साखळी फेरीतील सर्व सामने जिंकले. तर सुपर ८ फेरीत दोन्ही संघांना प्रत्येकी २-२ सामने जिंकता आले आहेत. दोन्ही संघांना दक्षिण आफ्रिकेकडून पराभवाचा सामना करावा लागला आहे.

दोन्ही संघांसाठी हा सामना अतिशय महत्वाचा असणार आहे. जो संघ हा सामना जिंकेल तो थेट सेमी फायनलमध्ये प्रवेश करणार आहे.या सामन्यासाठी कोलकाताच्या इडन गार्डन्सवर कोरड्या खेळपट्टीचा वापर केला जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. या खेळपट्टीवर फिरकी गोलंदाजांची भूमिका अतिशय महत्वाची ठरणार आहे. भारतीय संघात एकापेक्षा एक स्टार फिरकी गोलंदाज आहेत, जे वेस्ट इंडिजच्या फलंदाजांवर भारी पडू शकतात. दुसरीकडे वेस्ट इंडिजच्या संघात देखील स्फोटक फलंदाज आहेत, जे फिरकी गोलंदाजांविरुद्ध खेळताना मोठे फटके खेळू शकतात.

दरम्यान नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेणं इथे फायदेशीर ठरेल. या खेळपट्टीवर पाहिल्या डावात १८० धावा करणंही फायदेशीर ठरेल.पहिल्या डावात फलंदाजी करताना किती धावा करणं फायदेशीर ठरेल?भारत आणि वेस्ट इंडिज या दोन्ही संघांमध्ये एकापेक्षा एक स्टार फलंदाज आहेत. खेळपट्टी फिरकी गोलंदाजांसाठी फायदेशीर ठरेल. पण फिरकी गोलंदाजांविरुद्ध खेळताना मोठे फटके खेळले जाऊ शकतात. पहिल्या डावात फलंदाजी करताना १८० धावा करणं फायदेशीर ठरू शकतं. भारतीय संघाची बॅटिंग लाईनअप मोठी आहे. त्यामुळे भारतीय फलंदाज २०० धावांपर्यंत मजल मारू शकतात.