scorecardresearch

Venkatesh Shruti Engagement: टीम इंडियाचा खेळाडू व्यंकटेश अय्यरचा साखरपुडा संपन्न! इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करत दिली माहिती

Venkatesh and Shruti Engagement: टीम इंडियाचा युवा खेळाडू व्यंकटेश अय्यरचा साखरपुडा झाला आहे. याबाबत त्याने सोशल मीडिया फोटो शेअर करत माहिती दिली आहे. आता चाहते त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.

Indian Cricketer Venkatesh Iyer Engagement
व्यंकटेश अय्यरने श्रुती रघुनाथनशी साखरपुडा केला (फोटो-व्यंकटेश अय्यर इन्स्टा)

Venkatesh Iyer shared photos of his engagement with Shruti Raghunathan : भारतीय संघाचा युवा डावखुरा खेळाडू व्यंकटेश अय्यरचा मंगळवारी साखरपुडा पार पडला. त्याने श्रुती रघुनाथनशी साखरपुडा केला. व्यंकटेश अय्यरने त्याच्या साखरपुड्याची माहिती इन्स्टाग्रामच्या माध्यमातून चाहत्यांशी शेअर केली. शेअर केलेल्या फोटोंमध्ये व्यंकटेश आणि श्रुती दोघेही एंगेजमेंट आउटफिट्समध्ये दिसत आहेत. या फोटोंमध्ये दोघेही खूप आनंदी दिसत आहेत. आता दोघांनाही चाहत्यांकडून आणि मित्रांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

श्रुती रघुनाथनने पीएसजी कला आणि विज्ञान महाविद्यालयातून बी.कॉम केले आहे. तसेच फॅशन मॅनेजमेंटमध्ये पदव्युत्तर पदवी घेतली आहे. सध्या ती बंगळुरू, कर्नाटक येथील लाइफस्टाइल इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेडमध्ये मर्चेंडाईज प्लॅनर म्हणून काम करत आहे. इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये व्यंकटेशने लिहिले की, “आयुष्याच्या पुढच्या अध्यायाकडे,” फोटोमध्ये व्यंकटेश हलका हिरवा कुर्ता घातलेला दिसत आहे. तसेच श्रुती जांभळ्या रंगाची साडी नेसलेली दिसत आहे.

father gifts dirty water bottle to daughter as birthday gift know why it is special photo viral
मुलीच्या वाढदिवसानिमित्त वडिलांनी गिफ्ट दिली अस्वच्छ पाण्याची बाटली! कारण जाणून तुम्हीही व्हाल चकित; पाहा Photo
Amitabh Bachchan Flipkart ad in controversy CAIT called it biased misleading ask to remove
अमिताभ बच्चन यांना १० लाखांचा दंड ठोठावण्यात यावा, व्यापारी संघटनेची मागणी, जाहिरातीवरून झालाय वाद
isabled young woman Dhol Vadan with one hand
”ताई, तुला मानाचा मुजरा”, एका हातानेच ढोल वादन करणाऱ्या तरुणीचा व्हिडीओ व्हायरल, लोकांनी तिच्या जिद्दीचे केले कौतूक
apoorva mehta founder of instacart
एका फ्रिजमुळे पालटलं नशीब, उभी केली अब्जावधी किमतीची कंपनी, Instacart च्या संस्थापकाची प्रेरणादायी कहाणी वाचाच

व्यंकटेश अय्यरने टीम इंडियासाठी २ वनडे आणि ९ टी-२० सामने खेळले आहेत. त्याला गेल्या वर्षीच टीम इंडियात पदार्पण करण्याची संधी मिळाली. व्यंकटेश फलंदाजीसोबत गोलंदाजीही करतो. दोन एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये त्याच्या बॅटमधून फक्त २४ धावा आल्या आहेत. याशिवाय त्याने ९ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये १३३ धावा केल्या आहेत. त्याचबरोबर गोलंदाजी करताना ५ विकेट्सही आपल्या नावावर केल्या आहेत. नुकत्याच झालेल्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये अय्यरने मध्य प्रदेशसाठी चमकदार कामगिरी केली होती.

हेही वाचा – IND vs AUS Final: मॅक्सवेलच्या पत्नीला ट्रोल करणार्‍यांवर हरभजन सिंग संतापला; म्हणाला, “खेळाडूंच्या कुटुंबीयांना…”

आयपीएलमध्ये केकेआरसाठी खेळतो –

व्यंकटेश अय्यर इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) मध्ये कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळतो. अय्यरने आतापर्यंत आयपीएलमध्ये ३६सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्याने १३० पेक्षा जास्त स्ट्राइक रेटने ९५६ धावा केल्या आहेत. या कालावधीत त्याने ७ अर्धशतके आणि एक शतक झळकावले आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व क्रीडा, वर्ल्डकप २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Indian cricketer venkatesh iyer shared photos of his engagement with shruti raghunathan vbm

First published on: 21-11-2023 at 19:12 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×