पदार्पणाच्या कसोटी मालिकेतच हिरो ठरले ‘हे’ भारतीय खेळाडू

दोन खेळाडू आहेत अस्सल मुंबईकर

कसोटी क्रिकेट हा क्रिकेटचा सर्वात पारंपरिक प्रकार मानला जातो. आज टी-२०, वन-डे क्रिकेटला प्रेक्षकांचा पाठींबा जास्त असला तरीही प्रत्येक खेळाडूच्या मनात एकदा तरी कसोटी मालिकेत खेळण्याची इच्छा असते. पाच दिवस खेळपट्टीशी जुळवून घेत टिकून राहणं सोपी गोष्ट नसते. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतीय संघाने गेल्या काही वर्षांमध्ये आश्वासक कामगिरी केली आहे. आयसीसीने एका वर्षापूर्वी सुरु केलेल्या कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय संघाची कामगिरी चांगली राहिलेली आहे. काही भारतीय खेळाडूंनी आपल्या पहिल्याच कसोटी मालिकेत धडाकेबाज कामगिरी करत मालीकावीराचा किताब पटकावला. आज आपण अशाच खेळाडूंबद्दल जाणून घेणार आहोत.

१) सौरव गांगुली – भारताचा माजी कर्णधार आणि सध्याचा बीसीसीआय अध्यक्ष असलेल्या गांगुलीने १९९६ साली जून महिन्यात इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिकेत पदार्पण केलं. ३ सामन्यांच्या मालिकेत गांगुलीला दुसऱ्या कसोटी सामन्यात संधी मिळाली. यावेळी पदार्पणाच्या सामन्यात गांगुलीने ३०१ चेंडूत १३१ धावा केल्या. या खेळीत २० चौकारांचा समावेश होता. यानंतर दोन डावांमध्ये गांगुलीने अनुक्रमे १३६ व ४८ धावांची खेळी केली. या कामगिरीमुळे त्याला मालिकावीराचा किताब देऊन गौरवण्यात आलं होतं.

२) रोहित शर्मा – २०१३ साली वेस्ट इंडिजविरुद्ध दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतून रोहितने भारतीय कसोटी संघात पदार्पण केलं. कोलकाता कसोटीत रोहितने ३०१ चेंडूत १७७ धावा केल्या. रोहितच्या या खेळीत २३ चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता. तर मुंबई येथील वानखेडे मैदानात झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात रोहितने अनुक्रमे १२७ आणि नाबाद १११ धावा केल्या. या दमदार खेळाच्या जोरावर रोहितने या मालिकेत मालिकावीराचा किताब पटकावला. सचिन तेंडुलकरचा हा शेवटचा कसोटी सामना होता.

३) पृथ्वी शॉ – युवा मुंबईकर क्रिकेटपटू पृथ्वी शॉने २०१८ साली ऑक्टोबर महिन्यात वेस्ट इंडिजविरुद्ध २ कसोटी सामन्यांच्या मालिकेतून भारतीय संघात पदार्पण केलं. राजकोट कसोटी सामन्यात पृथ्वीने १३४ तर हैदराबाद कसोटीत पृथ्वीने पहिल्या डावात ७० तर दुसऱ्या डावात नाबाद ३३ धावा केल्या. भारताने ही मालिका २-० च्या फरकाने जिंकली होती. युवा पृथ्वी शॉ ला या मालिकेत मालिकावीराचा पुरस्कार मिळाला होता.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Indian players who dominate their first test series by taking man of the series award psd

Next Story
ऑलिम्पिक पदकात पुण्याचाही वाटा -सायना
ताज्या बातम्या