लाजिरवाण्या ११ खेळाडूंच्या यादीत मुंबईकर अजित आगरकरचं नाव; जाणकार, चाहते संतापले

ऑस्ट्रेलियाच्या प्रसिद्ध क्रीडा वाहिनीचा प्रताप

१) अजित आगरकर – २००२ साली लॉर्ड्स कसोटी सामन्यात इंग्लंडविरुद्ध मराठमोळ्या अजित आगरकरने नाबाद १०९ धावांची खेळी केली होती. कसोटी क्रिकेटमधलं अजित आगरकरचं हे पहिलं आणि एकमेव शतक होतं.

क्रिकेटच्या इतिहासातील Worst Tailenders म्हणजेच सर्वात वाईट कामगिरी करणारे तळाचे फलंदाज यांची एक यादी ऑस्ट्रेलियाची प्रसिद्ध क्रीडा वाहिनी फॉक्स स्पोर्ट्सने जाहीर केली. या यादीमध्ये ११ खेळाडूंमध्ये भारतीय संघाचा माजी अष्टपैलू क्रिकेटपटू अजित आगरकर आणि वेगवान गोलंदाज यांचा समावेश करण्यात आला आहे. जसप्रीत बुमराहने आतापर्यंत फलंदाजीत फारशी चमक दाखवलेली नाही, पण आपल्या उमेदीच्या काळात चांगली फलंदाजी केलेल्या अजित आगरकरचे नाव या यादीत समाविष्ट केल्याने भारतीय क्रिकेट जाणकार आणि चाहते यांच्याकडून आश्चर्य आणि संताप व्यक्त केला जात आहे.

भारतीय क्रीडाक्षेत्राला धक्का! यजमानपदाचे हक्क गमावण्याची नामुष्की

अजित आगरकर याने १९९८ ते २००७ या कालावधीत भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले. या काळात त्याने २६ कसोटी सामन्यांमध्ये २,७४५ धावा केल्या. १९१ एकदिवसीय सामन्यात ८ हजारांहून अधिक धावा केल्या. तर ४ टी २० सामन्यात ८५ धावा केल्या. ‘क्रिकेटची पंढरी’ मानल्या जाणाऱ्या लॉर्ड्स मैदानावर कसोटी शतक मारण्याचा पराक्रमही त्याच्या नावावर आहे. असे असूनदेखील त्याचा ‘तळाचे निवडक वाईट फलंदाज’ या यादीत समावेश करण्यात आल्याने साऱ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

अष्टपैलू व्यक्तिमत्वाला रवी शास्त्रींकडून श्रद्धांजली

वॉर्नर पती-पत्नीचा रोमँटिक डान्स सुरु असतानाच लेक मध्ये आली अन्…

प्रसिद्ध क्रिकेट समालोचक आणि क्रिकेट जाणकार हर्षा भोगले यांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. “आगरकरला या यादीत समाविष्ट कसे काय केले? त्याच्या नावावर कसोटी शतक आहे. २१ चेंडूत ५० धावांची विक्रमही त्याच्या नावावर आहे”, असे हर्षा भोगले यांनी ट्विट केले आहे.

‘शंभर नंबरी’ हिटमॅन! क्रिकेट इतिहासात सर्वात आधी रोहितने केला होता ‘हा’ पराक्रम

IPL मुळे लोकप्रिय झालेला अँकर गौरव कपूर यानेही या यादीवर नाराजी दर्शवली आहे. “या यादीत अजित आगरकरचा समावेश.. जरा विचित्रच आहे. लॉर्ड्सच्या मैदानावर त्याच्या नावे कसोटी शतक आहे. (ते मैदान तुम्हाला माहिती असेलच) आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद अर्धशतक (२१ चेंडूत) ठोकणारा भारतीय हा विक्रम अद्यापही त्याच्या नावे आहे”, असे त्याने ट्विट केले.

याशिवाय, भारतीय क्रिकेट चाहत्यांनीही या यादीवर तीव्र नाराजी व्यक्त केली.

दरम्यान, या यादीत दोन भारतीय खेळाडूंसह तीन इंग्लिश, दोन ऑस्ट्रेलियन, दोन झिम्बाब्वे, एक कॅरिबियन आणि एक न्यूझीलंड क्रिकेटरचा समावेश करण्यात आला आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Indian fans fume as australian tv channel names ajit agarkar in a worst ever tailenders list vjb