indian cricketer ajinkya rahane radhika dhopavkar shared their baby boy photo revealed his name | Loksatta

अजिंक्य रहाणेने पहिल्यांदाच शेअर केला लेकाचा फोटो, नाव ठेवलं…

अजिंक्य रहाणे व राधिका धोपावकर यांना ऑक्टोबर महिन्यात पुत्ररत्नाची प्राप्ती झाली होती.

अजिंक्य रहाणेने पहिल्यांदाच शेअर केला लेकाचा फोटो, नाव ठेवलं…
अंजिक्य रहाणेने शेअर केला लेकाचा फोटो. (फोटो: अजिंक्य रहाणे/ इन्स्टाग्राम)

भारतीय फलंदाज अजिंक्य रहाणेला ऑक्टोबर महिन्यात पुत्ररत्नाची प्राप्ती झाली. त्याची पत्नी राधिका धोपावकरने गोंडस मुलाला जन्म दिला. अजिंक्य रहाणेने स्वत: इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत याबद्दलची माहिती दिली होती. आता मुलाचं नाव आणि त्याचा फोटो रहाणेने शेअर केला आहे.

अजिंक्य रहाणेची पत्नी राधिकाने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन लेकाचा फोटो शेअर केला आहे. अजिंक्य व राधिकाला ‘आर्या’ ही मुलगी आहे. तिच्याबरोबर लाडक्या लेकाचं फोटोशूट त्यांनी केलं आहे. आर्याबरोबरचा फोटो शेअर करत राधिकाने लेकाचं नाव जाहीर केलं आहे. अजिंक्य व राधिकाने ‘राघव’ असं त्यांच्या मुलाचं नाव ठेवलं आहे. “आर्याचा लहान भाऊ राघव रहाणे” असं कॅप्शन त्यांनी फोटोला दिलं आहे.

भगवान राम यांच्या नावावरुन अजिंक्य व राधिकाने त्यांच्या मुलाचं नाव ठेवलं आहे. अजिंक्य व राधिकाच्या मुलाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. राधिकाने शेअर केलेल्या फोटोवर चाहत्यांनी कमेंट करत शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

अजिंक्य रहाणे व राधिका धोपावकर यांनी २६ सप्टेंबर २०१४ रोजी लग्नगाठ बांधली होती. लग्नानंतर ५ वर्षांनी ऑक्टोबर २०१९ मध्ये राधिकाने मुलगी आर्याला जन्म दिला होता. त्यानंतर ५ ऑक्टोबर २०२२ रोजी राघवची पावलं अजिंक्य व राधिकाच्या आयुष्यात पडली.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 06-12-2022 at 19:14 IST
Next Story
ठरलं! टीम इंडियाला मिळाला नवीन प्रशिक्षक; राहुल द्रविडच्या निकटवर्तीयाची BCCI कडून निवड