भारतीय संघाचे फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड यांचे स्पष्ट मत

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
Raj Thackeray on Maharashtra Election 2024
Raj Thackeray : निवडणुकीच्या निकालानंतर राज ठाकरेंनी पहिल्यांदाच…
What is NOTA in Elections and What Happens When NOTA gets Most Votes
NOTA in Elections : NOTA खरंच महत्त्वाचे आहे का? सर्वाधिक मते नोटाला मिळाले तर काय होईल?

विराट कोहली वेस्ट इंडिजविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत अपयशी ठरल्याने त्याच्याविषयी सगळीकडे निर्थक चर्चा करण्यात येत आहे. मात्र संघातील प्रत्येकी खेळाडूसह प्रशिक्षकांनाही कोहलीच्या क्षमतेवर विश्वास असल्याने आम्ही त्याच्या अपयशाची चिंताच करत नाही, असे स्पष्ट मत भारतीय क्रिकेट संघाचे फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड यांनी व्यक्त केले.

माजी कर्णधार कोहलीने विंडीजविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यांत अनुक्रमे ८, १८, ० अशा धावा केल्या. गेल्या दोन वर्षांपासून कोहलीची ७१व्या शतकाची प्रतीक्षा कायम आहे. त्यातच कर्णधारपद गमावल्याचा त्याच्या कामगिरीवर परिणाम होत असल्याची चर्चा चाहत्यांमध्ये रंगत आहे. मात्र राठोड यांनी याकडे दुर्लक्ष करण्याचे सुचवले आहे.

‘‘कोहली सुमार कामगिरी करत आहे, असा विचारच आम्ही करत नाही. कारण जानेवारीत आफ्रिकेविरुद्ध त्याने दोन अर्धशतके झळकावली. त्याशिवाय गेल्या वर्षभरात तो धावा नक्कीच करत आहे. फक्त शतक झळकावण्यात त्याला अपयश येत आहे,’’ असे ५२ वर्षीय राठोड पत्रकार परिषदेदरम्यान म्हणाले. एकदिवसीय प्रकारात कोहलीने ऑगस्ट २०१९ मध्ये अखेरचे शतक झळकावले. त्यानंतर त्याने १० वेळा अर्धशतकाचा टप्पा ओलांडला. मात्र शतक झळकावणे त्याला जमलेले नाही.

‘‘कोहली हा अव्वल दर्जाचा फलंदाज असल्यामुळे त्याच्या अर्धशतकाची गणनाही अपयशात होते. सरावात तो आताही तितकीच मेहनत घेत आहे. कर्णधारपद गमावल्याचा त्याच्या खेळावर अथवा मानसिकतेवर काहीही परिणाम झालेला नाही. एकदा का त्याची शतक कोंडी फुटली, की मग तो पूर्वीप्रमाणे शतकांचा सपाटा लावेल,’’ असेही राठोड यांनी सांगितले. एकदिवसीय मालिकेत ३-० असे निर्भेळ यश संपादन करणाऱ्या रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ बुधवारपासून विंडीजविरुद्ध तीन सामन्यांची ट्वेन्टी-२० मालिका खेळणार आहे.

पंत मधल्या फळीसाठी योग्य!

मधल्या फळीत भारताला डावखुऱ्या फलंदाजाची गरज असल्याने ऋषभ पंतला एकदिवसीय सामन्यात पाचव्या अथवा सहाव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी पाठवण्यात येईल, असे राठोड यांनी नमूद केले. विंडीजविरुद्धच्या दुसऱ्या लढतीत पंतने सलामीवीराची भूमिका बजावली होती. ‘‘संघाच्या गरजेनुसार पंतच्या फलंदाजीचा क्रमांक ठरवण्यात येईल. मात्र २०२३च्या एकदिवसीय विश्वचषकाचा निर्णय करता भारताकडे मधल्या फळीत डावखुरा फलंदाज नसल्याने पंत सलामीला उतरण्याची शक्यता कमी आहे. ट्वेन्टी-२० प्रकारात मात्र त्याला नक्कीच वरच्या क्रमांकावर पाठवता येऊ शकते,’’ असे राठोड म्हणाले.

ऋतुराजसाठी उत्तम संधी

उपकर्णधार के. एल. राहुलच्या अनुपस्थितीत इशान किशन, ऋतुराज गायकवाड यांना भारताच्या ट्वेन्टी-२० संघातील स्थान पक्के करण्याची उत्तम संधी आहे, अशी प्रतिक्रिया राठोड यांनी व्यक्त केली. ‘‘विंडीजविरुद्धच्या ट्वेन्टी-२० मालिकेत इशान आणि ऋतुराजला आलटून-पालटून सलामीला संधी देण्याचा आमचा प्रयत्न असेल. दोघांमध्येही पहिल्या चेंडूपासून आक्रमण करण्याची क्षमता असून यामुळे रोहितवरील दडपण कमी होईल,’’ असे राठोड यांनी आवर्जून सांगितले.

Story img Loader