चेंगडू : भारतीय पुरुष संघाने आपली विजयाची मालिका कायम राखताना कझाकस्तानचा पराभव करून बाद फेरीच्या आशा कायम ठेवल्या आहेत. त्याच वेळी महिला संघाने इजिप्तचा ३-१ असा पराभव करत बाद फेरीत प्रवेश केला आहे.

रविवारी उझबेकिस्तानला नमवल्यानंतर महिला संघाने सोमवारी इजिप्तचे आव्हान सहज परतवून लावले. भारताच्या विजयात श्रीजा अकुलाची कामगिरी निर्णायक ठरली. श्रीजाने पहिल्या लढतीत गोडा हानचा ११-६, ११-४, ११-१ असा पराभव केला. त्यानंतर चौथ्या लढतीत श्रीजाने डिना मिश्रफचे आव्हान ११-८, ११-८, ९-११, ११-६ असे परतवून लावले. दिया चितळेला मात्र पराभवाचा सामना करावा लागला. एकेरीच्या अन्य लढतीत मनिकाने  डिनाला ८-११, ११-६, ११-७, २-११, ११-८ असे पराभूत केले. भारताच्या पुरुष संघाने सलग तिसरा विजय मिळविला असला, तरी बाद फेरीत प्रवेशासाठी त्यांना अखेरच्या साखळी लढतीत फ्रान्सला नमवावे लागेल. पुरुष संघाने सोमवारी कझाकस्तानवर ३-२ अशी मात केली.