दुबई : इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) मंगळवारी होणाऱ्या सामन्यात चाहत्यांना नामांकित स्फोटक फलंदाजांमधील जुगलबंदी पाहायला मिळणार आहे. दुबई क्रिकेट स्टेडियमवर पंजाब किंग्जविरुद्ध रंगणाऱ्या या लढतीद्वारे नव्याने संघबांधणी करण्याच्या हेतूने संजू सॅमसनच्या नेतृत्वाखालील राजस्थान रॉयल्स संघ मैदानावर उतरणार आहे.

मे महिन्यात झालेल्या अखेरच्या सामन्यात पंजाबला पराभव पत्करावा लागला, तर राजस्थानने हैदराबादला धूळ चारली होती. राजस्थान पाचव्या, तर पंजाब सहाव्या स्थानी आहे.

’ वेळ : सायंकाळी ७.३० वा.

’ थेट प्रक्षेपण : स्टार स्पोटर्स १