scorecardresearch

VIDEO : “आपला भाऊ तर पुरुषांमधला ढिंच्याक पूजा निघाला”

क्रिकेटपटू नवदीप सैनी आपल्या नव्या VIDEOमुळे होतोय जबरदस्त ट्रोल

ढिंच्याक पूजा आणि नवदीप सैनी

काही दिवसांपूर्वी भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज नवदीप सैनीने उद्योजक आनंद महिंद्रा यांच्याकडून गिफ्ट मिळालेल्या थार गाडीची चाचणी घेतली होती. या चाचणीचा व्हिडिओही त्याने शेअर केला होता. आता नवदीप पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. त्याने आपल्या बाईकचा म्हणजेच हार्ले डेविडसनचा एक व्हिडिओ शेअर केला असून चाहत्यांनी या व्हिडिओवर अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत.

या व्हिडिओमध्ये नवदीप आपल्या बाईकसह धुरळा उडवताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये शर्टलेस असलेल्या नवदीपला अनेकांनी पसंती दिली, तर काहींनी तोंडसुखही घेतले. “भीती वाटण्यासाठी माझ्याबरोबर माझ्या बाईक वर बसा”, असे कॅप्शन नवदीपने या व्हि़डिओला दिले आहे. सैनीचे हे ट्विट सोशल मीडियावर खूप व्हायरल होत असून या पोस्टला आतापर्यंत सुमारे चार लाख लोकांनी पाहिले आहे.

हेही वाचा – “पहले इस्तेमाल करो, फिर…”, गिफ्टमध्ये मिळालेल्या गाडीची नवदीप सैनीनं केली चाचणी

 

लोकांनी दिलेल्या प्रतिक्रिया

या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी तोंडसुख घेतले असून एकाने तर नवदीपला “आपला भाऊ तर पुरुषांमधला ढिंच्याक पूजा निघाला” असे म्हटले आहे.

 

 

 

 

हेही वाचा – भारतीय क्रिकेट संघासाठी आनंदाची बातमी!

हरयाणाच्या नवदीपने आयपीएलच्या यंदाच्या मोसमात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून फक्त एक सामना खेळला. त्याने २ षटकांत २७ धावा दिल्या. मात्र, त्याला एकही बळी घेता आला नाही. आयपीएलच्या शेवटच्या सत्रात सैनीने १३ सामन्यांत ६ गडी बाद केले. यावर्षी जानेवारीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध ब्रिस्बेन येथे झालेल्या सामन्यात नवदीपने कसोटी पदार्पण केले.

सैनीने आतापर्यंत भारतासाठी दोन कसोटी, सात एकदिवसीय आणि नऊ टी -20 सामने खेळले आहेत.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Indian pacer navdeep sainis new post with harley davidson gets twitter trolling adn

ताज्या बातम्या