ICC Champions Trophy Update: आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ संदर्भात एक मोठी अपडेट समोर आली आहे. भारतीय क्रिकेट संघ पाकिस्तान दौऱ्यावर जाणार नाही. यामुळे पाकिस्तान क्रिकेट आणि पीसीबीला धक्का बसू शकतो. एकीकडे पाकिस्तान क्रिकेट बोर्ड चॅम्पियन्स ट्रॉफीच्या तयारीत व्यस्त आहे आणि आता भारतीय क्रिकेट संघ चॅम्पियन्स ट्रॉफीचे सामने खेळण्यासाठी पाकिस्तानात जाणार नसल्याचे समोर आले आहे. भारताच्या सामन्यांसाठी दोन ठिकाणे बीसीसीआयने आयसीसीला सुचवली आहेत. मात्र, त्याला मंजुरी मिळणे बाकी आहे. हेही वाचा - कुलदीप यादव बॉलिवूड अभिनेत्रीशी लग्न करणार? वर्ल्डकप विजयानंतर स्वतःच केला खुलासा; म्हणाला… Champions Trophy 2025: भारताचे सामने या ठिकाणी होण्याची शक्यता बीसीसआयने टीम इंडियाचे सामने श्रीलंका किंवा दुबईत आयोजित करण्याची मागणी केली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या सूत्रांनी एएनआय या वृत्तसंस्थेला सांगितले की, भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानचा दौरा करणार नाही. त्यांनी आयसीसीला आपले सामने श्रीलंका किंवा दुबईमध्ये आयोजित करण्यास सांगितले आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ चे वेळापत्रक अद्याप निश्चित झालेले नाही, परंतु तात्पुरते वेळापत्रक समोर आले होते. ज्यात पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) आयसीसीकडे तारखा आणि ठिकाणांसह प्रस्तावित सामन्यांची यादी पाठवली आहे. हेही वाचा - Euro Cup: नेदरलँड्सला हरवत इंग्लंडचा सलग दुसऱ्यांदा अंतिम फेरीत प्रवेश चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ चे यजमानपद पाकिस्तानला मिळाले आहे. पीसीबीने यासाठी वेळापत्रकाचा मसुदा तयार करून तो आयसीसीला सादर केला आहे. यानंतर आयसीसीकडून सर्व सहभागी देशांचे क्रिकेट बोर्ड यावर मत मांडत आहेत. पीसीबीनुसार, भारताचे सर्व सामने लाहोरमध्ये होणार आहेत. पाकिस्तानने संपूर्ण स्पर्धेसाठी तीन ठिकाणे निवडली आहेत. ज्यामध्ये लाहोरशिवाय रावळपिंडी आणि कराची ही नावे आहेत. हेही वाचा - IND vs ZIM Highlights: भारताची झिम्बाब्वेवर मात, शुबमन-सुंदरची चमकदार कामगिरी; मालिकेत आघाडी पीसीबीचे म्हणणे आहे की जर भारतीय संघ उपांत्य फेरी आणि अंतिम फेरीत पोहोचला तर त्यांचे सामने लाहोरमध्येच होऊ शकतात. मात्र, या सामन्यांचे वेळापत्रक अद्याप अधिकृतपणे जाहीर करण्यात आलेले नाही आणि आता भारतीय संघ या सामन्यांसाठी पाकिस्तानला जाणार नसल्याचेही वृत्त समोर आले आहे.