scorecardresearch

Ind vs WI : पृथ्वी शॉसाठी वेस्ट इंडिजची रणनिती तयार

पहिल्या कसोटीत पृथ्वीचं शतक

दुसऱ्या कसोटीआधी सरावादरम्यान पृथ्वी शॉ
पहिल्या कसोटीत मुंबईचा तरुण खेळाडू पृथ्वी शॉने आक्रमक शतकी खेळी करत सर्वांना आपली दखल घेण्यास भाग पाडलं. पृथ्वी शॉच्या खेळीपुढे वेस्ट इंडिजचे गोलंदाज पुरते हतबल ठरलेले पहायला मिळाले. मात्र 12 तारखेपासून हैदराबाद येथे होत असलेल्या कसोटीसाठी वेस्ट इंडिजने पृथ्वी शॉसाठी खास रणनिती आखली असल्याचं विंडिजचा अष्टपैलू खेळाडू रोस्टन चेसने म्हटलं आहे.

अवश्य वाचा – IND vs WI : पृथ्वी शॉची इतर कोणाशीही तुलना नको – विराट कोहली

“पहिल्या कसोटीत झालेल्या पराभवानंतर आम्ही त्यातून काही गोष्टी शिकलो आहोत. पृथ्वी शॉ फलंदाजीत काय करु शकतो याची आम्हाला पूर्णपणे कल्पना आलेली आहे. पहिल्या कसोटीत पराभव झाल्यानंतर आम्ही ड्रेसिंग रुममध्ये चर्चा केली, यामध्ये पृथ्वी शॉला कसं थांबवता येईल याची रणनिती आम्ही आखली आहे. ही रणनिती मी आता सांगू शकत नाही, मात्र मैदानात आम्ही पृथ्वी शॉला लवकर बाद करण्याचा प्रयत्न करु.” दुसरी कसोटी सुरु होण्यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत चेस बोलत होता.

अवश्य वाचा – IND vs WI : एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर; ऋषभ पंतला संधी

दुसऱ्या कसोटीत वेस्ट इंडिजचे केमार रोच आणि कर्णधार जेसन होल्डर हे खेळाडू संघात परतणार आहेत. पहिल्या कसोटीत या दोन्ही खेळाडूंच्या अनुपस्थितीत वेस्ट इंडिजचा संघ पुरता कोलमडला होता. या मालिकेत भारत 1-0 ने आघाडीवर आहे, त्यामुळे उद्यापासून सुरु होणाऱ्या कसोटीत वेस्ट इंडिजचे गोलंदाज पृथ्वी शॉचा कसा सामना करतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

अवश्य वाचा – IND vs WI : दुसऱ्या कसोटीसाठी मुंबईकर शार्दुल ठाकूरचा संघात समावेश

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: India vs west indies we have plans in place for prithvi shaw says roston chase