इंडियन ग्रां.प्रि.- सेबॅस्टियन वेटेल सरावफेरीत अव्वल स्थानी

इंडियन ग्रां.प्रि.साठीची सराव फेरी आज झाली. यात रेड बुल संघाचा ड्रायव्हर सेबॅस्टियन वेटेलने अव्वल स्थान गाठले आणि इंडियन ग्रां.प्रि.फॉर्म्युला-वन शर्यतीत आपणच अजिंक्य पदाचे दावेदार असल्याचे वेटेलने दाखवून दिले.

स्पर्धेआधी वेटेलने ही स्पर्धा नक्कीच महत्वाची होईल असे म्हणून फॉर्म्युला-वन शर्यतीच्या चाहत्यांच्या मनात उत्कंठा निर्माण करून ठेवली आहे. या स्पर्धेत वेटेलसाठी चौथे विश्वविजेतेपद पटकावण्याची फक्त औपचारिकताच शिल्लक राहिली आहे. तो योग सुदैवाने भारतातच जुळून येणार आहे.
या सराव स्पर्धेत वेटेलच दोनही फेरीत अव्वल स्थानी होता. ऑस्ट्रेलियन मार्क वेबरने दुसरे स्थान गाठले. वेबर वगळता वेटेलच्या मागे दूरदूर पर्यंत कोणीही नव्हते. त्यामुळे वेटेल अंजिक्य पदाला गवसणी घालणार हे पक्केच समजण्यासारखे चित्र आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Indian grand prix 2013 sebastian vettel fastest in practice