India Womens vs Australia Womens Day- Night Test: हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय महिला संघाने २०२५ मध्ये झालेल्या आयसीसी वनडे वर्ल्डकप २०२५ स्पर्धेत जेतेपदाचा मान मिळवला होता. आता भारताचा संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. या दौऱ्यावर भारतीय संघ वनडे आणि टी-२० सामन्यांची मालिका खेळण्यासाठी मैदानात उतरला आहे. या दौऱ्यावर झालेल्या टी-२० मालिकेत भारतीय संघाने २-१ ने बाजी मारली होती. तर वनडे मालिकेत भारतीय संघाला आपली छाप सोडता आली नव्हती. ही मालिका भारतीय संघाने ३-० ने गमावली. मर्यादीत षटकांची मालिका झाल्यानंतर आता भारतीय संघ एकमेव कसोटी सामना खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे. हा सामना डे-नाईट कसोटी सामना असणार आहे.
भारत- ऑस्ट्रेलिया खेळणार एकमेव कसोटी सामना
भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये होणारा कसोटी सामना ६ मार्चला पर्थच्या वाका क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार सकाळी १०:५० ला सुरू होईल. दोन्ही संघांचा कसोटी क्रिकेटमधील हेड टू हेड रेकॉर्ड पाहिला, तर दोन्ही संघ एकूण ११ वेळेस आमनेसामने आले आहेत. यादरम्यान ऑस्ट्रेलियाचं पारडं जड राहिलं आहे. दोन्ही संघ ११ वेळेस आमनेसामने आले आहेत. यादरम्यान ६ सामने ड्रॉ राहिले आहेत. भारतीय संघाने केवळ १ सामना जिंकला आहे. तर ऑस्ट्रेलियाने ४ सामन्यांमध्ये बाजी मारली आहे.
भारत- ऑस्ट्रेलिया डे-नाईट कसोटी सामना लाईव्ह कुठे पाहता येणार?
हा सामना डे-नाईट कसोटी सामना असणार आहे. त्यामुळे हा सामना पिंक बॉलने खेळवला जाणार आहे. हा सामना तुम्ही स्टार स्पोर्ट्सवर लाईव्ह पाहू शकता. तसेच या सामन्याचे लाईव्ह स्ट्रिमिंग तुम्ही जियो हॉटस्टारवर लाईव्ह पाहू शकता. याआधी भारत आणि दक्षिण आफ्रिका महिला संघ यांच्यात डे-नाईट कसोटी सामन्याचा थरार पाहायला मिळाला होता. वनडे मालिका गमावलेला भारतीय संघ आता एकमेव कसोटी सामना जिंकणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
डे- नाईट कसोटी सामन्यासाठी असे आहेत दोन्ही संघ:
भारतीय महिला कसोटी संघ- हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्म्रिती मानधाना (उपकर्णधार), शेफाली वर्मा, जेमिमा रॉड्रिग्स, अमनज्योत कौर, ऋचा घोष (यष्टीरक्षक), उमा छेत्री (यष्टीरक्षक), प्रतिका रावल, हरलीन देओल, दीप्ति शर्मा, काश्वी गौतम, स्नेह राणा, क्रांती गौड, वैष्णवी शर्मा, सायली सातघरे.
ऑस्ट्रेलिया महिला कसोटी संघ – एलिसा हिली (कर्णधार), डार्सी ब्राउन, मॅटलन ब्राउन,अॅश्ले गार्डनर, लूसी हॅमिल्टन, अलाना किंग, फोएब लिचफील्ड, बेथ मूनी (यष्टीरक्षक), ताहलिया मॅकग्राथ, एलिस पेरी, एनाबेल सदरलँड, रेचल ट्रेनमन, जॉर्जिया वोल, जॉर्जिया वेयरहॅम.
