सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वातील भारतीय संघाने रविवारी न्यूझीलंडला नमवत टी२० जेतेपदावर कब्जा केला. भारतीय संघाचे टी२० प्रकारातले हे तिसरे जेतेपद आहे तर आयसीसी स्पर्धेचे आठवे. या जेतेपदाचं ठळक वैशिष्ट्य म्हणजे टीम इंडियाने पाडलेला षटकारांचा पाऊस. भारतीय फलंदाजांनी स्पर्धेदरम्यान तब्बल १०६ षटकार चोपल्याचं स्पष्ट झालं आहे. बाकी कोणत्याही संघापेक्षा हे प्रमाण काही पटींनी जास्त आहे. सर्वाधिक षटकारांच्या यादीत भारतीय संघानंतर वेस्ट इंडिज ७६ षटकारांसह दुसऱ्या स्थानी आहे. दक्षिण आफ्रिकेचा संघ ७२ षटकारांसह तिसऱ्या स्थानी आहे.

षटकारांच्या माध्यमातून भारतीय संघाने ६३६ धावा चोपून काढल्या. टी२० प्रकारात षटकारांचं महत्त्व अनोखं आहे. धावांचा पाठलाग असो किंवा मोठी धावसंख्या रचणे असो, षटकाराच्या माध्यमातून झटपट धावा करता येतात. मात्र षटकार लगावणं हे स्वतंत्र कौशल्य आहे. टी२० प्रकारात यशस्वी व्हायचं असेल षटकार कळीचे असतील हे भारतीय संघाने ओळखलं आणि त्यावर भर दिला. या धोरणाचा निश्चित फायदा भारतीय संघाला झाला आहे. संजू सॅमसन, अभिषेक शर्मा आणि इशान किशन या त्रिकुटाने सातत्याने षटकारांचा रतीब घालत प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम केलं. भारतीय संघाने पॉवरप्ले, मधली षटकं आणि हाणामारीची षटकं अशा तिन्ही टप्प्यांमध्ये

षटकारांच्या बाबतीत श्रीलंका आणि झिम्बाब्वे हे दोन संघ तळाच्या स्थानी आहेत. या दोन्ही संघांनी ३७ षटकार वसूल केले. योगायोग म्हणजे या दोन्ही संघांना सुपर८ फेरीचा अडथळा पार करता आला नाही.

दर दहा चेंडूंमागे भारतीय फलंदाजांनी षटकार वसूल केला आहे. चौकारांच्या बाबतीतही भारतीय संघ अव्वल ठरला आहे. भारतीय फलंदाजांनी स्पर्धेदरम्यान १४७ चौकार लगावले आहेत. ११७ चौकांरांसह न्यूझीलंडचा संघ दुसऱ्या तर ११२ षटकारांसह इंग्लंडचा संघ तिसऱ्या स्थानी आहे. भारतीय संघाने चौकारांच्या माध्यमातून १२२४ धावा केल्या आहेत. भारतीय संघाने केलेल्या एकूण धावांच्या तुलनेत यांचं प्रमाण ७० टक्के आहे. वानखेडे स्टेडियमवर झालेल्या सेमी फायनलच्या लढतीत भारतीय संघाने चौकार आणि षटकारांच्या माध्यमातून ३७ धावा केल्या.