INDW vs IREW Updates: आयसीसी महिला टी-२० विश्वचषक स्पर्धेतील १८ वा सामना भारत आणि आयर्लंड संघात खेळला गेला आहे. या सामन्यात भारतीय संघाने डकवर्थ लुईस नियमानुसार ५ धावांनी विजय मिळवला. या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ६ बाद १५५ धावा केल्या होत्या. त्याचबरोबर आयर्लंड संघाला १५६ धावांचा पाठलाग करताना पावसामुळे आलेल्या व्यत्ययामुळे ८.२ षटकांत २ बाद ५४ धावाच करता आल्या.

आयसीसी महिला टी-२० विश्वचषक स्पर्धेतील १८ वा सामना भारत आणि आयर्लंड संघात खेळला गेला आहे. या सामन्यात भारतीय संघाने डकवर्थ लुईस नियमानुसार ५ धावांनी विजय मिळवला. या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ६ बाद १५५ धावा केल्या होत्या. त्याचबरोबर आयर्लंड संघाला १५६ धावांचा पाठलाग करताना पावसामुळे आलेल्या व्यत्ययामुळे ८.२ षटकांत २ बाद ५४ धावाच करता आल्या.

Australia vs New Zealand 1st Match Updates in Marathi
NZ vs AUS : ग्रीन-हेझलवूडची शेवटच्या विकेटसाठी विक्रमी भागीदारी, कॅमेरूनच्या शतकाने सावरला ऑस्ट्रेलियाचा डाव
team india kl rahul bcci
IND Vs ENG : केएल राहुल पाचव्या कसोटीलाही मुकणार, संघात दिग्गज खेळाडूचं पुनरागमन; अशी असेल टीम इंडिया
Sarfaraz Khan's Cricket Journey
Sarfaraz Khan : ‘…तर रेल्वेमध्ये कपडे विकायला जाऊ शकतो’, सर्फराझच्या वडिलांना आठवला ‘तो’ भावनिक प्रसंग
Mumbai vs Baroda Ranji Trophy Trophy Hardik Tamore century
हार्दिक तामोरेची शतकी खेळी

पावसामुळे सामना थांबण्यापूर्वी ८.२ षटकांत २ बाद ५४ धावाच करता केल्या होत्या. ज्यामुळे डकवर्थ लुईस नियमानुसार आयर्लंड संघ टीम इंडियाच्या ५ धावांनी मागे होता. याचाच फटका आयर्लंड संघाला बसला. अशा पद्धतीने भारतीय संघाने उपांत्य फेरीत धडक मारली आहे. भारतीय संघाकडून स्मृती मंधानाने सर्वाधिक धावा केल्या.

मंधानाने ५६ चेंडूचा सामना करताना ९ चौकार आणि ३ षटकाराच्या मदतीने ८७ धावांची महत्वपूर्ण खेळी केली. त्यामुळे टीम इंडियाला मोठी धावसंख्या उभारण्यात यश आले. त्याचबरोबर तिने शफाली वर्मासोबत पहिल्या विकेटसाठी महत्वाची भागीदारी केली. आयर्लंड संघाकडून गोलंदाजी करताना कर्णधार लॉरा डेलेनीने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या. त्याचबरोबर ओर्ला प्रेंडरगैस्टने दोन आणि आर्लेन केलीने एक विकेट घेतली. १५६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना,आयर्लंडने ८.२ षटकांत दोन गडी गमावून ५४ धावा केल्या. गॅबी लुईस २५ चेंडूत ३२ आणि कर्णधार एल डेलनी १७ चेंडूत २० धावांवर नाबाद राहिले. भारताकडून रेणुका सिंगने एक विकेट घेतली.

या गटातून इंग्लंडचा संघ आधीच उपांत्य फेरीत पोहोचला आहे. सध्या इंग्लंड ब गटातील गुणतालिकेत तीन सामन्यांत तीन विजय आणि सहा गुणांसह अव्वल स्थानावर आहे. त्याला शेवटचा गट सामना पाकिस्तानविरुद्ध खेळायचा आहे. अशा स्थितीत अव्वल स्थानावर असताना इंग्लंड उपांत्य फेरी गाठणार हे जवळपास निश्चित आहे.

हेही वाचा – INDW vs IREW: धोनी, कोहली आणि रोहितला मागे टाकत हरमनप्रीत कौरने रचला इतिहास; ‘ही’ कामगिरी करणारी ठरली जगातील पहिली क्रिकेटपटू

त्याचबरोबर भारतीय संघ दुसऱ्या स्थानावर राहून उपांत्य फेरी गाठेल. इंग्लंडचा निव्वळ रन रेट +१.७७६ आहे. पाकिस्तानविरुद्धच्या पराभवानंतरही इंग्लंडचा संघ पहिल्या स्थानावर राहू शकतो. त्याच वेळी, भारताचा निव्वळ रन रेट +०.२९० आहे. ब गटातील वेस्ट इंडिज, आयर्लंड आणि पाकिस्तानचे संघ स्पर्धेतून बाहेर आहेत.

भारतीय संघ दुसऱ्या स्थानावर राहून उपांत्य फेरीत पोहोचला, तर अंतिम चारमध्ये त्यांचा सामना जगज्जेत्या ऑस्ट्रेलियाशी होईल. भारतासाठी अंतिम फेरीचा मार्ग सोपा असणार नाही. आतापर्यंत ‘अ’ गटातील केवळ ऑस्ट्रेलियन संघ चारपैकी चार सामने जिंकून उपांत्य फेरीत पोहोचला आहे.

हेही वाचा – PAK vs ENG: ‘जर मी असतो तर पाकिस्तानसाठी मरून राष्ट्रीय हिरो झालो असतो’; शोएब अख्तरने शाहीन आफ्रिदीला काढला चिमटा

त्याचवेळी दुसऱ्या स्थानासाठी न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात लढत आहे. ‘अ’ गटातील दुसऱ्या स्थानी असलेल्या संघाची उपांत्य फेरीत इंग्लंडशी गाठ पडेल. पहिला उपांत्य सामना २३ फेब्रुवारीला तर दुसरा उपांत्य सामना २४ फेब्रुवारीला होणार आहे. २६ फेब्रुवारीला केपटाऊनमध्ये अंतिम सामना खेळवला जाईल.