scorecardresearch

Deepak Chahar: CSK चा स्टार खेळाडू गंगेच्या काठावर पत्नीसोबत करतोय योगा आणि व्यायाम; पाहा VIDEO

Deepak Chahar Video: भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज दीपक चहर दुखापतीमुळे संघातून बाहेर आहे. तो त्याची पत्नी जयासोबत सध्या ऋषिकेशमध्ये आहे. त्याने एक एक व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.

Indian fast bowler Deepak Chahar has shared a video
दीपक चहर (फोटो-लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

दीपक चहर गेल्या अनेक महिन्यांपासून दुखापतीमुळे भारतीय संघातूने बाहेर आहे. दीपक चहर हा त्याच्या पत्नीसोबत ऋषिकेशमध्ये आहे. त्याने एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये तो गंगेच्या काठावर योगा आणि व्यायाम करत आहे. त्याची पत्नी जयाही भारद्वाज व्हिडिओमध्ये दिसत आहे. त्यांचा हा व्हिडिओ चाहत्यांना खूप आवडत आहे.

सोमवारी दीपक चहरने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला, ज्यामध्ये तो गंगेच्या काठावर योगा आणि व्यायाम करत आहे. या व्हिडिओमध्ये तो पत्नीसोबत गंगा आरती करताना दिसत आहे. या व्हिडिओसोबतच्या कॅप्शनमध्ये दीपकने लिहिले- कधी कधी थांबून स्वत:ला रिसेट करायला हवे. आणि आपल्या मूलभूत गोष्टींवर परत जावे.

गेल्या आयपीएल हंगामात दीपक चहरला विक्रमी रक्कम मिळाली होती. चेन्नई सुपर किंग्जने त्याला २०२२ च्या मोसमासाठी १४ कोटींमध्ये रिटेन केले. परंतु, दुखापतीमुळे तो संघासाठी खेळू शकला नाही. त्याचबरोबर तो संघातही सामील होऊ शकला नव्हता. केवळ आयपीएलच नाही, तर दीपक चहरला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही चांगले पुनरागमन करता आलेले नाही. कधी दौऱ्यावर त्याचं नाव येतं, कधी सामना खेळतो आणि मग त्याच्या दुखापतीच्या बातम्या येतात.

हेही वाचा – IND vs AUS: कांगारु टीममध्ये आश्विनच्या फिरकीची भलतीच दहशत; प्रमुख फलंदाज म्हणाला, ‘आश्विन म्हणजे तोफ…’

दीपक चहरने आपला शेवटचा वनडे ७ डिसेंबर रोजी बांगलादेशविरुद्ध खेळला. केवळ ३ षटके टाकल्यानंतर स्नायूंच्या तक्रारीमुळे तो बाहेर पडला. तो सतत संघातून बाहेर पडत आहे. आता आगामी आयपीएलच्या संपूर्ण हंगामासाठी तो उपलब्ध असेल अशी अपेक्षा आहे. दरम्यान सीएसकेला त्याची काळजी नक्कीच असेल, कारण तो आंतरराष्ट्रीय स्तरावरही चांगले पुनरागमन करू शकलेला नाही.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 06-02-2023 at 16:19 IST
ताज्या बातम्या