फिरकीपटू वरुण चक्रवर्ती (३/१३), आंद्रे रसेल (३/९) यांनी केलेली प्रभावी गोलंदाजी आणि शुभमन गिल (४८ धावा), पदार्पणवीर व्यंकटेश अय्यर (नाबाद ४१) यांनी केलेल्या दमदार फलंदाजीच्या बळावर कोलकाता नाइट रायडर्सने इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये सोमवारी झालेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरुचा नऊ गडी आणि ६० चेंडू राखून फडशा पाडला.

प्रथम फलंदाजी करताना बेंगळूरुचा डाव अवघ्या ९२ धावांत आटोपला. देवदत्त पडिक्कलने सर्वाधिक २२ धावा केल्या. विराट कोहली (५), एबी डीव्हिलियर्स (०), ग्लेन मॅक्सवेल (१०) यांनी निराशा केल्यामुळे बेंगळूरुला तिसऱ्या पराभवाला सामोरे जावे लागले.

संक्षिप्त धावफलक

रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरु : १९ षटकांत सर्व बाद ९२ (देवदत्त पडिक्कल २२; आंद्रे रसेल ३/९, वरुण चक्रवर्ती ३/१३) पराभूत वि. कोलकाता नाइट रायडर्स : १० षटकांत १ बाद ९४ (शुभमन गिल ४८, व्यंकटेश अय्यर नाबाद ४१; यजुर्वेंद्र चहल १/२३)