Rishabh Pant Car Accident Video: भारतीय क्रिकेट संघाचा यष्टीरक्षक ऋषभ पंतचा भीषण अपघात झाला आहे. अपघातात पंत गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. अपघात इतका भीषण होता की, दुर्घटनेनंतर मर्सिडीज कारला आग लागली. दरम्यान पंतच्या अपघाताचं सीसीटीव्हीदेखील समोर आलं असून, यामध्ये या अपघाताची भीषणता जाणवत आहे.

सीसीटीव्हीमध्ये रस्ता पूर्ण मोकळा दिसत आहे. याचवेळी पंतची कार अत्यंत वेगाने येते आणि दुभाजक तोडून पलीकडे जात असल्याचं व्हिडीओत दिसत आहे. काही सेकंदांच्या या सीसीटीव्हीतून अपघात किती भीषण आहे याची कल्पना येते.

Shah Rukh Khan liked Kolkata Knight Riders cricketer Suyash Sharma hairstyle video viral
शाहरुख खानला पडली ‘या’ क्रिकेटरच्या हेअरस्टाईलची भुरळ; अभिनेता म्हणाला, “मला अशीच…”
vande bharat loco pilot crying at retirement day celebration in bengaluru
VIDEO : अन् शेवटच्या दिवशी फुटला अश्रूंचा बांध, वंदे भारत ट्रेनच्या निवृत्त कर्मचाऱ्याला पाहून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी
vanita kharat and prithvik pratap dances on salman khan old song
Video : सलमान खानच्या गाण्यावर वनिता खरात अन् पृथ्वीक प्रतापचा ऑस्ट्रेलियात जबरदस्त डान्स! व्हिडीओवर कमेंट्सचा पाऊस
street cloth vendors guys dance by saying price on rhythm watch marketing funny video
Video : भर बाजारात “दोसो.. दोसो…” च्या तालावर डान्स करत विकले कपडे, तरुणांची मार्केटिंग ट्रिक पाहिली का?

ऋषभ पंत दिल्लीहून रुरकीला जात होता. यावेळी पहाटे गुरुकुल नरसन परिसरात हा अपघात झाला. अपघातानंतर स्थानिक लोकांनी तात्काळ १०८ ला फोन करून पंतला रुग्णालयात दाखल केलं. पंतला गंभीर दुखापती झाल्या असून त्याच्यावर प्लास्टिक सर्जरी होण्याची शक्यता आहे.

Rishabh Pant Car Accident: “गरज पडल्यास त्याच्यासाठी…”; उत्तराखंडच्या CM चे निर्देश! जाणून या अपघातासंदर्भातील १० अपडेट्स

दरम्यान पंतना हा अपघात कसा झाला याबद्दल माहिती दिली आहे. अपघातानंतर कारला भीषण आग लागली होती. जर पंत वेळीच गाडीतून उतरू शकला नसता तर मोठी दुर्घटना घडू शकली असती.

Rishabh Pant Car Accident: अपघातानंतर अनेकवेळा पलटी झाली कार; पंतला मदत करण्याऐवजी तरुणांनी पैसे घेऊन काढला पळ

ऋषभ पंतने दिलेल्या माहितीनुसार तो स्वतः कार चालवत होता. “गाडी चालवताना झोप लागली आणि कार दुभाजकावर आदळून हा अपघात झाला. अपघातानंतर समोरची काच फोडून आपण बाहेर पडलो,” असं पंतने सांगितलं आहे. बीसीसीआयने पंतची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती दिली आहे.