scorecardresearch

रोईंगपटू दत्तु भोकनळला राज्य शासनाचे ५ लाखांचे बक्षीस

राज्यातील ५३ खेळाडूंना पदकनिहाय एकूण ५ कोटी २४ लक्ष रुपये

dattu bhoknal
दत्तु बबन भोकनळ यास बिजींग येथील १६ व्या एशियन चॅम्पीयनशिप २०१५ चे रौप्यपदक प्राप्त केल्याने शासनाने ५ लाख रुपयांचे बक्षिस जाहीर केले.

राज्य शासनाने विविध आंतरराष्ट्रीय स्पर्धेतील पदक विजेत्या खेळाडूंना रोख पारितोषिके जाहिर केले असून नाशिक जिल्ह्यातल्या तळेगाव रोही (चांदवड) रहिवासी रोईंगपटू दत्तु बबन भोकनळ यास बिजींग येथील १६ व्या एशियन चॅम्पीयनशिप २०१५ चे रौप्यपदक प्राप्त केल्याने शासनाने ५ लाख रुपयांचे, नाशिकमधील अक्षय अष्टपुत्रे यास १३ व्या आशियाई ‍अजिंक्यपद नेमबाजीत कास्यपदक प्राप्त केल्याने ३ लाख रुपयांचे तर सिन्नर मधील प्रियंका घुमरे हिस पॅरा एशियन गेम्स २०१४ ज्युडो स्पर्धेत कास्यपदक प्राप्त केल्याने १ लाख रुपयांचे पारितोषिक जाहिर करण्यात आले आहे.

[jwplayer FeIpXYkp]

याबरोबरच राज्यातील ५३ खेळाडूंना पदकनिहाय एकूण ५ कोटी २४ लक्ष रुपये व त्यांचे ४० क्रीडा मार्गदर्शकांकरिता ७६ लाख ७४ हजार रुपये जाहिर केले आहेत. सदर रोख पारितोषिक या महिन्यात खेळाडूंचे बँक खात्यात जमा करण्यात येणार आहेत.

सन २०१७ -१८ वर्षातील विविध अधिकृत आंतरराष्ट्रीय खेळांच्या अधिकृत संघटनांच्या वयोगटातील खेळाडुंनी प्रथम व्दितीय व तृतीय क्रमांकाचे प्राविण्य प्राप्त केल्यास रोख बक्षिस पारितोषिकासाठी अर्ज पाठवावे. त्यासाठी विहित नमुन्यातील परिपुर्ण अर्ज भरून, खेळाचे प्रमाणपत्र आणि संबंधित राज्य/राष्ट्रीय खेळ संघटनेच्या शिफारसीसह संबंधित जिल्हयाचे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालया मार्फत अथवा थेट आयुक्त, क्रीडा संकुल, म्हाळुंगे- बालेवाडी, पुणे यांच्याकडे सादर करण्याचे आवाहन आयुक्त, क्रिडा व युवक सेवा, महाराष्ट्र राज्य ए.आर.माने यांनी केले आहे.

[jwplayer zaS1VQQF]

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 25-04-2017 at 21:06 IST