India vs Zimbabwe 3rd T20 Highlights : भारत आणि झिम्बाब्वे या दोन्ही संघांमध्ये ३ टी-२० सामन्यांची मालिका पार पडली. या मालिकेतील तिसरा सामना हरारेतील हरारे स्पोर्ट क्लबच्या मैदानावर पार पडला. या सामन्यतही भारतीय खेळाडूंकडून दमदार खेळ पाहायला मिळाला. या सामन्यातील पहिल्या डावात फलंदाजी करताना भारतीय संघाने १९२ धावांचा डोंगर उभारला होता. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या झिम्बाब्वेला १५७ धावांपर्यंत मजल मारता आली. यासह भारतीय संघाने हा सामना ३५ धावांनी आपल्या नावावर केला आहे.

Live Updates

[caption id="attachment_6040900" align="alignnone" width="670"]ishan kishan IND vs ZIM Live Highlights: भारत आणि झिम्बाब्वे सामन्याचे हायलाईट्स[/caption]

20:21 (IST) 26 Jul 2026

IND vs ZIM: वैभव सूर्यवंशीचं वादळी अर्धशतक अन् गोलंदाजांची दमदार गोलंदाजी; भारताचा झिम्बाब्वेवर ३-० ने विजय!

भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील तिसऱ्या टी-२० सामन्यात झिम्बाब्वेने भारतीय संघासमोर विजयासाठी १९३ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा बचाव करताना भारतीय संघाने हा सामना ३५ धावांनी आपल्या नावावर केला आहे.

19:41 (IST) 26 Jul 2026

IND vs ZIM Live: झिम्बाब्वेला विजयासाठी ६ षटकांत इतक्या धावांची गरज

झिम्बाब्वेला हा सामना जिंकण्यासाठी ६ षटकांत ८६ धावांची गरज आहे.

19:07 (IST) 26 Jul 2026

IND vs ZIM Live: झिम्बाब्वेचे ४ प्रमुख फलंदाज तंंबूत! टीम इंडिया मजबूत स्थितीत

झिम्बाब्वेला चौथा धक्का बसला आहे. बेन करन अवघ्या २० धावा करुन माघारी परतला आहे.

18:48 (IST) 26 Jul 2026

IND vs ZIM: W,W... यश ठाकूरने दिले लागोपाठ २ मोठे धक्के! सिकंदर रझा गोल्डन डकवर परतला माघारी

यश ठाकूरने झिम्बाब्वेला लागोपाठ २ मोठे धक्के दिले आहेत. आधी मेयर्स आणि त्यानंतर सिकंदर रझा शून्यावर माघारी परतला आहे.

18:27 (IST) 26 Jul 2026

IND vs ZIM: झिम्बाब्वेला पहिल्याच चेंडूवर पहिला धक्का! मयंकच्या भन्नाट चेंडूवर बेनेट परतला माघारी

धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या झिम्बाब्वेला पहिल्याच चेंडूवर मोठा धक्का बसला आहे. मयंकने बेनेटला गोल्डन डकवर माघारी धाडलं आहे.

18:06 (IST) 26 Jul 2026

IND vs ZIM: वैभव सूर्यवंशीची वादळी खेळी! भारताने झिम्बाब्वेसमोर ठेवलं इतक्या धावांचं आव्हान

या सामन्यातील पहिल्या डावात फलंदाजी करताना वैभव सूर्यवंशीने ८१ धावांची दमदार खेळी केली. या खेळीच्या बळावर भारतीय संघाने २० षटकांअखेर ५ गडी बाद १९२ धावा केल्या आहेत. झिम्बाब्वेला हा सामना जिंकण्यासाठी १९३ धावांची गरज आहे.

17:38 (IST) 26 Jul 2026

IND vs ZIM: वैभव सूर्यवंशीचं पहिलं शतक थोडक्यात हुकलं! असा झाला बाद

वैभव सूर्यवंशीकडे पहिलं शतक झळकावण्याची संधी होती. पण त्याचं शतक थोडक्यात हुकलं आहे. वैभव ८१ धावांवर बाद होऊन माघारी परतला आहे.

17:17 (IST) 26 Jul 2026

IND vs ZIM Live: टीम इंडियाला दुसरा मोठा धक्का

भारतीय संघाला ड्रिंक ब्रेकनंतर मोठा धक्का बसला आहे. इशान किशन २९ धावा करुन माघारी परतला आहे.

17:14 (IST) 26 Jul 2026

IND vs ZIM: वैभव सूर्यवंशीची बॅट पुन्हा एकदा तळपली! अवघ्या इतक्या चेंडूंमध्ये झळकावलं अर्धशतक

वैभव सूर्यवंशीने या मालिकेतील पहिल्या सामन्यात अर्धशतक झळकावलं होतं. आता तिसऱ्या सामन्यातही त्याने ३१ चेंडूंमध्ये अर्धशतक पूर्ण केलं आहे.

16:57 (IST) 26 Jul 2026

IND vs ZIM: टीम इंडियाची दमदार सुरुवात! इशान - वैभवची जोडी जमली

भारतीय संघाने दमदार सुरुवात केली आहे. वैभव सूर्यवंशी आणि इशान किशनने मिळून भारतीय संघाची धावसंख्या ५० पार पोहोचवली आहे.

16:39 (IST) 26 Jul 2026

IND vs ZIM: अभिषेक शर्मा सलग तिसऱ्या सामन्यात फ्लॉप! अवघ्या इतक्या धावांवर झाला बाद

भारतीय संघाला पहिला मोठा धक्का बसला आहे. अभिषेक शर्मा अवघ्या २ धावा करुन माघारी परतला आहे.

16:36 (IST) 26 Jul 2026

IND vs ZIM: टीम इंडियाची दमदार सुरुवात

प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या भारतीय संघाने दमदार सुरुवात केली आहे. भारतीय फलंदाजांनी पहिल्याच षटकात १७ धावा वसूल केल्या आहेत.

16:13 (IST) 26 Jul 2026

IND vs ZIM: दोन्ही संघांची प्लेईंग ११

झिम्बाब्वे (प्लेइंग ११): ब्रायन बेनेट, बेन करन, डिओन मायर्स, सिकंदर रझा (कर्णधार), रायन बर्ल, वेस्ली मधेवेरे, ताडीवानाशे मारुमणी (यष्टिरक्षक), ब्रॅड एव्हान्स, न्यूमन न्यामहुरी, वेलिंग्टन मसाकाद्झा, ब्लेसिंग मुझाराबानी

भारत (प्लेइंग ११): वैभव सूर्यवंशी, अभिषेक शर्मा, इशान किशन (यष्टिरक्षक), श्रेयस अय्यर (कर्णधार), तिलक वर्मा, रिंकू सिंग, सूर्यांश शेडगे, रवी बिश्नोई, यश ठाकूर, मयंक यादव, अशोक शर्मा

16:12 (IST) 26 Jul 2026

IND vs ZIM: २ बदलांसह उतरणार मैदानात

या सामन्यात भारतीय संघ २ बदलांसह मैदानात उतरणार आहे. शिवम दुबे आणि प्रिन्स यादव यांना विश्रांती देण्यात आली आहे. त्याच्यां जागी अशोक शर्मा आणि सूर्यांश शेडगेला संधी देण्यात आली आहे.

16:11 (IST) 26 Jul 2026

IND vs ZIM: नाणेफेक

या सामन्यातही कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

IND vs ZIM Highlights: भारत आणि झिम्बाब्वे सामन्याचे हायलाईट्स