पहिल्या सामन्यात विंडीजवर सहा गडी राखून मात; बिश्नोईची पदार्पणात चमक

IPL 2024 : चेन्नईसाठी आनंदाची बातमी, पंजाबविरुद्धच्या सामन्यासाठी ‘या’ खेळाडूला बोर्डाकडून मिळाली सुट्टी
IPL 2024 Mumbai Indians vs Chennai Super Kings Match Updates in Marathi
IPL 2024: पथिरानाखेरीज तुषार देशपांडे, शार्दुल ठाकूरची २ षटके ठरली सामन्याचा टर्निंग पॉइंट; वाचा सविस्तर
RR vs GT Match Updates Dhanshree Verma wished her husband Yuzvendra Chahal who played 150th IPL Match
RR vs GT : धनश्री वर्माने १५०वा आयपीएल सामना खेळणाऱ्या युजवेंद्र चहलला दिल्या खास शुभेच्छा, VIDEO होतोय व्हायरल
Ravindra Jadeja Earned Cricket Thalapathy Title From Chennai Super Kings
IPL 2024: रवींद्र जडेजाला CSKने दिलं स्पेशल नाव; थाला, चिन्ना थालासोबत आता चेन्नईच्या ताफ्यात ‘क्रिकेट थालापती’

लेग-स्पिनर रवी बिश्नोईच्या (२/१७) पदार्पणातील प्रभावी माऱ्यानंतर रोहित शर्मा (१९ चेंडूंत ४० धावा) आणि सूर्यकुमार यादव (१८ चेंडूंत नाबाद ३४) या मुंबईकरांनी केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर भारताने बुधवारी पहिल्या ट्वेन्टी-२० सामन्यात वेस्ट इंडिजला सहा गडी आणि सात चेंडू राखून नमवले. या विजयासह तीन सामन्यांच्या मालिकेत भारताने  १-० अशी आघाडी घेतली आहे.

कोलकाता येथील ईडन गार्डन्स मैदानावर झालेल्या या सामन्यात पाहुण्या विंडीजने दिलेले १५८ धावांचे लक्ष्य भारताने १८.५ षटकांत गाठले. भारताचा कर्णधार रोहित शर्माने आक्रमक शैलीत फलंदाजी करत विंडीजच्या गोलंदाजांवर दडपण टाकले. त्याने १९ चेंडूंतच चार चौकार आणि तीन षटकारांच्या साहाय्याने ४० धावा फटकावल्या. त्याचा सलामीचा साथीदार इशान किशनला (४२ चेंडूंत ३५) मात्र धावांचा वेग राखण्यात अपयश आले. या दोघांनी ६४ धावांची सलामी दिल्यावर त्यांना फिरकीपटू रॉस्टन चेसने माघारी पाठवले. मग विराट कोहली (१७) आणि ऋषभ पंत (८) यांना खेळपट्टीवर फार काळ टिकाव धरता आला नाही. पण हे दोघे बाद झाल्यावर सूर्यकुमार आणि डावखुरा वेंकटेश अय्यर (१३ चेंडूंत नाबाद २४) यांनी पाचव्या गडय़ासाठी ४८ धावांची अभेद्य भागीदारी रचत भारताला विजय मिळवून दिला.

तत्पूर्वी, विंडीजने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ७ बाद १५७ अशी धावसंख्या उभारली. त्यांचा सलामीवीर ब्रेंडन किंगला (४) भुवनेश्वर कुमारने पहिल्याच षटकात बाद केले. यानंतर कायले मेयर्स (२४ चेंडूंत ३१) आणि निकोलस पूरन (४३ चेंडूंत ६१) यांनी चांगली फलंदाजी करत विंडीजचा धावफलक हलता ठेवला. मेयर्सला चहलने बाद केले, तर चेस आणि रोव्हमन पॉवेल (२) यांना पदार्पणवीर बिश्नोईने एकाच षटकात माघारी धाडत विंडीजला अडचणीत टाकले. अखेर पूरनला कर्णधार किरॉन पोलार्डची (१९ चेंडूंत नाबाद २४) साथ लाभल्याने विंडीजला १५० धावांचा टप्पा पार करण्यात यश आले.

९ आंतरराष्ट्रीय ट्वेन्टी-२० पदार्पणात सामनावीराचा पुरस्कार पटकावणारा बिश्नोई हा भारताचा नववा खेळाडू ठरला. तसेच ही कामगिरी करणारा तो प्रज्ञान ओझा आणि अक्षर पटेल यांच्यानंतरचा तिसरा भारतीय फिरकीपटू आहे.

संक्षिप्त धावफलक

वेस्ट इंडिज : २० षटकांत ७ बाद १५७ (निकोलस पूरन ६१, कायले मेयर्स ३१, किरॉन पोलार्ड नाबाद २४; रवी बिश्नोई २/१७, हर्षल पटेल २/३७) विजयी वि. भारत : षटकांत (रोहित शर्मा ४०, इशान किशन ३५, सूर्यकुमार यादव नाबाद ३४; रॉस्टन चेस २/१४)

’  सामनावीर : रवी बिश्नोई