अनुभवी सौरव घोषालच्या नेतृत्वाखालील भारतीय पुरुष संघाने आशियाई स्क्वॉश सांघिक स्पर्धेच्या अंतिम फेरीत कुवेतचा २-० असा पराभव करून पहिले सुवर्णपदक जिंकले. रमित टंडनने अली आरामजीसोबत (११-५, ११-७, ११-४) सरळ गेम जिंकला. यामुळे भारताला १-० अशी आघाडी मिळाली. यानंतर भारताचा स्टार खेळाडू सौरव घोषालने विजयावर शिक्कामोर्तब केले.

सौरव घोषालने अम्मर अल्तामिमीचा (११-९, ११-२, ११-३) असा पराभव करत संघाला अजेय आघाडी मिळवून दिली. अभय सिंग आणि फलाह मोहम्मद यांच्यातील तिसरा सामना खेळला गेला नाही कारण रमित टंडन आणि सौरव घोषाल यांच्या विजयानंतर भारताचे सुवर्णपदक निश्चित झाले होते.

Champions League Football Barcelona beat Paris Saint Germain sport news
चॅम्पियन्स लीग फुटबॉल: बार्सिलोनाची पॅरिस सेंट-जर्मेनवर मात
Real Madrid and Manchester City draw match
चॅम्पियन्स लीग फुटबॉल : रेयाल-मँचेस्टर सिटीतील रंगतदार लढत बरोबरीत
Rohit breaks Dhoni's sixes record
IPL 2024 MI vs DC : रोहित शर्माने मोडला धोनीचा विक्रम! वॉर्नर-कोहलीच्या ‘या’ खास क्लबमध्येही झाला सामील
pv sindhu
सिंधूची उबर चषक बॅडमिंटन स्पर्धेतून माघार; थॉमस चषकासाठी भारताचा मजबूत संघ

महिला संघाने कांस्यपदक जिंकले

या स्पर्धेत भारतीय महिला संघाने कांस्यपदक पटकावले आहे. महिला संघ उपांत्य फेरीत मलेशियाकडून १-२ असा पराभूत झाला. पहिल्या लेगमध्ये हाँगकाँगकडून ०-३ ने पराभूत होऊन महिला संघाने ग्रुप बी मध्ये दोन विजय आणि एक पराभवासह दुसरे स्थान मिळवले. मात्र महिला संघाने इराण आणि सिंगापूरचा पराभव केला.

हेही वाचा :   T20 World Cup 2022: ‘हे खूप हास्यास्पद…’ ऋषभ पंतला संधी न मिळाल्याने हा ऑस्ट्रेलियन दिग्गज संतापला

आशियाई सांघिक स्क्वॉश चॅम्पियनशिप २०२२

आशियाई सांघिक स्क्वॉश चॅम्पियनशिप २०२२ चेंगजू, दक्षिण कोरिया येथे ३१ ऑक्टोबर ते ०४ नोव्हेंबर दरम्यान आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत पुरुषांच्या स्पर्धेत भारताने सुवर्ण, तर कुवेत संघाला रौप्य आणि हाँगकाँगला कांस्यपदक मिळाले. २०२१ मध्ये भारताला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. महिला विभागातील सुवर्णपदक हाँगकाँग संघाने पटकावले.

आशियाई स्क्वॉश फेडरेशनतर्फे आशियाई सांघिक स्क्वॉश चॅम्पियनशिप आयोजित केली जाते. हे दर दोन वर्षांच्या अंतराने आयोजित केले जाते. १९८४ पासून ही स्पर्धा आयोजित केली जात आहे. २०२० ची स्पर्धा कोविड-१९ मुळे २०२१ मध्ये आयोजित करण्यात आली होती.

हेही वाचा :  पाकिस्तानी महिला क्रिकेट कर्णधाराने पोलखोल करत पाकिस्तान क्रिकेट मंडळावर केला गंभीर आरोप 

आशियाई स्क्वॉश फेडरेशनची स्थापना २९ नोव्हेंबर १९८० रोजी झाली. त्याची पहिली बैठक पाकिस्तानातील कराची शहरात झाली. त्याच्या संस्थापक सदस्यांमध्ये बांगलादेश, मलेशिया, पाकिस्तान, बहारीन, फिलीपिन्स, सिंगापूर आणि थायलंड यांचा समावेश होता. त्याचे मुख्यालय क्वालालंपूर, मलेशिया येथे आहे.