टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भारताचा विजयी ‘पंच’; बॉक्सर सतीश कुमारची उपांत्यपूर्व फेरीत धडक

भारतीय बॉक्सर सतीश कुमारने टोकियो ऑलिम्पिकमधील पुरुष सुपर हेवीवेट कॅटेगरीमध्ये उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे.

satish kumar, Tokyo
बॉक्सर सतीश कुमारची उपांत्यपूर्व फेरीत धडक (Photo: Twitter/DD)

भारतीय बॉक्सर सतीश कुमारने टोक्यो ऑलिम्पिकमधील पुरुष सुपर हेवीवेट कॅटेगरीमध्ये उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. त्याने १६व्या फेरीत जमैकाच्या रिकार्डो ब्राऊनला ४-१ ने पराभूत केले. सतिशच्या या कामगिरीमुळे ऑलिम्पिकमध्ये पदकासाठी भारताच्या आशा उंचावल्या आहेत.

पहिल्या फेरीत सतीशने प्रभावी खेळ करून पंचांची आणि उपस्थितांची मने जिंकली. तर, दुसऱ्या फेरीत त्याने अप्रतिम राईट हूक आणि बॉडी शॉट्स वापरून रिकोर्डोला चित केले. पहिल्या दोन फेरीत सतीशने रिकार्डोला गारद केल्याने तिसऱ्या फेरीत सतीशचा सामना करणं त्याला जवळपास अशक्य झालं. मात्र आघाडी घेतली असतानाही सतीशने कुठलाही धोका न पत्करता चतुराईने खेळत सामना जिंकला आणि उपांत्य फेरीत प्रवेश केला.

सतीश कुमारने २०१० मध्ये जिंकलं होतं पहिलं पदक

सतीश कुमार मुळचा बुलंदशहरमधील पचौता गावचा आहे. त्याने पहिल्यांदा २०१० मध्ये उत्तर भारत एरिया चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकले होते. त्यानंतर सतीशने नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये रौप्य पदक, २०१४ मध्ये झालेल्या आशियाई खेळामध्ये कांस्य पदक जिंकले. २०१५ मध्ये सतीशने आशियाई चॅम्पियनशिपमध्येही त्याने कांस्यपदक पटकावले होते. तसेच २०१८मध्ये झालेल्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये रौप्य पदक नावावर केले होते.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Indian boxer satish kumar enters quarterfinals of olympic games hrc