पत्नी धनश्रीला घटस्फोट दिल्याच्या चर्चांवर युजवेंद्र चहलने केलं भाष्य, म्हणाला…

युजवेंद्र चहल आणि धनश्रीचा घटस्फोट? क्रिकेटपटून केलं भाष्य

पत्नी धनश्रीला घटस्फोट दिल्याच्या चर्चांवर युजवेंद्र चहलने केलं भाष्य, म्हणाला…
युजवेंद्र चहल आणि धनश्रीचा घटस्फोट?

भारतीय क्रिकेट संघाचा फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहल सध्या आपल्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. युजवेंद्र चहल आणि पत्नी धनश्री यांच्यात बिनसलं असून ते घटस्फोट घेण्याच्या तयारीत असल्याचे अंदाज लावले जात आहेत. याचं प्रमुख कारण म्हणजे, इन्स्टाग्रामवर धनश्रीने नावात केलेला बदल आणि युजवेंद्रने डिलीट केलेली स्टोरी ठरत आहे. या सर्व घडामोडींदरम्यान, युजवेंद्र चहलने इन्स्टाग्रामला आणखी एक स्टोरी शेअर केली असून चर्चांवर भाष्य केलं आहे.

नेमकं काय झालं आहे –

धनश्रीने लग्नानंतर आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटमध्ये बदल करत चहल आडनाव जोडलं होते. मात्र अलीकडेच तिने चहल आडनाव काढून धनश्री वर्मा असा बदल केला आहे. महत्त्वाचं म्हणजे, धनश्रीने नावात बदल केल्यानंतर चहलनेसुद्धा आपल्या अकाऊंटवर एक स्टोरी पोस्ट केली होती. ‘नवीन आयुष्याची सुरूवात’ असं लिहिलेली स्टोरी चहलने काही वेळानंतर डिलीट केली. यामुळे चाहते बुचकळ्यात पडले असून दोघांनी घटस्फोट घेतल्याची चर्चा रंगली आहे.

युजवेंद्र चहल आणि धनश्रीच्या नात्यात फूट? आधी इन्स्टाग्रामवरून नाव केलं डिलीट आणि आता..

चहलचं चाहत्यांना आवाहन –

दरम्यान चहलने पत्नीसोबत घटस्फोट झाल्याच्या चर्चांना पूर्णविराम देण्याचं आवाहन केलं असून, कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका अशी विनंती केली आहे. “माझी सर्वांना कळकळीची विनंती आहे की, माझ्या नात्यासंबंधी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. कृपया त्याला पूर्णविराम द्या. सर्वांना प्रेम,” असं चहलने म्हटलं आहे.

सोशल मीडियावर नेहमी अॅक्टिव्ह असणारी चहल आणि धनश्रीची जोडी प्रचंड लोकप्रिय आहे. २०२० मध्ये दोघे विवाहबंधनात अडकले होते. धनश्री वर्मा युट्यूबर आणि कोरिओग्राफर असून सोशल मीडियावर तिचे अनेक फॉलोअर्स आहेत.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
क्रिप्टो चषक बुद्धिबळ स्पर्धा : प्रज्ञानंदचा सलग तिसरा विजय
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी