पीटीआय, शांघाय
भारताची आघाडीची तिरंदाज ज्योती सुरेखा वेन्नमने आशियाई क्रीडा स्पर्धेपाठोपाठ नव्या हंगामातील विश्वचषक स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात कम्पाऊंड प्रकारात सुवर्णपदकांची हॅट्ट्रिक नोंदवली. या स्पर्धेत भारताच्या कम्पाऊंड तिरंदाजांनी पदकांचे पंचक पूर्ण केले.

जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर असलेल्या ज्योतीला वैयक्तिक फेरीत मेक्सिकोची अग्रमानांकित तिरंदाज आंद्रेआ बेसेराकडून कडवा प्रतिकार सहन करावा लागला. निर्धारित फेरीत लढत १४६-१४६ अशी बरोबरीत सुटली होती. त्यानंतर टायब्रेकरही

euro 2024 opening match germany vs scotland
युरो फुटबॉल स्पर्धेचा थरार आजपासून; पहिल्या सामन्यात यजमान जर्मनीची गाठ स्कॉटलंडशी
BCCI announced the schedule of Ranji tournament Vidarbha in Group B for Tournament
रणजी स्पर्धेसाठी विदर्भ ‘ब’ समूहात, ‘या’ संघाशी होणार सामना…
Twenty20 World Cup 2024 India vs Pakistan match sport news
IND vs PAK T20 World Cup 2024:भारत-पाकिस्तान द्वंद्वाची पर्वणी! ट्वेन्टी२० विश्वचषकात आज पारंपरिक प्रतिस्पर्धी आमनेसामने
India vs Kuwait football match today in World Cup football qualifiers sport news
छेत्रीला विजयी निरोप देण्याचा निर्धार! विश्वचषक फुटबॉल पात्रता फेरीत भारताचा आज कुवेतशी सामना
India vs Ireland match Twenty20 World Cup Cricket Indian Team sport news
विश्वचषक मोहिमेस प्रारंभ! भारताची आज आयर्लंडशी सलामी; रोहित-कोहली जोडीकडे लक्ष
How India Won First T20 World Cup 2007
T20 World Cup : ॲक्शन…थ्रिलर…रोमांच, सर्व काही एकाच सामन्यात, जाणून घ्या भारताने २००७ ची फायनल कशी जिंकली?
Virat's Reaction to T20 World Cup in America
T20 WC 2024 : “मी कधीही विचार केला नव्हता की…”, अमेरिकेत होणाऱ्या टी-२० विश्वचषकावर विराट कोहलीचे मोठे वक्तव्य
pv sindhu
मलेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धा: सिंधू उपांत्यपूर्व फेरीत; अश्मिताचा तिसऱ्या मानांकित झँगला धक्का

९-९ असा बरोबरीत राहिला. मात्र, केवळ अचूक लक्ष्यभेदाच्या जोरावर ज्योतीला विजयी घोषित करण्यात आले. यंदाच्या विश्वचषक स्पर्धेतील ज्योतीचे हे तिसरे सुवर्णपदक ठरले. एका विश्वचषकात तीन सुवर्णपदके जिंकणारी ज्योती ही दीपिका कुमारीनंतरची केवळ दुसरी भारतीय तिरंदाज ठरली. तीन वेळा ऑलिम्पिक स्पर्धेत खेळलेल्या दीपिकाने २०२१ मध्ये विश्वचषक स्पर्धेच्या तिसऱ्या टप्प्यात अशी कामगिरी केली होती.

हेही वाचा >>>DC vs MI: मुंबई इंडियन्सच्या पराभवानंतर इशान किशनवर दंडात्मक कारवाई, वाचा काय आहे कारण

पुरुषांच्या वैयक्तिक प्रकारात प्रियांशनेही अंतिम फेरी गाठली होती. मात्र, त्याला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. वयाच्या २१व्या वर्षी प्रियांश आपल्या दुसऱ्या विश्वचषक स्पर्धेत खेळत आहे. अंतिम लढतीत २०२१चा विजेता निको विएनेरने सफाईदार कामगिरी करताना प्रियांशला निष्प्रभ केले. निकोने १५० पैकी १५० गुणांचा वेध घेतला. त्याने प्रियांशवर १५०-१४७ अशी मात केली.

त्यापूर्वी सकाळच्या सत्रात ऑलिम्पिक क्रीडा प्रकार नसलेल्या कम्पाऊंड तिरंदाजी भारताने आपली मक्तेदारी सिद्ध करताना महिला आणि पुरुष या दोनही सांघिक गटांत सुवर्णपदकाची कमाई केली. त्यानंतर ज्योतीने अभिषेक वर्माच्या साथीने मिश्र दुहेरीत सोनेरी लक्ष्य सहज गाठले.

हेही वाचा >>>IPL 2024 : दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या पराभवानंतर मुंबई इंडियन्सच्या वाढल्या अडचणी, प्लेऑफमध्ये पोहोचणे झाले अवघड

महिलांच्या सांघिक अंतिम लढतीत ज्योती, महाराष्ट्राची आदिती स्वामी आणि परणीत कौर या तिघींनी केवळ चार गुण गमावताना इटलीचा २३६-२२७ असा सहज पराभव केला. अभिषेक वर्मा, प्रियांश आणि प्रथमेश फुगे या भारतीय पुरुष संघाने नेदरलँड्सवर २३८-२३१ अशी सरशी साधत सुवर्णयश मिळवले. नेदरलँड्सच्या संघात माईक शोलेसर, सिल पॅटर आणि स्टेफ विल्लेम्स यांचा समावेश होता. मिश्र सांघिक गटाच्या अंतिम लढतीत ज्योती आणि अभिषेकने इस्टोनियाच्या दुबळय़ा लिसेल जातमा-रॉबिन जातमा जोडीवर १५८-१५७ अशी मात केली.

आता दीपिकाकडे लक्ष

विश्वचषक तिरंदाजीत रिकव्‍‌र्ह प्रकाराच्या अंतिम फेरी रविवारी रंगणार आहेत. यात भारतीयांचे लक्ष दीपिका कुमारीच्या कामगिरीकडे असेल. मातृत्वासाठी घ्याव्या लागलेल्या दीर्घ विश्रांतीनंतर पुनरागमन करताना दीपिका कुमारीने पहिल्याच प्रयत्नात वैयक्तिक प्रकारात उपांत्य फेरी गाठली आहे. तिची गाठ दक्षिण कोरियाच्या स्पर्धकाशी पडणार आहे. त्याचबरोबर भारताचा पुरुष संघही अंतिम लढतीत आपले आव्हान उपस्थित करेल. त्यामुळे भारताच्या खात्यात आणखी दोन पदके पडणार आहेत, पण या पदकांचा रंग आज निश्चित होईल.