भारतीय संघाचा स्टार गोलंदाज भुवनेश्वर कुमारच्या घरात आनंदाचे वातावरण आहे. भुवनेश्वर कुमार वडील झाला आहे. आज बुधवारी सकाळी त्याची पत्नी नुपूर नागरने दिल्लीतील एका खासगी रुग्णालयात गोंडस मुलीला जन्म दिला. आजी झाल्याच्या आनंदात भुवीच्या आईने दिल्ली गाठली. भुवनेश्वर कुमारचे आई-वडील मेरठमध्ये राहतात.

मेरठ जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे (MDCA) कोषाध्यक्ष राकेश गोयल यांनी ही माहिती दिली. नुपूर आणि मुलगी दोघांचीही प्रकृती उत्तम आहे. भुवनेश्वर गुरुवारी त्याच्या मेरठ येथील घरी जाण्याची शक्यता आहे. कुटुंबात पाहुण्या सदस्याचे आगमन झाल्यामुळे भुवनेश्वरचे कुटुंब खूप आनंदात आहे.

हेही वाचा – बाऽऽबो..! हरभजन सिंगनं अंधेरीतील अलिशान अपार्टमेंट विकलं; मिळाली ‘इतकी’ किंमत!

टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारने २३ नोव्हेंबर २०१७ रोजी नुपूर नागरशी लग्न केले. नुपूर सध्या नोएडा येथे राहत होती. याची माहिती मिळताच भुवी मुलीला पाहण्यासाठी दिल्लीला रवाना झाला आहे. भुवनेश्वर कुमारच्या वडिलांचे यावर्षी २० मे रोजी निधन झाले. त्यांच्या वडिलांना अनेक दिवसांपासून यकृताचा त्रास होता.

वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारने नुकत्याच संपलेल्या तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेत भाग घेतला. त्याने मालिकेतील सर्व सामने खेळले आणि तीन विकेट घेतल्या. न्यूझीलंड मालिकेत भुवीने चांगली गोलंदाजी केली. त्याचे स्विंग चेंडू खेळणे फलंदाजांसाठी अजिबात सोपे नव्हते. भुवी हा अत्यंत किफायतशीर गोलंदाज असल्याचे सिद्ध झाले. त्याने आपल्या धोकादायक गोलंदाजीने भारताला अनेक सामने जिंकून दिले आहेत.