ICC Champions Trophy Update: आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ संदर्भात एक मोठी अपडेट समोर आली आहे. भारतीय क्रिकेट संघ पाकिस्तान दौऱ्यावर जाणार नाही. यामुळे पाकिस्तान क्रिकेट आणि पीसीबीला धक्का बसू शकतो. एकीकडे पाकिस्तान क्रिकेट बोर्ड चॅम्पियन्स ट्रॉफीच्या तयारीत व्यस्त आहे आणि आता भारतीय क्रिकेट संघ चॅम्पियन्स ट्रॉफीचे सामने खेळण्यासाठी पाकिस्तानात जाणार नसल्याचे समोर आले आहे. भारताच्या सामन्यांसाठी दोन ठिकाणे बीसीसीआयने आयसीसीला सुचवली आहेत. मात्र, त्याला मंजुरी मिळणे बाकी आहे.

हेही वाचा – कुलदीप यादव बॉलिवूड अभिनेत्रीशी लग्न करणार? वर्ल्डकप विजयानंतर स्वतःच केला खुलासा; म्हणाला…

What is the meaning of the Olympic rings?
Olympics 2024: ऑलिम्पिकच्या लोगोमध्ये पाच वर्तुळ का असतात? काय आहे याचा अर्थ; जाणून घ्या
Aakash Chopra on Suryakumar Yadav
Team India : सूर्यकुमार यादव चॅम्पियन्स ट्रॉफी खेळणार नाही… आकाश चोप्राने का केला असा दावा ? जाणून घ्या
Vikram Rathour on Shubman Gill
Shubman Gill : ‘एक दिवस शुबमन तिन्ही फॉरमॅटमध्ये भारताचे नेतृत्त्व करेल…’, माजी बॅटिंग कोचचे मोठे वक्तव्य
Basit Ali on BCCI and ICC Over Champions Trophy 2025
“Jay Shah म्हणतील तसंच ते करतात”, माजी पाकिस्तानी क्रिकेटरचे ICCवर मोठे वक्तव्य; “म्हणाले, BCCI कडे खूप पैसा म्हणून…”
Sourav Ganguly and Imam ul Haq
‘तेरे इमाम के पूरे करियर पर…’, पाकिस्तानी पत्रकाराने ‘या’ खेळाडूची गांगुलीशी तुलना केल्याने चाहत्यांनी केले ट्रोल
indian goalkeeper p r sreejesh to retire after paris olympics 2024
मागे वळून बघताना स्वत:च्या कामगिरीवर गोलरक्षक समाधानी; ऑलिम्पिकनंतर निवृत्तीचा श्रीजेशचा निर्णय
Sri Lanka Announces T20I Squad for The India Series
IND vs SL: टी-२० मालिकेसाठी श्रीलंकेचा संघ जाहीर, नव्या कर्णधाराची केली घोषणा; अनुभवी खेळाडूला डच्चू
Who is Sairaj Bahutule India Interim Bowling Coach
IND vs SL: भारताचे गोलंदाजी प्रशिक्षक साईराज बहुतुले आहेत तरी कोण? देशांतर्गत क्रिकेटमधील आकडे वाचून व्हाल चकित
Hardik Pandya Hugs Suryakumar Yadav
IND vs SL : हार्दिक पंड्याने सूर्यकुमार यादवला ‘जादू की झप्पी’ देत वेधले सर्वांचे लक्ष, VIDEO होतोय व्हायरल

Champions Trophy 2025: भारताचे सामने या ठिकाणी होण्याची शक्यता

बीसीसआयने टीम इंडियाचे सामने श्रीलंका किंवा दुबईत आयोजित करण्याची मागणी केली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या सूत्रांनी एएनआय या वृत्तसंस्थेला सांगितले की, भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानचा दौरा करणार नाही. त्यांनी आयसीसीला आपले सामने श्रीलंका किंवा दुबईमध्ये आयोजित करण्यास सांगितले आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ चे वेळापत्रक अद्याप निश्चित झालेले नाही, परंतु तात्पुरते वेळापत्रक समोर आले होते. ज्यात पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) आयसीसीकडे तारखा आणि ठिकाणांसह प्रस्तावित सामन्यांची यादी पाठवली आहे.

हेही वाचा – Euro Cup: नेदरलँड्सला हरवत इंग्लंडचा सलग दुसऱ्यांदा अंतिम फेरीत प्रवेश

चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ चे यजमानपद पाकिस्तानला मिळाले आहे. पीसीबीने यासाठी वेळापत्रकाचा मसुदा तयार करून तो आयसीसीला सादर केला आहे. यानंतर आयसीसीकडून सर्व सहभागी देशांचे क्रिकेट बोर्ड यावर मत मांडत आहेत. पीसीबीनुसार, भारताचे सर्व सामने लाहोरमध्ये होणार आहेत. पाकिस्तानने संपूर्ण स्पर्धेसाठी तीन ठिकाणे निवडली आहेत. ज्यामध्ये लाहोरशिवाय रावळपिंडी आणि कराची ही नावे आहेत.

हेही वाचा – IND vs ZIM Highlights: भारताची झिम्बाब्वेवर मात, शुबमन-सुंदरची चमकदार कामगिरी; मालिकेत आघाडी

पीसीबीचे म्हणणे आहे की जर भारतीय संघ उपांत्य फेरी आणि अंतिम फेरीत पोहोचला तर त्यांचे सामने लाहोरमध्येच होऊ शकतात. मात्र, या सामन्यांचे वेळापत्रक अद्याप अधिकृतपणे जाहीर करण्यात आलेले नाही आणि आता भारतीय संघ या सामन्यांसाठी पाकिस्तानला जाणार नसल्याचेही वृत्त समोर आले आहे.