इंडियन प्रीमियर लीग क्रिकेट : हैदराबादचे आव्हान संपुष्टात

पंजाब किंग्जने २० षटकांत ७ बाद १२५ धावा केल्या. यात कर्णधार के. एल. राहुल (२१) व एडीन मार्करमचे (२७) महत्त्वाचे योगदान होते.

होल्डरची झुंज अपयशी; पंजाबचा विजय

जेसन होल्डरच्या (३/१९ आणि नाबाद ४७) अष्टपैलू खेळानंतरही पंजाब किंग्जविरुद्ध ‘आयपीएल’ क्रिकेटच्या शनिवारी रात्री झालेल्या सामन्यात सनरायजर्स हैदराबादला पराभव पत्करावा लागला. नऊ सामन्यांत आठव्या पराभवामुळे हैदराबादचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले.

पंजाब किंग्जने २० षटकांत ७ बाद १२५ धावा केल्या. यात कर्णधार के. एल. राहुल (२१) व एडीन मार्करमचे (२७) महत्त्वाचे योगदान होते. त्यानंतर हैदराबादला २० षटकांत ७ बाद १२० धावाच करता आल्या. मोहम्मद शमीने डेव्हिड वॉर्नर (२) आणि कर्णधार केन विल्यम्सन (१) यांना झटपट माघारी धाडले. मधल्या षटकांत फिरकीपटू रवी बिष्णोईने २४ धावांत तीन बळी घेत हैदराबादला अडचणीत टाकले. उत्तरार्धात होल्डरला वृद्धिमान साहा (३१) वगळता इतरांची साथ लाभली नाही. 

संक्षिप्त धावफलक

पंजाब किंग्ज : २० षटकांत ७ बाद १२५ (एडीन मार्करम २७, के. एल. राहुल २१; जेसन होल्डर ३/१९) विजयी वि. सनरायजर्स हैदराबाद : २० षटकांत ७ बाद १२० (जेसन होल्डर नाबाद ४७; रवी बिष्णोई ३/२४)

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Indian premier league cricket hyderabad challenge over akp