गुजरात टायटन्सवर पाच गडी राखून मात; कॉन्वे, रहाणे, जडेजाची चमक

वृत्तसंस्था, अहमदाबाद

सलामीवीर डेव्हॉन कॉन्वे (२५ चेंडूंत ४७ धावा), शिवम दुबे (२१ चेंडूंत नाबाद ३२) यांच्या खेळीनंतर अष्टपैलू रवींद्र जडेजाच्या (६ चेंडूंत १५ धावा) निर्णायक खेळीच्या बळावर चेन्नई सुपर किंग्ज संघाने इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) अंतिम सामन्यात गतविजेत्या गुजरात टायटन्सवर डकवर्थ-लुईस-स्टर्न पद्धतीनुसार पाच गडी राखून विजय मिळवला व आपले पाचवे विजेतेपद पटकावले.

Stone planting on leader anil deshmukh vehicle,
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या गाडीवर दगडफेक,राजकीय वर्तुळात खळबळ
Ladki Bahin Yojna Sudhir Mungantiwar 2100 rs Installment
Ladki Bahin Yojna : लाडक्या बहिणींना २१०० रुपयांसाठी…
Jasprit Bumrah and Tabraiz Shamsi have similar T20I stats
Jasprit Bumrah : तबरेझ शम्सीच्या पोस्टने क्रिकेट विश्वाला दिला आश्चर्याचा धक्का! जसप्रीत बुमराहबरोबर घडला असा योगायोग की विश्वासच बसणार नाही
Aditi Tatkare
मविआतील बंडखोरी आदिती तटकरेंच्या पथ्यावर ?
Maharashtra Vidhan Sabha Nivadnuk 2024 Updates in Marathi
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रचार थांबला; आता चेंडू मतदारांच्या कोर्टात, २० नोव्हेंबरची प्रतिक्षा
marathi actor atul kulkarni
वेडी आशा
supriya sule criticizes mahayuti
पूल, इमारती म्हणजे विकास नव्हे! सुप्रिया सुळे यांनी पक्षातील फुटिरांना फटकारले

पावसाच्या व्यत्ययामुळे राखीव दिवशी खेळवण्यात आलेला अंतिम सामना चांगला चुरशीचा झाला. डकवर्थ-लुईस-स्टर्न पद्धतीनुसार चेन्नईला १५ षटकांत १७१ धावांचे लक्ष्य देण्यात आले. सामन्यात अनेक चढ-उतार पाहायला मिळत होते. वेगवान गोलंदाज मोहित शर्माने गुजरातला जवळपास विजय मिळवून दिला होता. मात्र, जडेजाचे इरादे काहीतरी वेगळेच होते. चेन्नईला अखेरच्या षटकांतील दोन चेंडूंत दहा धावांची आवश्यकता होती आणि पाचव्या चेंडूवर जडेजाने षटकार लगावला. अखेरच्या चेंडूवर त्याने षटकार मारला. त्यानंतर कर्णधार महेंद्रसिंह धोनी वगळता चेन्नईचा पूर्ण संघ मैदानात धावत आला.

त्यापूर्वी, बी साई सुदर्शनच्या ४७ चेंडूंत ९६ धावांच्या खेळीच्या जोरावर गुजरातने २० षटकांत २१४ धावा केल्या. सुदर्शनने आपल्या खेळीत ८ चौकार व ६ षटकार लगावले. त्याच्या प्रत्युत्तरात चेन्नईने आक्रमक सुरुवात केली आणि कॉन्वे व ऋतुराज गायकवाड (१६ चेंडूंत २६ धावा) यांनी पहिल्या गडय़ासाठी ३९ चेंडूंत ७४ धावांची भागीदारी केली. अफगाणिस्तानच्या नूर अहमदने सातव्या षटकांत या दोन्ही फलंदाजांना बाद करत संघाला सामन्यात पुनरागमन करून दिले. अजिंक्य रहाणेला (१३ चेंडूंत २७ धावा) मोहितने बाद केले. आपला अखेरचा सामना खेळणाऱ्या अंबाती रायुडूने ८ चेंडूंत एक चौकार व दोन षटकारांसह १९ धावांची खेळी केली. यानंतर मोहितने १३व्या षटकांत सलग दोन चेंडूंत गडी बाद करत गुजरातचे पारडे सामन्यात जड केले.

रायुडू बाद झाल्यानंतर धोनीही मिलरकडे झेल देत माघारी परतला. यानंतर गुजरातच्या गोलंदाजांनी दबाव निर्माण केला व चेन्नईला अखेरच्या षटकांत १४ धावांची आवश्यकता होती. अखेरच्या षटकातील पहिले चार चेंडू मोहितने ‘यॉर्कर’ टाकले व त्यात चारच धावा झाल्या. मात्र, अखेरच्या दोन चेंडूंत त्याच्याकडून चूक झाली आणि जडेजाने गुजरातकडून विजय हिसकावून घेतला. त्यापूर्वी, गुजरातने दुसऱ्या षटकांत गिलला जीवदान मिळाले. दुसऱ्या बाजूने वृद्धिमान साहाने तिसऱ्या षटकांत १६ धावा करत चेन्नईवर दबाव निर्माण केला. ‘पॉवर-प्ले’नंतर गुजरातच्या बिनबाद ६२ धावा होत्या. सातव्या षटकांत गिलला जडेजाने बाद केले. साहाने दुसऱ्या बाजूने खेळताना ‘आयपीएल’मधील आपले दुसरे अर्धशतक १३व्या षटकांत पूर्ण केले. त्याने सुदर्शनसह ६४ धावांची भागीदारी केली. साहाला (५४) चहरने बाद केले. गुजरातकडून हंगामात दुसऱ्या सर्वाधिक धावा करणाऱ्या सुदर्शनने आपले तिसरे अर्धशतक पूर्ण केले. पथिरानाने सुदर्शनला बाद केले. हार्दिक पंडय़ाने १२ चेंडूंत नाबाद २१ धावा केल्या.

संक्षिप्त धावफलक

गुजरात टायटन्स : २० षटकांत ४ बाद २१४ (साई सुदर्शन ९६, वृद्धिमान साहा ५४, शुभमन गिल ३९; मथीशा पथिराना २/४४) पराभूत वि. चेन्नई सुपर किंग्ज : १५ षटकांत ५ बाद १७१ (डेव्हॉन कॉन्वे ४७, शिवम दुबे नाबाद ३२, अजिंक्य रहाणे २७, रवींद्र जडेजा नाबाद १५; मोहित शर्मा ३/३६, नूर अहमद २/१७)