थॉमस कप २०२२ च्या फायनलमध्ये भारतीय बॅडमिंटन संघाने इतिहास रचला आहे. भारताने रविवारी सलग तिसऱ्या सामन्यात गतविजेत्या इंडोनेशियाचा पराभव करून थॉमस कप २०२२ चे विजेतेपद पटकावले. भारताने पहिले तीन सामने जिंकून १४ वेळच्या चॅम्पियन इंडोनेशियाचा एकतर्फी ३-० असा पराभव केला. भारतासाठी, लक्ष्य सेनने पुरुष एकेरीत, सात्विकसाईराज रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टीने पुरुष दुहेरीमध्ये आणि किदाम्बी श्रीकांतने पुरुष एकेरी गटात आपापले सामने जिंकले. यासह भारताने प्रथमच थॉमस कप जेतेपद पटकावले आहे.

पहिल्या सामन्यात त्यांनी पुरुष एकेरी गटात जागतिक क्रमवारीत नवव्या क्रमांकाचा शटलर लक्ष्य सेन आणि जागतिक क्रमवारीत चौथ्या क्रमांकावर असलेल्या अँथनी सिनिसुका गिंटिंगचा पराभव केला. दुसऱ्या सामन्यात सात्विकसाईराज रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या भारतीय जोडीने पुरुष दुहेरी गटात इंडोनेशियन जोडी केविन संजय आणि मोहम्मद अहसान यांचा पराभव केला. त्याचवेळी, तिसऱ्या सामन्यात किदाम्बी श्रीकांतने जोनाथन क्रिस्टीचा पराभव करत भारताला प्रथमच थॉमस कपचे चॅम्पियन बनवले.

d Gukesh defeated Nijat Abasov in the Candidates chess tournament sport news
गुकेश संयुक्त आघाडीवर! पाचव्या फेरीत अबासोववर मात; अन्य भारतीयांच्या लढती बरोबरीत
Despite the efforts of PR Sreejesh the Indian hockey team lost
श्रीजेशच्या प्रयत्नांनंतरही भारतीय हॉकी संघाचा पराभव
Shubman Gill fined 12 lakhs
IPL 2024 : गुजरात टायटन्सला पराभवानंतर आणखी एक धक्का, कर्णधार शुबमन गिलला ‘या’ कारणासाठी ठोठावला दंड
IPL 2024 Chennai Super Kings vs Royal Challengers Bangalore Match Updates in Marathi
IPL 2024 CSK vs RCB: चार दिवसांपूर्वी स्ट्रेचरवर, आज चेन्नईचा हिरो; मुस्ताफिझूर रहमानच्या गोलंदाजीवर आरसीबीने टेकले गुडघे

पुरुष एकेरी विभागात गिंटिंगने लक्ष्य सेनविरुद्ध धमाकेदार सुरुवात करत पहिला गेम २१-८ असा जिंकला, पण दुसऱ्या गेममध्येही लक्ष्यने जोरदार पुनरागमन करत दुसरा गेम २१-१७ असा जिंकून २-२ अशी बरोबरी साधली. तिसऱ्या आणि निर्णायक गेममध्ये दोघांमध्ये चुरशीची स्पर्धा झाली. दोन्ही खेळाडू एकदा १२-१२ ने बरोबरीत होते. पण लक्ष्याने ४ गुणांची आघाडी घेत स्कोअर १८-१४ वर नेला आणि त्यानंतर तिसरा आणि निर्णायक गेम २१-१७ असा जिंकून भारताला सामन्यात १-० अशी आघाडी मिळवून दिली. लक्ष्यने गिंटिंगला एक तास ५ मिनिटांत हरवले.

भारताने या मोसमात चायनीज तैपेईविरुद्ध फक्त एकच सामना गमावला, तर १४ वेळच्या चॅम्पियन इंडोनेशियाने एकही सामना गमावला नाही आणि बाद फेरीत चीन आणि जपानला नमवून अंतिम फेरी गाठली.

दुसऱ्या सामन्यात, पुरुष दुहेरी गटात सात्विकसाईराज रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या भारतीय जोडीचा सामना केविन संजय आणि मोहम्मद अहसान या इंडोनेशियन जोडीशी झाला. पहिल्या गेममध्ये अवघ्या १८ मिनिटांत भारतीय जोडी १८-२१ अशी पराभूत झाली.

बँकॉक येथील इम्पॅक्ट एरिना येथे झालेल्या सामन्याच्या दुसऱ्या गेममध्ये भारतीय जोडीने दमदार पुनरागमन केले आणि एका क्षणी गुणसंख्या ११-६ अशी नेली. मात्र, या दोन्ही जोडीतील दुसरा गेम २१-२१ असा बरोबरीत सुटला. त्यानंतर रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीने दुसरा गेम २३-२१ असा जिंकला.

तिसऱ्या आणि निर्णायक गेममध्ये रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीने पुन्हा एकदा ११-९ अशी आघाडी घेतली. पण पुढच्या काही मिनिटांतच इंडोनेशियन जोडीने स्कोअर ११-११ असा बरोबरीत आणला. यानंतर एकदा दोन्ही जोडीने स्कोअर १७-१७ असा बरोबरीत आणला. त्यानंतर भारतीय जोडीने २०-१८ अशी आघाडी घेत एक तास १३ मिनिटांत सामना २१-१९ असा जिंकला. रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीच्या विजयासह भारतीय संघाने सामन्यात २-० अशी आघाडी घेतली.

पुरुष एकेरी गटात किदाम्बी श्रीकांत आणि जोनाथन क्रिस्टी यांच्यात तिसरा सामना झाला. पहिल्या गेममध्ये श्रीकांतने जोनाथनविरुद्ध १४-१० अशी आघाडी घेतली होती. श्रीकांतने येथून पुन्हा १९-१५ अशी आघाडी घेतली आणि पहिला गेम २१-१६ असा जिंकला.

दुसऱ्या गेममध्येही श्रीकांत १२-८ ने पुढे होता. यानंतर दोन्ही खेळाडू २१-२१ असे बरोबरीवर आले. त्यानंतर श्रीकांतने सलग दुसरा गेम ४३ मिनिटांत २३-२१ असा जिंकून भारताला सलग तिसऱ्या सामन्यात ३-० असा विजय मिळवून देत इतिहास रचला.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून बॅडमिंटन संघाचे अभिनंदन

“तब्बल ७३ वर्षांनंतर थॉमस कप स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहचलेल्या भारतीय पुरुष बॅडमिंटन संघाने आज, १४ वेळा अजिंक्यपद जिंकलेल्या इंडोनेशिया संघाला ३-० असं नमवून मिळवलेला विजय ऐतिहासिक आहे. या विजयानं भारतीय बॅडमिंटन क्षेत्राची, भारतीय क्रीडा जगताची मान उंचावली आहे. पुरुष एकेरीतील विजेते लक्ष्य सेन आणि किदम्बी श्रीकांत, तसंच दुहेरी सामन्यातील विजेते सात्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या खेळाडूंचे खुप खुप अभिनंदन. तुमच्या कामगिरीनं देशवासियांना अवर्णनीय आनंद दिला आहे. तुमच्या यशाचा देशाला अभिमान आहे. तुमचं यश हे भारतीय बॅडमिंटनच्या सुवर्णयुगाची सुरुवात आहे,” अशा शब्दात उपमुख्यमंत्री आणि महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेचे अध्यक्ष अजित पवार यांनी थॉमस कप विजेत्या भारतीय पुरुष बॅडमिंटन संघाचं अभिनंदन केलं आहे.