IND vs ZIM 4th T20 Match Highlights : भारत आणि झिम्बाब्वे संघांत हरारे स्पोर्ट्स क्लब येथे पाच सामन्यांची टी-२० मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील चौथा सामना शनिवारी पार पडला. ज्यामध्ये भारताच्या युवा ब्रिगडने यशस्वी जैस्वाल आणि शुबमन गिलच्या विक्रमी भागीदारीच्या जोरावर झिम्बाब्वेचा १० विकेट्सनी धुव्वा उडवत मालिका जिंकली. या सामन्यात भारतीय संघाने प्रथम गोलंदाजी करताना झिम्बाब्वे संघाला १५२ रोखले होते. यानंतर प्रत्युत्तरात धावांचा पाठलाग करताना १५.२ षटकांत एकही गडी न गमावता विजयावर शिक्कामोर्तब केला. या विजयासह टीम इंडियाने मालिकेत ३-१ अशी अजेय आघाडी घेतली आहे.